Submitted by भरत. on 14 July, 2025 - 03:03
इथे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा व करू.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इथे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा व करू.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लोकसत्ता लोकसंवाद या कार्यक्रमात अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.
त्यातला पहिला
२०२४ च्या निवडणुका युतीच्या माध्यमातून आणि २०२९ च्या निवडणुका भाजप स्वबळावर लढेल, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गेल्या वर्षी निवडणुकीच्या आधी कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले होते. महायुतीतील कोणीही नेत्याने त्याविरोधात भाष्य केलेले नाही. भाजप २०२९ च्या निवडणुकाही स्वबळावर लढविणार का, याबाबत केंद्रीय संसदीय मंडळ योग्य वेळी निर्णय घेईल. आमचे काम निवडणुकीसाठी तयारी करायचे आहे. केंद्रीय नेतृत्वाच्या निर्णयानुसार निवडणुकीच्या वेळी कार्यवाही केली जाईल. आम्ही २०२९ च्या निवडणुकीत ५१ टक्के मते मिळविण्याच्या दृष्टीने लढाईची तयारी करीत आहोत. पण आम्ही मित्रपक्षांना शब्द (कमिटमेंट) दिला आहे आणि तो पाळणारच. कोणताही शब्द पाच वर्षांसाठी असतो.
त्यावर आज आलेले एक वाचकपत्र
भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची विविध मुद्द्यांवरील मते, भाष्ये ‘लोकसत्ता लोकसंवाद’ वर आधारित लेखात (१३ जुलै) वाचली. भाजप २०२९ च्या निवडणुकीत ५१ टक्के मते मिळवण्याच्या उद्दिष्टाने लढाईची तयारी करीत आहे असे ते म्हणतात, त्यासंदर्भात हल्लीच झालेल्या विधानसभा निवडणुकीची आकडेवारी आठवते : भाजपला २६.७७ टक्के, तर ‘महायुती’ला एकूण ४९.३० टक्के मते. सर्वात जास्त जागा जिंकून भाजप हा क्रमांक एकचा पक्ष बनला. जर आगामी निवडणुकीत ५१ टक्के मते भाजपलाच हवी असतील तर महायुतीतील मित्र पक्षांना गिळंकृत केल्याशिवाय हे शक्य नाही आणि भाजपचे आपल्या मित्र पक्षांशी देशव्यापी वर्तन पाहता ते तसे करणार नाहीत असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरेल. सतरंज्या झटकणाऱ्या मूळ कार्यकर्त्यांना काहीतरी ठोस कार्यक्रम द्यायचा म्हणून बहुधा ‘५१ टक्के’ चा टास्क दिला असावा.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
परंतु पक्ष संघटना म्हणजे विचारांची शिस्त असते, निव्वळ विजय संख्या नव्हे याचे भान हरपलेल्या भाजपला कोणत्याही पक्षात गुन्हे दाखल असलेला नेता- जर मतदारसंघात जिंकण्याची क्षमता बाळगत असेल तर- साम, दाम, दंड, भेद वापरून त्याच्या गळ्यात भागवे उपरणे घालून त्यांस पापमुक्तीचा आनंद देताना पदोपदी पाहायला मिळाले आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थिती बदलून दाखवली असे भाष्य भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी केले, परंतु हा दावा खोडून काढण्यास शेतकरी आत्महत्यांची वाढलेली आकडेवारी बोलकी आहे. नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष आजही जुन्याच मांडणीत नव्या ओळी रचत आहेत. ना नव्या दिशा, ना राजकीय प्रामाणिकपणा. कोणत्याही गोष्टी स्पष्ट नाही. फक्त स्पष्टता एकाच बाबतीत ती म्हणजे काहीही करून, कसेही करून सत्तेच्या केंद्रस्थानी राहणे.
आता २०२९ पर्यंत अजित पवार आणि एकनाथ शिंदे आपापले पक्ष भाजपमध्ये विसर्जित करतील का?
