राजकारण

मी वाचलेलं पुस्तक : राजधानीतून… लेखक अशोक जैन

Submitted by अनया on 18 May, 2023 - 09:21

श्री. अशोक जैन ह्यांनी १९७८ च्या ऑगस्ट ते १९८९ ह्या अकरा वर्षांच्या काळात महाराष्ट्र टाइम्स ह्या मराठी वृत्तपत्राचा दिल्लीतील विशेष प्रतिनिधी म्हणून काम केले. दिल्लीत असलेल्या विशेष प्रतिनिधीने तिथल्या राजकारणावर, सत्ता मिळवण्याच्या आणि गमावण्याच्या चक्रावर नजर ठेवून आपल्या वाचकांपर्यंत त्या बातम्या पोचवणे, हे अपेक्षित होतंच. त्या व्यतिरिक्त दर सोमवारी महाराष्ट्र टाइम्समध्ये दिल्लीतील घडामोडी सांगणारं ‘राजधानीतून’ हे सदर जैन लिहीत असत.

नियोजन आणि विकास कार्याच्या यशांत जनगणनेचे महत्व

Submitted by उदय on 11 May, 2023 - 03:55

एप्रिल २०२३ मधे, भारताच्या लोकसंख्येने आकडेवारित चीनला मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला असे विविध बातम्यांत प्रसिद्ध झाले आहे. आज जगामधे सर्वात मोठी लोकांची संख्या भारतात आहे. या बातमीने आपण आनंदी व्हायला हवे का एव्हढ्या मोठ्या लोकांच्या संख्येसाठी अन्न, वस्त्र , निवारा, रोजगार यांच्या काळजीने गंभिर व्हायला हवे? दोन्हीही.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रसिद्धी माध्यमांतून प्रसारीत झालेल्या या बातमीला आधार आहे भारताने २०११ मधे घेतलेल्या जनगणनेचा.

विषय: 

पवार साहेब + भाजप ची पुढील महाराष्ट्र निवडणुकांची खेळी

Submitted by हस्तर on 2 May, 2023 - 09:49

फडणवीस काही झाली तरी मुम बनणार नाहीत आता ,एकनाथ शिंदे ह्यांच्या बऱ्याच मर्यादा आहेत आणि प्रसिद्धी माध्यमांनी त्या मुद्दामहून बाहेर काढल्या आहेत त्यामुळे किती ही लोकं उपयोगी योजना काढल्या तरी निवडणुकीत स्पष्ट बहुमत पाहिजे
मग मुख्य मंत्री पदाचे मुख्य दावेदार विखे पार्टीला,महसूल मंत्री

जेव्हा हा लेख लिहीत होतो ,पवार साहेबानी राजीनामा दिलाय
अजित पवार राष्ट्रवादीतून फुटणार अशी बातमी होते

पण साधी गोष्ट आहे ,अजित पवार मग पहाटे शपत विधी ला पण विचारून गेले होते,हे मी स्वतः लिहिले होते व नंतर सिद्ध झाले आत्ता ते थोड बंड करतील ?

साहेबांचा अध्यक्ष पदाचा राजिनामा!

Submitted by यक्ष on 2 May, 2023 - 08:07

साहेबांचा अध्यक्षपदाचा राजिनामा....!
तशी अनपेक्षित अन वादळी बातमी. नव्या पर्वाला सुरुवात?
भाकरी फिरवून झाली की फिरवणे सुरु झाली?

विषय: 
शब्दखुणा: 

महाराष्ट्रातील भविष्यातील निवडणूक अंदाज

Submitted by सचिन पगारे on 9 March, 2023 - 10:52

महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या तीन वर्षात राजकारण प्रेमींना धक्क्यावर, धक्के बसण्याचा कालावधी होता.. शिवसेनेने सोडलेली बीजेपीची साथ, म वि आ ची निर्मिती, शिंदेच् बंड, गुवाहाटी, गुजरात, गोवा ह्या राज्यात घेतलेला आश्रय, ठरेंचा राजीनामा, म वि आ चे सरकार पडणे, शिंदे फडणवीस सरकार येणे, फडणवीसांना उपमुख्यमंत्री करणे, निवडणूक आयोगा कडून शिंदे कडे शिवसेना देणे. बऱ्याच घडामोडी अजून घडणार आहेत. ह्या घटनाचं इतक्या अनाकलनीय होत्या की एकही राजकीय ज्योतिषी तोंड उघडायला तयार नाही . आपली झाकली मुठ सव्वा लाखाची बरी.

