पेट्रोल किती रुपये गेल्यावर तुम्ही गाड्या वापरणे बंद कराल?

Submitted by अनिळजी on 27 October, 2021 - 05:43

पेट्रोल/डिझेलच्या किमती दिवसेंदिवस वाढतच जात आहेत. खाजगी गाडीने प्रवास करणे हळूहळू सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जात आहे. पेट्रोलवाढ अशीच सुरु राहिली तर लवकरच पेट्रोल मटणापेक्षा महाग होईल आणि येत्या काही वर्षात सोन्यापेक्षा महाग होऊ शकते. अशी वेळ आली तर लोकांना बाहेर फिरणे कठीण होईल कारण पेट्रोल चोरीसाठी अनेक गाड्यांवर दरोडे पडतील. त्यामुळे सायकल व पायी जाण्याशिवाय लोकांकडे पर्याय उरणार नाही. इलेक्ट्रिक कारने बाहेर फिरणे पण अवघड होईल कारण गाडयांना चार्जिंगसाठी जनरेटरची गरज असते आणि जनरेटर डिझेलवर चालतात. त्यामुळे त्या जनरेटरवर पण कोणीतरी डाका टाकून त्यातलं डिझेल लंपास केलं असेल. तर या समस्येवर तुम्ही काही विचार केला असेल तर सांगा. मी स्वतः पेट्रोल २०० रुपये, जास्तीत जास्त २५० रुपये गेल्यावर गाडी वापरणे बंद करणार आहे. याला दोन कारणे आहेत पहिलं म्हणजे एकदा का २५० चा आकडा ओलांडला कि पेट्रोल एक्सपोनंशिअली वाढणार. आणि दुसरं म्हणजे अचानक सायकल वापरणे त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे आधीपासूनच थोडी थोडी सवय केलेली बरी. तुमच्या डोक्यात या संकटापासून वाचण्यासाठी काही मार्ग असेल तर सांगा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

बरीचशी जनता १५० च्या आसपास पेट्रोल पोहोचले कि गाडीचा वापर गरजेपुरता सुरु करेल. लोक गाड्या रॉंग साइडने चालवण्याचे प्रमाण वाढेल कारण त्यात त्यांचे थोडेफार इंधन वाचेल असा त्यांचा समज असतो. हळू हळू इलेक्ट्रिक वर शिफ्ट होतील. सरकारला २०३० पर्यंत ५०% पेक्षा जास्त गाड्या इलेक्ट्रिक करायच्या आहेत आणि हे देखील एक कारण आहे किंमत कमी न करण्याचे. पैसे तर सरकारला हवेच आहेत कारण कोरोनाने त्यांची वाट लावून ठेवली आहे.

मर्यादित वापरावरून इलेक्ट्रिकला शिफ्ट असा मध्यम मार्ग घ्यावा लागेल, कारण इलेक्ट्रिक गाड्या पण काही स्वस्त नाहीत.

माझ्याकडे मटणावर चालणारी कार आहे.
पेट्रोलचे भाव मटणाच्या भावापेक्षा जास्त झाले की मी मटणावर चालणारी कार वापरायला सुरवात करेन.

सारंगखेड्याच्या यात्रेतुन शिंगरु घेणार आहे. जो पर्यंत पेट्रोल/डिझेलचे भाव वाढतील तो पर्यंत त्याचा घोडा होणार. (ड्बल फायदा...प्रवासासाठी आणी लग्नात नवरदेवासाठी भाड्याने द्यायला, फावल्या वेळात टांगा चालवायला बीचवर किंवा रामगढला प्रवासी सोडायला वाटलच तर धन्नोशी गप्पा मारायला)

नितीनजींच्या गुळगुळीत रस्त्यांवरून कमरेला झाडाच्या पानांचे वस्त्र, हातात भाला आणि डोक्यात पानाफुलांचा मुकूट घालून आणि अंगभर राख, शेंदूर फासून चालत चालत जायचे.
आमची आत्यंतिक हलाखीची परिस्थिती असल्याने बीएमडब्ल्यू मधे दहा हजार रूपये लिटर पेट्रोल टाकून दिवस कसेबसे ढकलावेच लागतील.

