स्वरलिपीतल्या बंदिशींचं टायपिंग करण्याबाबत माहिती हवी आहे
भातखंडे स्वरलिपीतल्या काही बंदीशी टाईप करायच्या आहेत. त्याची जी चिन्हे असतात ती कशी टाईप करायची?
हे काम बाहेरून करून घ्यायचे तरी कुठे करून मिळेल?
भातखंडे स्वरलिपीतल्या काही बंदीशी टाईप करायच्या आहेत. त्याची जी चिन्हे असतात ती कशी टाईप करायची?
हे काम बाहेरून करून घ्यायचे तरी कुठे करून मिळेल?
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी यांना रॉक स्टार एल्विस प्रिस्ले या नावाने संबोधले. अभिनेते शम्मी कपूर याना हिंदी सिनेमा सृष्टीचे एल्विस प्रिस्ले म्हंटले जायचे.स्कॉट मूरहेड नावाच्या अमेरिकन संगीतकाराने "ही इज माय एल्विस (प्रिस्ले)" असा सुप्रसिद्ध सूफी गायक नुसरत फतेह अली खान यांचा गौरव केला.
एल्विस द पेल्विस या जगद्विख्यात नावाने ओळखला जाणारा किंग ऑफ द रॉक एल्विस अरोन प्रिस्ले अमेरिकेत जन्माला आला नसता तर हिंदी सिनेमातील अभिनेता शम्मी कपूर त्याचा पुतण्या राजीव कपूर प्रमाणे केंव्हाच विस्मृतीत गेला असता.
एकदा माझ्या मनात
सहज एक , विचार आला
सप्तसुरांसह खेळणारी
सतार होता येईल का मला ?
माझ्या नाजूक ,सुंदर देहाला
अलगद कुणी कुशीत घेईल
उजवा दंड , तुंब्यावर माझ्या
कसा छान मला आधार देईल !
रिषभ - धैवत कोमल गाऊन
गंभीर रस मी आणेन
संथ गतीच्या आलापाने
भैरव ला मी सजवेन
यमन सुंदर आळवीता मी
"क्या बात है " दाद मिळेल
चारुकेशी चे गुण गाता मग
नेत्र अश्रूंनी भरून निघेल
मिया मल्हार नि मेघ मध्येही
सळसळती अशी तान निघेल
पण खरंच का हो ,धर्तीवरती
तेव्हा पाऊस पडेल !?
मामाची पोर तू लई भारी
तुझ्या मागं मागं फिरतिया पोरं
तुझ्या रूपात समावल सारं
तू पिरतीच खोल ग दारं
गावभर घालतिया चकरा
अन् अंगात तुझ्या गं नखरा
चल मांडूया पिरतीचा डाव
तुझ्या मनात काय ते दाव
अन् तूझ्या रुपात समावलं सारं
तू पिरतीच खोल ग दारं
रातीला सपनात येना
अन् मिठीत मला तु घेना
माझ्या काळजात होतया धडधड
चल करु गं थोडीशी गडबड
अन् तुझ्या रूपात समावल सारं
तू पिरतीच खोल ग दारं
@ श्रीनंद कांबळे
यावर्षी सारेगमप लिटल चॅम्प्स् मराठी पुन्हा येत आहे.
याची जाहिरात गेले काही आठवड्यांपासून येत आहे त्यामुळे उत्सुकता ताणली होती/आहे. पण नुकतेच कळले की यावेळी परिक्षक नसून ज्युरी असणार आणि ते ज्युरी म्हणजे आधीच्या लिल-चँपमधले अंतिम पाच स्पर्धक आहेत. एकही एलिमिनेशन नसणार. ही वरची नवीन माहिती मिळाल्यावर थोडी धाकधूक वाटली की या फॉरमॅटमुळे कार्यक्रम रंगेल का?
कार्यक्रमाची चर्चा करण्यासाठी हा धागा.
'उठा उठा हो सकळीक, वाचे स्मरावा गजमुख' या प्रसिद्ध गाण्याच्या शेवटी 'रामानंद स्मरता कंठी, तो संकटी पावतो' असे कडवे आहे, यातल्या रामानंद या गीतकारांबद्दल अधिक माहिती आहे का कोणाला? नेटवर शोधता एके ठिकाणी 'उठा उठा हो सकळीक' या शुद्ध मराठी गाण्याचे गीतकार रामानंद शर्मा असे लिहिलेले पाहिल्यावर उत्सुकता अजून चाळवली.
(संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, यांच्या आरत्यांमध्ये शेवटी रामजनार्दनी असे नाव येते. त्यांचा वरील रामानंदांशी काही संबंध आहे का?)
सुमारे महिन्याभरापूर्वी मला महेश काळे कोण हे नक्की सांगता आलं नसतं. मुळात शास्त्रीय संगीतात काही विशेष रुची नाहीये.
पण एक दिवस अचानक youtube वर एक विडिओ दिसला.
विडिओ मध्ये महेशला बघून त्याच्याविषयी जाणून घ्यावं वाटलं आणि जी माहिती मिळाली ती ऐकून/ वाचून चकित झाले. त्यानंतर वेड्यासारखे सगळे interviews, व्हिडिओ मिळेल ते बघत सुटले. ‘अरुणी किरणी’ तर रिपीट मोड वर ऐकतेय महिन्याभरापासून. कट्यार चे सगळेच गाणे डाउनलोड केले आणि ऐकतच राहिले. कितीदा ऐकलं तरी कंटाळा येत नाही. मनावर जणू महेश काळेचं गारुड झालंय. अजून कोणी आहे का माझ्यासारखे वेडे?
आपणा कानसेनांचा एक प्रॉब्लेम आहे. आपली स्वरांची भूक कधी भागत नाही आणि कान कधी पोटासारखे भरत नाहीत. स्वरांच्या नवनवीन चवी आस्वादाव्याश्या, आळवाव्याश्या वाटतात. कशाचा शोध घेतो माहीत नसताना सतत कसला तरी शोध सुरु असतो. आणि मग अवचित कुठल्या क्षणी अचानक आपण कुठेतरी वाट चुकतो आणि अलिबाबाची गुहा सापडते. आंतरजालावर निरुद्देश भटकत असताना नुकताच माझ्या हाती असाच एक स्वर्गसुखाचा ठेवा लागला. एक गाणं, दोन गाणी, अक्खी मैफिल, अनेक अक्ख्या मैफिली असं मी अधाशासारखं ऐकत गेले. वेळ पुरत नव्हता आणि मनही भरत नव्हतं.
हिंदी चित्रपटातील गाणी कुणाला आवडत नाहीत? काही वेळा आपल्या भावना आपल्यापेक्षा चांगल्या प्रकारे व्यक्त करतात ही गाणी. पण कधीकधी याच भावनांचा अतिरेकही करतात. बरेचदा हिरो-हिरॉइन्स नेहमी larger than life असतात किंबहुना सद्गुणांची खाण असतात. आणि हे दर्शवण्याच्या नादात गाण्यातल्या भावनाही कृत्रिम होत जातात, हास्यास्पद होतात. अशीच काही गाणी नमुनेदाखल...