सजाण

सजाण

Submitted by मोहना on 17 July, 2019 - 17:23

आमच्या घरातून बाहेर पडलं की रस्त्यावर कुण्णीच नसतं. रस्त्यावरचं पहिलंच घर आमचं, थोडंसं चाललं की रस्ताच वळतो. मग एकदम गर्दी, गडबड, दुकानंच दुकानं. रोजच्यासारखंच आईने माझं बोट घट्ट धरलं होतं. मी ते सोडवलं की ती पुन्हा धरते. ऐकत नाही अगदी. आई नेहमीसारखी घाईघाईत मला काकूंकडे पोचवायला चालली होती. तिथून तिला कामावर जायचं होतं. पण मला उड्या मारत, काचेच्या खिडकीतून दुकानांच्या आत बघायचं होतं. टेडी बेअर, मिकी माऊसचं जे दुकान आहे ना ते मला खूप आवडतं. मी तिथे थांबतेच. मग आई पुन्हा हात धरुन ओढते. आजही आईने तसंच केलं. तिच्या मागे मागे जाताना त्या दुकानाच्या समोर एक मुलगा बसला होता तो दिसला.

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - सजाण