छानसे ऐकण्या\पाहण्या\ नोंद घेण्या जोगे

Submitted by रानभुली on 10 March, 2021 - 02:23

आपल्याला एखादे गाणे आवडते, एखादा छानसा वेगळा पण offbeat व्हिडिओ आवडतो. सराउंड साउंड रेकॉर्डिंगचे 8D ते ९६ D अवतार चकित करतात. एखादे चित्र. क्राफ्ट अथवा रंजक माहिती असे वाटेल ते इथे समान आवड असलेल्यांसाठी शेअर करूयात.
लिंक कॉपी पेस्ट करण्याएवजी सर्च स्ट्रींग दिली तर उत्तम.
वाहत्या पानाचा उपयोग माबोकर खूपच सुंदर करतात. एखादी लिंक वाहून गेली तरी पुन्हा शेअर करता येईलच की, त्यात काय! Happy
( उत्तम व्हिडिओज. चित्रपट, वेबसिरीज, शॉर्ट फिल्म्स असे धागे आधीच आहेत. संबंधित पोस्टसाठी त्यांचा वापर करावा)

प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

युट्युब लिंक इथे द्यायला परवानगी आहे का ते अ‍ॅडमिन लाविचारून घ्या मॅडम कारण इथला वाचक निघून जातो ना साइटवरून लिंक क्लिक केली की. उत्तम चित्रित केलेले व्हि डो असा बाफ आहे .

अमा
ठीके. व्हिडिओ हा शब्द हटवते. आभार.
नेहमीच्या धाग्यावर आपण लिंक देतो त्या एकत्र इथे राहतील. अ आणि सीन्स अशा धाग्यावर यूट्युबच्या लिंक्स आहेत.
इथे ते नकोच आहे।
ताल चं गाणं ८ डी इफेक्ट मध्ये आहे हे शेअर केले तरी चालेल. हा वाहता धागा आहे. वाहून जाते.

>>ताल मधले हे गाणे ।8D surround sound ।हेडफोन लावून आणि डोळे बंद करूनच ऐका.<< मला चक्कर येते हे ऐकुन... Happy

>>ताल मधले हे गाणे ।8D surround sound ।हेडफोन लावून आणि डोळे बंद करूनच ऐका.
>>>>>
मला वाटले हेडफोन खराब झाला ,मग कमेंट्स वाचल्यावर समजले

ताल मधले हे गाणे ।8D surround sound ।हेडफोन लावून आणि डोळे बंद करूनच ऐका. >>> अतिशय सुंदर अनुभव! हे गाणंही माझं प्रचंड आवडतं आहे त्यामुळे जास्त मजा आली.

हा वाहता धागा कशाला?? सगळे उडून जाईल ना >>> या जगात शाश्वत असे काहीच नाही. झाड सोडल्यानंतर धागा काय करायचा ?

या व्हिडीओतली गायिका उषा उत्थुप यांची मुलगी आहे असे म्हटले जाते. हे कन्फर्म नाही. पण तिने स्त्री आणि पुरूष अशा दोन्ही आवाजात गायलेले गाणे आश्चर्यकारक आहे. कारण स्त्रियांच्या स्वरयंत्राची रचनाच अशी असते की पुरूष आवाजात गाणे कठीण असते. हे काहीतरी दैवी आहे असेच म्हणावे लागेल.
https://youtu.be/HYslC6K2rHw?t=25