राजकारण

एकनाथ शिंदे सरकारचा धांडोळा

Submitted by हस्तर on 30 September, 2023 - 07:44

भाजप वगैरे सरकारचा इथे धांडोळा मांडलाय पण चला आत्ताच्या शिंदे सर कारच्या पण चुका बघू
मुख्य म्हणजे गुरुवारी सुट्टी होती
बुधवारी अचानक gr निघाला ४ वाजता कि शुक्रवारी
पण सुट्टी
ह्यात गोम काय ?

तर गुरुवारची सुट्टी अचानक रद्द,सेंट्रल govt ची नव्हती पण स्टेट ची झाली
जे लोक लौकर काम आटपून गावी निघाले त्यांच्या बोंबा
ज्यांनी सिनेमा तिकीट बुक केले किंवा काही प्रोग्रॅम ठरवलं त्यांची तारांबळ

बाकी बोला

विषय: 

नौव मन तेल निकलेगा तब नाचेगी राधा ।

Submitted by ashokkabade67@g... on 21 September, 2023 - 04:25

नव्या संसद भवनात आमच्या विश्वगुरुंनी महिलाआरक्षण नावाच एक ऐतेहासिक विधेयक आणल कारण निवडणूक जवळ आली याच विधेयकाला काही काळापुर्वी भाजपचे एक बलशाली नेते व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीजींनी विरोध केला होता पण तो विषय नाही मतेमतांतरे लोकशाहीत असणारच.एव्हढा गाजावाजा करत आणलेल्या या विधेयकाला कुणीही (फक्त दोन खासदार वगळता)विरोध न करता पाठिंबा देत हे विधेयक पास झाले .

नवा यशवंत कोण....?

Submitted by ASHOK BHEKE on 8 September, 2023 - 08:22

नुकतीच महापालिका प्रभाग आरक्षण सोडत निघाली. जवळजवळ अर्ध्यापेक्षाही अधिक दिग्गज नैराश्याच्या गर्तेत गेले. काहीजण आपला मतदारसंघ शाबूत असल्याने सुखावले. यावेळी महिला महापालिका सभागृहात ५०% हून अधिक असणार, हे निश्चित झाले. त्या सर्वसाधारण जेथे पुरुषांना संधी आहे तेथे विद्यमान नगरसेविका म्हणून तिकीट स्वीकारणार आणि निवडून देखील येतील. त्यामुळे सभागृहात मात्र पुरूषांचे मताधिक्य घटणार आहे.

विषय: 

अखेर निर्णय मार्गी लागला!

Submitted by पराग१२२६३ on 1 September, 2023 - 02:46

भारतीय नौदलासाठी रसद पुरवठा जहाजं (Fleet Support Ship) बांधण्याच्या प्रकल्पाला सरकारने 2016 मध्ये मान्यता दिली होती. आता त्यासंबंधीचा करार संरक्षण मंत्रालय आणि विशाखापट्टणममधील हिंदुस्थान शिपयार्ड लि. यांच्यात 25 ऑगस्ट 2023 ला करण्यात आला आहे. त्या करारामार्फत भारतीय नौदलासाठी 5 अशी जहाजं स्वदेशातच बांधली जाणार आहेत. हा संपूर्ण व्यवहार 19,000 कोटी रुपयांचा असणार आहे. या जहाजांचे आरेखन आणि बांधणी पूर्णपणे स्वदेशी असणार आहे. यातील प्रत्येक जहाजाचं एकूण वजन सुमारे 44,000 टन असणार आहे.

भारताकडून व्हिएतनामला ‘कृपाण’ची भेट

Submitted by पराग१२२६३ on 11 August, 2023 - 06:23

Pix(3)L5DA_edited.jpg

“आजचा हस्तांतर सोहळा भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील खोलवर रुजलेल्या मैत्रीचे आणि धोरणात्मक भागीदारीचे प्रतीक आहे. यातील आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताने कोणत्याही मित्रदेशाला आपल्या नौदलातील पूर्ण-कार्यक्षम क्षेपणास्त्रवाहू नौका भेट म्हणून देण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे.” – नौदलप्रमुख ॲडमिरल आर. हरी कुमार.

