Submitted by सिद्धेश्वर विला... on 31 October, 2025 - 14:31
देवा, कबुतरे उडवा , हत्ती पळवा
काहीच काम करू नका
पण आम्हाला मतदान करायचंय
निदान जिवंतपणी तरी मारू नका
काय नक्की चालले आहे
तेच आम्हाला कळत नाही
शेतकरी असेच उपाशी राहिलेत
नोकरी काही मिळत नाही
बेरोजगार असेच वाढत जातील
उगा खोटी स्वप्ने दाखवू नका
असेच थुंकी फिरवत राहा देवा
खुर्ची काही सोडू नका
राम राम जप अखंड चाले
भगवा काही सोडू नका
भगिनींचा बाजार मांडला
पण आम्हा दाजींची कंबर मोडू नका
ताळतंत्र नसे दारिदरबारी
दिवाळखोरी चहूकडे
आंदोलन जागोजागी सुरु असे पण
वृत्तपत्र कोरे नागडे
एकही स्तंभ उरला नाही
दूरदूर त्राही त्राही
लोकशाहीची अंत्ययात्रा निघाली
स्वागतार्ह सरंजामशाही
------------------------------------------
सिद्धेश्वर विलास पाटणकर
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा