Breaking News
एकनाथ शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्या बाबत निर्णय विधान सभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे.
एकनाथ शिंदें गट तसेच उद्धव ठाकरे गट अश्या दोन्ही गटाचे सर्व आमदार पात्र ठरले.
आता सरकार बदलणार नाही त्यामुळ राज्यसेवा/Combine/सरळसेवा भरतीसाठी जे प्रयत्न करणे सुरु आहे ते करत रहावे
टिप :- या निकाला बाबत कोणीही आपापसांत वाद घालु नका कारण हे राजकारणी कोणाचेच नसतात त्यामुळे आपल्याला अगोदर आपली हक्काची नोकरी मिळवणे महत्वाचे आहे**.**.
https://www.reddit.com/r/mipa/
बंगाल मध्ये राशन घोटाळा (तांदूळ वरील हमीभाव मध्ये घोटाळा) ED च्या रडार वर आला आणि त्यांनी पश्चिम बंगाल मध्ये धाड सत्र सुरु केले. धाडीसाठी गेलेल्या ED च्या ऑफिसर वर संदेशाखली या गावात हल्ला करण्यात आला आणि वाहनांची नासधूस करण्यात आली. ह्यावर भाजपा नेत्यांनी वक्तव्य दिलेच आहेत पण काँग्रेसचे पश्चिम बंगाल मधील प्रभारी आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते श्री अधीर रंजन चौधरी यांनी राज्यात (पश्चिम बंगाल) कायदा व सुव्यवस्था शिल्लक राहिली नसल्याचे वक्तव्य दिले आणि सोबतच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी सुद्धा केली.
नव्या शतकात बदलत असलेल्या भू-राजकीय परिस्थितीत भारतीय नौदलाला आपल्या ताफ्यात बॅलिस्टिक क्षेपणास्त्रवाहक अणुपाणबुड्यांबरोबरच (SSBN) हल्लेखोर अणुपाणबुड्यांचीही नितांत गरज भासत होती. त्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलासाठी नेर्पा ही अकुला-2 वर्गातील हल्लेखोर अणुपाणबुडी भारतानं भाड्यानं घेतलेली होती. भारतीय नौदलाची शक्ती वाढवण्याच्या दृष्टीनं ते एक महत्वाचं पाऊल होतं. वाजपेयी सरकारच्या काळात 2004 मध्ये भारत आणि रशियामध्ये या पाणबुडीसंबंधीचा करार झाला होता. त्यानुसार आधी रशियाकडून अकुला-2 वर्गातील दोन अणुपाणबुड्या 10 वर्षांसाठी भाड्यानं घेण्याचा निर्णय झाला होता.
चार-धाम परियोजने ( Chara Dham Project - CDP) अंतर्गत सिल्क्यारा, उत्तराखंड, येथे ४.५ कि मी लांबीच्या बोगद्याचे काम सुरु आहे. १२ नोव्हेंबर २०२३ या दिवशी पहाटे ५:३० वाजता या बोगद्याचा काही भाग कोसळला . घटनेला दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ झाला आहे, आणि बोगद्याच्या आत मधे ४१ कामगार अडकले आहेत. CDP प्रकल्प ८९० किमी लांबीचा आहे आणि एकंदर प्रकल्पाचा खर्च १२,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त अपेक्षित आहे. बोगद्याच्या बांधकामामुळे यात्रेकरुंचा प्रवासाचा मार्ग २५ किमी ने कमी होणार आहे. बोगद्याच्या बांधकामाचा कंत्राट ( नवयुगा इंजिनियरींग कंपनी लिमिटेड कडे होता.
मालदिवजमध्ये अलीकडेच झालेल्या राष्ट्रपती निवडणुकीत Progressive Party of Maldives चे मोहंमद मुईझ्झू विजयी झाले आहेत. मुईझ्झू यांचा कल चीनकडे झुकलेला असल्यामुळं त्यांच्या कार्यकाळात मालदिवजमध्ये चीनचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. निवडीनंतर लगेचच त्यांनी केलेल्या वक्तव्यांवरून ते स्पष्ट होत आहे. मालदिवजमध्ये घडत असलेल्या या घडामोडींमुळं भारताची चिंता वाढणं स्वाभाविक आहे.
भारतास हवा असणारा खलिस्तानी अतेरिकी निज्जर कॅनडा मध्ये मारला जाण्याअगोदर पासूनच भारतास हवे असलेले पण पाकिस्तान आणि कॅनडा मध्ये आश्रयास असलेले तब्बल १८ टॉप मोस्ट अतेरिकी un known व्यक्ती कडून संपवले गेले होते .
जून महिन्यात निज्जर वर हल्ला झाला , त्या बद्दल भारतावर आरोप करण्यासाठी कॅनडाचा पंतप्रधान जस्टीन ट्रूडो ला चार महिने लागले .
त्याच्या आरोपांना केराची टोपली दाखवल्या मुळे
आरोप करताना आक्रमक असलेला ट्रूडो आठ दिवसांत मवाळ झालेला दिसला .