"ध" चा "मा"

Submitted by Revati1980 on 26 July, 2023 - 08:35

"हा बघ, हाच तो शनिवार वाडा."
"ओह, नारायण राव पेशवे युस्ड टू स्टे हिअर, ते?"
" हं .."
"अच्छा, सॅटर्डे अपार्टमेंट.. ओके..
अरे ते अपार्टमेंट नाही बेटा, इट इज या टाईप ऑफ कॅसल."
" ओह बेटा?.. मी डॅड चा बेटा व्हर्जन का..? ...."
" हाहाहा.."
"नाही.. पण तो शनिवार किल्ला नाही. वाडा असंच म्हणायचं. किल्ला जनरली डोंगरावर असतो .
"अरे वाड्याच्या भिंती तर बघ.. फोर्ट्रेस से कम नही.."
"यप... अँड नारायण वॉज ऑर्डर्ड टू किल्ल बाय हिज अंकल. हो ना डॅड?
"होय "
अँड हिज घोस्ट स्टील हॉन्ट्स धिस प्लेस. हो ना ?
" येस, असं म्हणतात."

कंत्राटी पोलीस ? खळबळजनक निर्णय !

Submitted by ढंपस टंपू on 25 July, 2023 - 22:23

मुंबई पोलीस दलात दहा हजार पदे रिक्त पडून आहेत. यातील ३००० पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. शिक्षक भरती पाठोपाठ पोलिसांची भरतीही कंत्राटी पद्धतीने होत असल्याने खळबळ उडाली आहे. ही भरती २२ महीन्यांसाठीच आहे. त्यानंतर काय हे स्पष्ट नाही.

पण ब्रेक देऊन पुन्हा २२ महीन्यांची नव्याने भरती होऊ स्गकते असे कळते. पोलीसांसारख्या खात्यात कंत्राटी पोलीस असावेत का याबद्दल नागरिकाआंची टोकाची मतं आहेत.

किरीट सोमय्या यांचा नवा आरोप

Submitted by ढंपस टंपू on 17 July, 2023 - 21:49

विरोधकांचा भ्रष्टाचार उकरून काढणारे अभ्यासू धडाडीचे नेते म्हणून किरीट सोमय्या हे देशाला आणि राज्याला परिचित आहेत. त्यांनी अनेक जणांवर आरोप केले. त्यामुळे त्या त्या नेत्यांची ईडी, सीबीआय, एसआयटी, इन्कम टॅक्स कडून चौकशी सुरू आहे. नंतर त्या नेत्यांवरच्या आरोपांचे काय झाले हे समजत नाही.

विरोधी पक्षांचे कडबोळे भाजप ला पर्याय ठरू शकते का ?

Submitted by फुरोगामी on 17 July, 2023 - 09:10

२३ जून ला पाटण्यात भाजप विरोधी पक्षांनी बैठक बोलावली होती , त्या बैठकी ला काँग्रेस ,स पा , जे डी एस , टी एम सी ,राष्ट्रवादी , उ बा ठा शिवसेना आणि आप सहित छोट्या मोठया पक्षांचे प्रमुख नेते हजर होते .
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील विरोधी पक्षांचा भावी पंतप्रधानपदाचा चेहरा गुलदस्त्यात ठेवून भाजप ला सत्तेतून खाली कसे खेचायचे यावर चर्चा झाली , तर आप च्या केजरीवाल ने मात्र अध्यादेश विरोधात बैठकीतील पक्षांनी निषेधाचा ठराव पास करावा अपेक्षा ठेवली होती .

विषय: 

आता मतदारांनीच प्रत्येक उमेदवाराकडुन प्रतिज्ञापत्र लिहुन घ्यावे

Submitted by ashokkabade67@g... on 17 July, 2023 - 07:21

आता महाराष्ट्राच्या राजकीय दलदलीत नैतिकतेचा बळी गेला असुन आमदार खासदारांची स्वस्वार्थासाठी पक्षाचा व मतदारांचा विश्वासघात करण्याची प्रव्रुत्ती वाढत आहे आणि यात अनेक पक्षच पळवण्याची व संपवण्याची सत्ताधारी पक्षाची मनिषा उघडपणे दिसून येत आहे लोकशाहीत विरोधी पक्षाचे महत्व अन्यन्य साधारण असते पक्ष फुटतात आमदार खासदार पक्षांतर करतात पण मतदारांचे काय?तो तर कधीच फुटत नसतो प्रत्येक पक्षाच्या विचारसरणीचा मतदारांचा एक गट असतो पक्षांतर करणारे आमदार ,खासदार फक्त त्या पक्षालाच नाही तर त्या पक्षाच्या मतदारांनाही धोका देत विश्वासघात करत असतो आणि आज तेच घडत आहे पक्षांतर विरोधी कायद्यात असलेल्या पळवाटांमुळे

Pages

Subscribe to RSS - राजकारण