श्रीकांत शिंदेना आयकर
श्रीकांत शिंदेना आयकर विभागाची नोटीस आली असे शिरसाट म्हणाले होतेच. त्यांनी नंतर सारवासारव केली हा भाग अलाहिदा. अशा गोष्टी आता वारंवार होतील आणि मग खाविंदचरणी मिलिंदायमान होण्याखेरीज काहीही पर्याय दादा -शिंदे गटाकडे नसेल.
मग खाविंदचरणी मिलिंदायमान
मग खाविंदचरणी मिलिंदायमान होण्याखेरीज काहीही पर्याय दादा -शिंदे गटाकडे नसेल.>> असे जर झाले तर काहीजण परत ठाकरे /पवार गटाकडे जातील. पुढच्या महिन्यातील शिवसेनेच्या पक्ष चिन्हाची केस येत आहे सुनावणीला, त्याच्या निकालावर पण बरेच काही अवलंबून आहे.
हा चांगला धागा आहे.
हा चांगला धागा आहे. महाराष्ट्रात सर्वच पातळ्यांवर खूप काही चांगले, वाईट घडत आहे. गेल्या तीन वर्षांत तर अकल्पित राजकीय घटना घडल्या आहेत. अजूनही घडत आहेत.
जे काय सुरु आहे त्याला "राज
जे काय सुरु आहे त्याला "राज"कारण म्हणतात???
आता एका नव्या गटाची चर्चा
आता एका नव्या गटाची चर्चा सुरू आहे..... चड्डी बनियन गँग.
'ठोसे'घरची चड्डी-बनियन गॅंग
'ठोसे'घरची चड्डी-बनियन गॅंग
अशी बातमी आहे की चिंतन
अशी बातमी आहे की चिंतन शिबिरात राज ठाकरे यांनी सांगितले की विजयी मेळावा फक्त मराठी भाषेसंदर्भात होता. त्याचा युती होण्याशी काही संबंध नाही. तेव्हा स्थानिक निवडणुका कशा लढायच्या हे अजून ठरलेले नाही.
https://m.thewire.in
https://m.thewire.in/government/as-maharashtra-govt-brings-bill-against-...
रवींद्र चव्हाण - लोकसत्ता
रवींद्र चव्हाण - लोकसत्ता लोकसंवाद
भाजपमध्ये अनेक गुंड प्रवृत्तीच्या किंवा गुन्हे दाखल झालेल्या नेत्यांना प्रवेश देण्यात आला आहे, असा आक्षेप घेतला जातो. पण संविधान व कायद्याच्या दृष्टीने आरोप होणे व तो सिद्ध होणे यात मोठा फरक आहे. (आरोप करून तो सिद्ध करायचा की नाही, हे ठरवायचे स्वातंत्र्यही असतेच
)
आम्ही अन्य पक्षातील नेत्याला प्रवेश देण्याआधी पारखूनच घेतो. भाजपच्या मूळ तत्त्वाला अनुसरून कोणीही नेता पक्षाबरोबर येण्यास तयार असेल, तरच त्याला आम्ही प्रवेश देतो. पक्षात आल्यावर त्याने चुकीचे वर्तन केले तर त्याला पाठीशी न घालता कारवाई केली जाते. भाजपमध्ये व्यभिचाराला थारा नाही. एखाद्या गुन्हे दाखल असलेल्या नेत्याबद्दल आक्षेप घेतला जातो, पण त्याला तीनचार लाख मतदारांकडून निवडून दिले जाते. त्यामुळे एखाद्याकडे आपण कोणत्या चष्म्यातून पाहतो, ते महत्त्वाचे असते.
अन्य पक्षातून आलेल्या नेत्यांच्या राजकीय भूमिका परिस्थितीनुरूप बदलतात. तो नेता ज्या पक्षात असतो , त्यानुसार त्या पक्षाची तो बाजू मांडत असतो.
रवींद्र चव्हाण - पुढे चालू.
रवींद्र चव्हाण - पुढे चालू.