माझ्या मुलीची जुनी प्रॅम मी अजूनही सांभाळुन ठेवलीय. मार्केटला जातांना वापरता येईल. तसेच आमच्या सोसायटीच्या आवा॑रात एक जुनी हातगाडी आहे, ती सर्व सोसायटी मेंब्रांनी आळीपाळीने वापरायची ठरवले आहे.

कोणाचे उत्पन्न वाढेल? इथे आहे तो पगार निम्मा झालाय
आणि पेट्रोल दुप्पट

सगळेच चांदीचा चमचा घेऊन आलेले नसतात

पेट्रोल परवडेनासे झाले तर ऋन्मेषचे धागे बंद होतील. पेट्रोल साठी दोन नोकऱ्या कराव्या लागतील.

इलेक्ट्रिक सायकल खूपच छान पर्याय आहे. अति दमणूक होत नाही त्यामुळे घामही कमी येतो. सकाळी किंवा संध्याकाळी तर आजिबातच थकायला होत नाही. थोडा वेळ जास्त लागतो पण फायदे अनंत आहेत.
किमतीच्या दृष्टीने तर फारच किफायतशीर आहे. २६ हजारापासून डिसेंट सायकल्स मिळतात. एका चार्जला एका युनिटपेक्षा कमी वीज लागते आणि एका चार्जमध्ये २० ते ३० किलोमीटर (depending on the level of paddle assist you use) सहज जाता येते आणि अगदी संपलीच बॅटरी तर पॅडल मारता येतेच! जर थोडे सामान आणायचे असेल तर एखादे छोटे बास्केट बसवता येते.
जाणवलेले तोटे -
1. पावसाळ्यात इलेक्ट्रिक सायकल कशी चालते ते पाहीले नाही अजून.
2. चोरीला जायचा धोका टू व्हिलर पेक्षा जास्त असतो. पण जर घर ते अॉफिस 1से जायचे असेल तर हा प्रश्न येत नाही. इतर बऱ्याच ठिकाणी सुरक्षित पार्किंग मिळू शकते. चांगल्या लॉक च्या आणि इन्शुरन्स काढता येईल का या दोन्हीची उत्तरे मिळाली तर आवडेल.

मला अर्थशास्त्रातले काही कळत नाही..

मी पेट्रोल वर चालणारे वाहन चालवायला सुरुवात केली तेंव्हा पेट्रोल ७ रु लिटर होते पुढील २०-२२ वर्षात ते ५२ ते ५३ रु झाले. साधारण ७-८ पट वाढलेले. गेल्या ११ वर्षात ते साधारण दुप्पट म्हणजे सध्या ११० रु आहे. २०१३ साली पेट्रोल ८१ रु लिटर होते

पुर्वी एकदम भाववाढ व्हायची आता रोज थोडी थोडी होते. आणि पुर्वी प्रमाणेच निवडणु़कींच्या काळात थोडे भाव कमी करुन पुन्हा वाढविली जाते.
प्रत्येक वेळी आपण म्हणतो मी आता सायकल काढणार वापरायला तेलपाणी करुन २-४ दिवस वापरून पुन्हा सायकल गंजायला ठेवून देतो.

मी पेट्रोल वर चालणारे वाहन चालवायला सुरुवात केली तेंव्हा पेट्रोल ७ रु लिटर होते पुढील २०-२२ वर्षात ते ५२ ते ५३ रु झाले. साधारण ७-८ पट वाढलेले. गेल्या ११ वर्षात ते साधारण दुप्पट म्हणजे सध्या ११० रु आहे. २०१३ साली पेट्रोल ८१ रु लिटर होते

>>

म्हणजे मागच्या ११ वर्षात पेट्रोल ७-८ पट वाढले असते तरच ते महाग झाले आहे असं तुम्हाला वाटलं असतं का?

पण मी काय म्हणतो, मुळात प्रवास करावाच का कोणी? घरून काम करायचं आणि ऑनलाईन गोष्टी घरी मागवाव्या.
भाकरी मिळत नसेल तर केक खायचा ना. हाकानाका

तुमच्या डोक्यात या संकटापासून वाचण्यासाठी काही मार्ग असेल तर सांगा.

>>

हाकलून लावा या सरकारला.
मूळ किमतीवर भरमसाठ कर लाऊन ठेवलाय.

