
मराठवाड्यातील एक हुतात्मा स्मारक (२०१८)
१५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाले. पण याच देशाच्या एका भूभागातील जनतेचा स्वातंत्र्य लढा अजूनही सुरूच होता. हैदराबाद स्टेट नावाच्या, मराठवाडा, तेलंगण आणि कल्याण-कर्नाटक या भूभागावर मीर उस्मान अली खान या निजामाचे राज्य होते. हा प्रदेश निजामाच्या जुलमी राजवटीखाली भरडला जात होता. रझाकारांच्या अत्याचारांमुळे सामान्य हिंदू प्रजा त्रस्त झाली होती. हिंदू समाजावर सार्वजनिक पूजा, मिरवणुका, उत्सव साजरे करणे मंदिरे बांधणे, यावर बंदी होती. जबरदस्तीची धर्मांतरे, बलात्कार, लुटालूट, जाळपोळ असा क्रूर अत्याचार सुरूच होता; नव्हे उत्तरोत्तर वाढतच होता.
हैदराबाद स्टेटचाचा नकाशा (1909) (चित्र विकीवरून साभार)
या दडपशाहीतून मुक्त व्हावे आणि भारतीय प्रजासत्ताकात सामील व्हावे यासाठी ठिकठिकाणी आंदोलने, चळवळी क्रांतिकारी कारवाया इ. सुरु होत्या. स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, हुतात्मा गोविंद पानसरे यांसारख्या नेत्यांसह अनेक सामान्य लोकांनी तुरुंगवास, छळ आणि हौतात्म्य पत्करले.
भारतीय प्रजासत्ताकाचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी निजामाशी बोलणी करून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुरु केला; पण निजाम आणि त्याचा रझाकार नेता कासीम रिझवी यांना बोलणी मान्य नव्हती. हैदराबाद स्टेट भारतात सामील करण्याऐवजी ते स्वतंत्र ठेवण्याचा किंवा पाकिस्तानात विलीन करण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
शेवटी, १३ सप्टेंबर १९४८ रोजी, भारत सरकारने "ऑपरेशन पोलो" ही कारवाई सुरू केली. भारतीय सैन्याने केवळ तीन दिवसांत निजामाच्या सैन्याचा पराभव केला आणि १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाने शरणागती पत्करली. त्यानंतर हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले.
सरदार पटेलांना शरण आलेला निझाम (चित्र जालावरून साभार)
हा केवळ लष्करी मोहिमेचा विजय नव्हता, तर तो जनआंदोलनाचाही विजय होता. असंख्य हुतात्म्यांच्या बलिदानामुळे आणि भारतीय सैन्याच्या धाडसी कारवाईमुळे अखेर हा प्रदेश निझामापासून स्वतंत्र झाला.
आज १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा, तेलंगण आणि कल्याण-कर्नाटक मुक्ती दिनाला ७७ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने या मुक्तीसंग्रामामध्ये भाग घेतलेले भारतीय सैनिक, स्वातंत्र्यसैनिक, अनामिक हुतात्मे यांना अभिवादन.
मराठवाडा मुक्ती संग्रामावर मायबोलीकरांचे विचार व आठवणी वाचायला, चर्चा करायला आवडेल.
* संग्रामामध्ये भाग घेतलेले
* संग्रामामध्ये भाग घेतलेले भारतीय सैनिक, स्वातंत्र्यसैनिक, अनामिक हुतात्मे यांना अभिवादन.>>> + ११
संग्रामामध्ये भाग घेतलेले
संग्रामामध्ये भाग घेतलेले भारतीय सैनिक, स्वातंत्र्यसैनिक, अनामिक हुतात्मे यांना अभिवादन >> +1
_/\_
77 वर्षे जुन्या घटनेवर आठवणी
77 वर्षे जुन्या घटनेवर आठवणी कोण लिहिल याबाबत शंका आहे..
पण माहिती वाचायला आवडेल. फार कमी माहीत आहे याबद्दल.
संग्रामामध्ये भाग घेतलेले
संग्रामामध्ये भाग घेतलेले भारतीय सैनिक, स्वातंत्र्यसैनिक, अनामिक हुतात्मे यांना अभिवादन >> +100
_/\_
संग्रामामध्ये भाग घेतलेले
संग्रामामध्ये भाग घेतलेले भारतीय सैनिक, स्वातंत्र्यसैनिक, अनामिक हुतात्मे यांना अभिवादन >> +1