विषय: 

START संधी

Submitted by पराग१२२६३ on 7 March, 2023 - 03:58

21 फेब्रुवारी 2023 ला रशियन राष्ट्रपती व्लदिमीर पुतीन यांनी जाहीर केलं की, रशिया नव्या व्यूहात्मक अस्त्र कपात संधीमधला (New START) आपला सहभाग संस्थगित करत आहे. सध्याच्या परिस्थितीत पाश्चात्यांचा रशियाबाबत असलेला दृष्टिकोन विचारात घेऊन हा निर्णय घेतल्याचं राष्ट्रपती पुतीन यांनी म्हटलं आहे.

विजयाचा खोटा डांगोरा काय पिटता।तीन राज्यात भाजपला एकुण जागा किती हेही सांगा।गा

Submitted by ashokkabade67@g... on 4 March, 2023 - 01:15

महाराष्ट्रात कुठल्याही न्युज चँनलने मेघालय ,त्रिपुरा, व नागालँड येथील निवडणुकीचे सखोल विश्लेषण केले नाही(बहुतेक वरून आदेश नसावा कारण मग विजयाचा डांगोरा किती खोटा आहे हे जनतेला कळले असते )पण भाजपने मात्र काँग्रेसचा सुपडा साफ झाला आणि भाजप विजयी झाला असे चित्र निर्माण करत खोट्या विजयाचा डांगोरा पिटला तसे या बाबतीत महाराष्ट्रात भाजप नेते पटाईत आहेतच म्हणा पण विजयाचा डांगोरा पिटतांना कोणत्या राज्यात भाजपला किती जागा मिळाल्या हे मात्र सोईस्कररीत्या सांगायला विसरले।
मेघालयमधे एकुण जागा 59 भाजपला जागा मिळाल्या 2.

भारतीय आकाशात अवतरला अजस्त्र पक्षी

Submitted by पराग१२२६३ on 22 February, 2023 - 13:28

अलीकडेच बेंगळुरूजवळच्या यलहंका हवाईतळावर पार पडलेल्या Aero India 2023 हवाई प्रदर्शनात अमेरिकेच्या बी-1बी या व्यूहात्मक बाँबफेकी (Strategic Bomber) विमानांनी अचानक लावलेली हजेरी आणि त्याचबरोबर अमेरिकेच्या एफ-35 लाटनिंग-2 या पाचव्या पिढीच्या लढाऊ विमानांनी त्यात घेतलेला सहभाग या विशेष लक्षवेधक घटना ठरल्या. याच प्रदर्शनात रशियाच्या United Aircraft Corporation नं असं जाहीर केलं की, या कंपनीनं आपल्या नव्या Tu-160M या व्यूहात्मक बाँबफेकी विमानाचे नामांतर तेरेश्कोव्हा/Tereshkova (रशियन नाव – Tерешкова, रशियन उच्चार – तिरिष्कोवा) असं केलं आहे.

भाजप आणि मनोरंजन फेब मार्च०२३०२३

Submitted by हस्तर on 15 February, 2023 - 08:51

सगळयात मोठा बॉम्ब ह्या वेळी हा आला कि फडणवीस ह्यांनी स्वतः कबुल केले कि पहाटेचा शपथ विधी पवार साहेबांनी स्पॉन्सर केला होता
हे मी आधी एका धाग्यावर टाकले होते
पण आता प्रश्न
१) आत्ताच का कबुली दिली >. माझ्या मते शिवसेना राष्ट्रवादीचे फाटावे म्हणून
२) अजून काही गोष्टी सांगायच्या आहेत ?
माझ्या मते ३ दिवसाच्या सरकारने कोणत्या फाईल फिरवल्या आणि शपथविधी करून सरकार का स्थापन करता नाही आले

अजून काय असेल ?

विषय: 

Pages

Subscribe to RSS - राजकारण