हिंदी सक्तीचा मुद्दा विरोधकांनी अकारण तापवला असून निवडणुकीवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. मतदार भावनिक राजकारणाला प्रतिसाद देणार नाहीत ( एक है तो सेफ है ?) ते विकासाच्या मुद्द्यांवरच मतदान करतील
ठाकरे बंधू कुटुंब म्हणून एकत्र आले याचा आम्हांला आनंदच आहे. ते राजकारणातही एकत्र येतील का, हे माहीत नाही.
कांग्रेस महापालिका निवडणूक
जयंत पाटील अध्यक्षपदावरून बाजूला.
१९ व २० जुलै रोजी सर्व
१९ व २० जुलै रोजी सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत असे समजले. त्या दोन दिवशी संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेणार आहेत असे समजले. प्रश्न कोणते आहेत हे टीझरमध्ये किंचित दाखवण्यात आले.
शशिकांत शिंदे यांचे अभिनंदन!
शशिकांत शिंदे यांचे अभिनंदन! राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला अजूनच उभारी मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
विधान भवनातील लॉबीत मारामारी
विधान भवनातील लॉबीत मारामारी ? या हिंसाचाराचा बोलविता धनी कोण आहे गृहमंत्री पुढील काही महिन्यांत शोधून काढतील आणि दोषींवर ( अजित पवारां च्या गटाचे असल्यास त्यांची परवानगी मिळाल्यावर ) कडक कारवाई करतील अशी अपेक्षा.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. या हिंसाचाराशी संबंधीत आरोप असणार्या मंत्रीमंडळातील एका मंत्र्याचा राजिनामा घेण्या साठी काही महिने लागले होते.... बीड जिल्ह्यातल्या आरोपींना ( कराड कंपनी ) बेड्या ठोकतांनाही पोलीस घाबरत होते एव्हढे दहशतीचे वातावरण होते.
संतोष देशमुख प्रकरणांतले सर्व आरोपी पकडल्या गेले आहेत ? तीन तीन महिने एका मंत्र्याचा राजिनामा घेण्यासाठी लागत असतील तर या महत्वाच्या काळां त गुन्ह्याशी संबंधीत सर्व पुरावे / साक्षिदार जागेवर सुरक्षित राहिले असतील का?
कृषिमंत्री सदनात मोबाईलवर रमी
कृषिमंत्री सदनात मोबाईलवर रमी खेळतात
गृहराज्यमंत्र्यांच्या (ह्यांचे पिताश्री देखील गृहराज्यमंत्री होते) मातोश्रीच्या नावावर बारचा परवाना ,ज्यावर कारवाई झाली
बाकी चड्डी-बनियन गँगबाबत बोलायला नकोच
काल सुनील तटकरेंच्या अंगावर पत्ते फेकुन कृषिमंत्र्याबाबत जाब विचारला म्हणून छावा संघटनच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली.
बहुतेक बिहारमधे 'हम बिहारको महाराष्ट्र नही बनने देंगे' अशी घोषणा ह्यापुढे लोकप्रिय होईल
जे काय सुरु आहे त्याला "राज
जे काय सुरु आहे त्याला "राज"कारण म्हणतात???
नवीन Submitted by अलीबाबा on 14 July, 2025 - 20:46
नाही, याला फक्त विकृत सत्ताकारण म्हणू शकतो
महाविकास आघाडीचं सरकार
महाविकास आघाडीचं सरकार असताना विरोधी पक्षीय आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर बसून येणार्या जाणार्या सत्ताधारी आमदारांना टारगट शाळकरी पोरांसारखं चिडवणं सुरू झालं. आता महाविकास विरोधात आल्यावर तेही हाच प्रकार करताहेत.
गायकवाड नामे आमदाराने आमदार निवास कँटीनच्या कर्मचार्याला मारहाण केली तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आमदार माजलेत, असं जनता म्हणतेय हे कळलं नव्हतं. तेच आव्हाड - पडळकरांच्या कार्यकर्त्यांत विधानभवनाच्या आवारात हाणामारी झाल्यावर त्यांना हा साक्षात्कार झाला. फक्त सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या कार्यकर्त्याने मारहाण केली असती, तर झाला असता का? पडळकर, राणे यांच्या डोक्यावर कोणाचा
हात आहे, हे त्यांनी स्वतःच बोलून दाखवलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त:
शरद पवार यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव! इतका हुषार व प्रामाणिक नेता पाहिला नाही असे उद्गार! इतके कार्य करतात आणि थकत कसे नाहीत अशी प्रशंसा!
उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
(येथील काही मान्यवर सदस्यांना श्री शरद पवार व श्री उद्धव ठाकरे यांचे वर्तन कदाचित पटणार नाही, पण ते दोघे असे बोलले हे टीव्हीवर पाच, सहावेळा दाखवले)
(No subject)
फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त
फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त एका कॉफी टेबल बुकचं प्रकाशन करण्यात आलं. पुस्तकाची कल्पना गिरीश महाजन यांची. या पुस्तकात इतरांसोबत शरद पवार, उद्धव ठाकरे यांचेही लेख आहेत.
त्यांच्या हातून व्यापक जनहिताची कार्ये पार पडतील, देशहितासाठी त्यांचं योगदान लाभो याकरिता माझ्या शुभेच्छा आहेत. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राची अस्मिता राखण्यासाठी, महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी, महाराष्ट्राची पुरोगामी, विज्ञानवादी आणि सांस्कृतिक परंपरा पुढे नेण्यासाठी अधिक स्वयंभू होवोत. त्यासाठी त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाबो ही सदिच्छा वाढदिवसाच्या निमित्ताने व्यक्त करतो. असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना दिल्लीत जबाबदारी मिळो अशा शुभेच्छा दिल्यात
बिहारचे नाव खराब कशाला
बिहारचे नाव खराब कशाला करताहेत? आपली दंगल आवरा.
देवेंद्र फडणवीस आणि आशिष
देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांनी रोज किमान एकदा अर्बन नक्षलींचं नाव घ्यायचं व्रत घेतलं आहे का?
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींवर बंदी - अर्बन नक्षलींचं कारस्थान - आशिष शेलार.
जनसुरक्षेमुळे विकासमार्ग मोकळा होणार - भाजप प्रदेशाध्यक्ष.
गडचिरोलीत तथाकथित नक्षलवादी संपवले. आता तिथे स्टील फॅक्टर्या येणार्या. स्थानिक आदिवासींनी ब्र काढला की त्यांना नक्षलवादी ठरवून मारायचं.
ते पुण्यात एक दिवसाआड टोळकी
ते पुण्यात एक दिवसाआड टोळकी जमून 20-25 गाड्या फोडत असतात. उठा / शप ह्यांच्यावर लक्ष Thevun असणारे गृहमंत्री आपलेच आहेत म्हणून इथे-तिथे बघत आहेत का?
(No subject)
बखरीतील पाने.
बखरीतील पाने.
अतिशय भोंगळ कारभार सुरू आहे.
अतिशय भोंगळ कारभार सुरू आहे. सुंदोपसुंदी म्हणतात ती हीच असावी. मी आजवर भाजप सोडून कोणालाही मतदान केले नाही. हे अस लिहीताना खूपच वाईट वाटत की माझा आवडता पक्ष हे अस विचित्र राजकारण करतोय
प्राजक्ता अगदी अगदी.
प्राजक्ता अगदी अगदी.
लाडकी बहीण योजनेच्या
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांत १४००० + पुरुष आहेत. अपात्र स्त्रियांची संख्या लाखांत आहे.
लाडकी बहीण योजनेतल्या आणि शालेय शिक्षणातल्या गंमतीजंमतींसाठी वेगळा धागा हवा. येत्या आठवड्यात काढतो.
ह्या लाडक्या भावांनी 21 कोटी
ह्या लाडक्या भावांनी 21 कोटी हडप केलेत. अपात्र असलेल्या बहिणींच्या घशात किती कोटी गेले असतील. हे सर्व पैसे कोणाच्या खिशातून काढणार ? 1 कोटी 40 लाख रुपये मिळाले नाहीत म्हणुन कंत्राटदाराने आत्महत्या केली
Pages