म्हणजे मागच्या ११ वर्षात पेट्रोल ७-८ पट वाढले असते तरच ते महाग झाले आहे असं तुम्हाला वाटलं असतं का?>>>

अजिबात नाही. ५ पैश्याने वाढले तरी ते कालच्या पेक्षा आज महागच वाटणार ना. पण ७ रु लिटर होते तेंव्हा जेवढी माझी क्रय शक्ती होती तेवढीच आज आहे म्हणून तर मी पेट्रोल भरू शकतो ४ दिवस सायकलचा गाजावाजा करून पुन्हा पेट्रोल भरायला गाडी नेतो.

पेट्रोलच्या किंमती का वाढत आहेत? पेट्रोल/ ऑईल साठा संपत आला आहे का? की परराष्ट्र धोरणाचा फटका म्हणून किंमती वाढत आहेत? म्हणजे परराष्ट्र धोरण उद्या बदलले की पेट्रोलच्या किंमती कमी होतील का? सगळ्या ऑटोमोबाईल कंपनींनी पेट्रोल/डिझेल गाड्यांच्या इंजिनवर चालणार रिसर्च थांबवला आहे आणि इलेक्ट्रिक मोटारींच्या रिसर्चवर प्रचंड खर्च करत आहेत. आपल्या टाटांनी नेकसोन आणि आलट्रोज ह्या इलेक्टरीक मोटारी बाजारात आणल्या आहेत. इलेक्ट्रिक मोटारींचं भविष्य काय? ह्या मोटारी विजेवर चालवतात. आपल्या देशात किती टक्के वीज ही थर्मल आणि nuclear पॉवर प्लांटस मध्ये बनवली जाते? म्हणजे उद्या कोळसा आणि युरेनियमची कमतरता भासली तर जी गत आत्ता पेट्रोल गाड्यांची आहे तीच इलेक्ट्रिक मोटारींची व्हायची.

केया, कधी चालवली नाहीये हायवेवर पण जर आजुबाजुला सगळा heavy vehicle traffic असेल तर मग ते सुरक्षित नसेल माझ्या मते. पण जर आजूबाजूला सगळे टू व्हिलर किंवा रिक्षावाले असतील तर चालून जाईल. हायवेचा सिटी ट्रॅफिकवाला भाग असावा असं गृहीत धरून लिहीतेय. इलेक्ट्रिक सायकलची सवय व्हावी लागते मात्र.

माझ्याकडे मटणावर चालणारी कार आहे.
पेट्रोलचे भाव मटणाच्या भावापेक्षा जास्त झाले की मी मटणावर चालणारी कार वापरायला सुरवात करेन.
नवीन Submitted by मानव पृथ्वीकर on 27 October, 2021 - 05:04

>>> आयडी चुकला का Happy

पेट्रोल किती रुपये गेल्यावर तुम्ही गाड्या वापरणे बंद कराल???>>>>>>>>>>>>>>>
घरातले पछाडलेपण संपले वाटते म्हणुन दुसरी चिंता भेसवडते आहे?

हाकलून लावा या सरकारला.
मूळ किमतीवर भरमसाठ कर लाऊन ठेवलाय.>> कोणत्या सरकारला हाकलायचे? केंद्र की राज्य सरकार? दोघांनी कर लावले आहेत.

माझ्याकडै इलेक्ट्रीक स्कूटर आहे. ११० किमी जाते. पावसाळ्यात पण काही प्रॉब्लेम नाही. हल्ली ट्रॅफिक मध्ये कार ने जायचं जिवावर येत. हायवेला कारच.
परिस्थिती जर जास्तच हलाखीची झाली तर हेलिकॉप्टर शिवाय पर्याय नाही.

पेट्रोल परवडेनासे झाले तर ऋन्मेषचे धागे बंद होतील. पेट्रोल साठी दोन नोकऱ्या कराव्या लागतील.
Submitted by शांत माणूस on 27 October, 2021 - 16:23
>>>>

मुळात माझ्याकडे दुचाकी / चारचाकी कुठल्याही चाकाची गाडी नाहीये.
आणि भविष्यात कधीही घेणार नाही.
का?
हा स्वतंत्र धाग्याचा विषय आहे. काढतो. पेट्रोलच्या धाग्यात नको.

तुमची हादरली आहे पण या विषयाने माझी भादरली आहे. आज रात्री काढतो धागा. उद्या नक्की वाचायला या Sad

Pages