अवल यांनी तलत वर धागा काढा असे माझे मन यांना सांगितले -- आणि माझे मन (म्हणजे खरेखुरे माझे चंचल मन) लगेच इकडे तिकडे बहकायला लागले, आणि धागा काढायचा मोह आवरला नाही म्हणून हा प्रपंच. @माझे मन, जर काढायचा असेल तर जरूर काढा; आपण दोन्ही धागे एकत्र बांधूयात.
असो. मला इथे तलतचा मखमली आवाज वगैरे याबद्दल बोलायचे नाही. असे आहे, समोर छान रसमलाईची चांदीची वाटी असेल तर ती कशी चविष्ट असेल वगैरे चर्चा कशाला करायची? छानपैकी वाटी उचलून खायला लागावे ना. म्हणून आता त्याच्या गाण्याच्या काही लिंक्स टाकते.
Part 1
( हा लेख दोन तीन भागात अपलोड केला जाईल. आणि हा लेख मला असलेली माहिती आणि माझी मते यांवर आधारित आहे. यात मला ज्या गायक, गीतकार, संगीतकारांबद्दल माहिती आहे, त्यांचाच उल्लेख केला आहे. आणि जे कलाकार खास आवडतात, भावतात त्यांच्याबद्दलच थोडं विस्ताराने लिहिले आहे. )
१९४२ ला मन्ना डे यांनी आपल्या गायन कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर काही काळाने हळूवार मोहम्मद रफी ऐकू येऊ लागले. १९४९ सालच्या ' महल ' चित्रपटातील ' आयेगा आनेवाला ' या गाण्यापासून लतादीदींच्या कारकिर्दीची यशस्वी घोडदौड सुरू झाली होती.
कुमारांच्या गायकीचे वेगळेपण त्यांच्या षड्जा च्या स्वरापासूनच सुरू होते. पुरुषांचा स्वर काळी एक - काळी दोन, स्त्रियांचा स्वर काळी चार - काळी पाच ! कुमार गंधर्व गायचे पांढरी चार मध्ये. हे सांगण्या मागचा उद्देश असा आहे की रागाकडे स्वरांकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन एका स्त्री गायिकेचा किंवा एका पुरुष गायकाचा कसा असतो आपण वेळोवेळी ऐकत आलेलो आहोत, अनुभवत आलेलो आहोत. कुमारांचा स्वरांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच मुळात पुरुष आणि स्त्री या वर्गवारीच्या वैचारिकतेच्या पलीकडचा आहे आणि तो त्यांच्या आवाजापासूनच व्यक्त व्हायला सुरुवात होते.
मनाला रिझवणाऱ्या गोष्टींमध्ये संगीताचे स्थान फार वरचे आहे. व्यक्तीगणिक संगीताची आवड वेगवेगळी असते, परंतु कुठलेच संगीत न आवडणारा माणूस मात्र विरळाच. वेगवेगळ्या ठिकाणी आणि अनेक प्रकारे आपण संगीत ऐकत असतो - मग ती विविध संगीतप्रसारक श्रवणमाध्यमे असतील किंवा प्रत्यक्ष संगीताची मैफिल. कधी आपण शुद्ध वाद्यसंगीत ऐकतो तर बऱ्याचदा गीत आणि संगीताचा सुरेख संयोगही ऐकतो. यांच्या जोडीला अजून एक संगीताचा प्रकार आपल्या कानावर वारंवार पडतो आणि तो म्हणजे संगीतमय जाहिराती. तर अशा अनेक प्रकारचे संगीत ऐकत ऐकत आपण लहानाचे मोठे होतो.
विदुषी अश्विनी भिडे-देशपांडे यांनी यु ट्य़ूब वर एक नवीन मालिका सुरू केली आहे. संगीत व भाषा या वरील प्रभुत्व ही सर्व रसिकांसाठी मेजवानी आहे. मालिकेची सुरुवात वसंत रागाने केली आहे.
काल बतिया दौरावत ऐकले.
खूप अविस्मरणीय अनुभव होता.आम्हाला भावलेले म्हणजे अत्यंत सुंदर ओघवत्या भाषेत समजावून सांगितलेले निसर्ग आणि संगीताचे आणि त्याच बरोबर भारतीय जनमानसाचे, सणांचे आणि उत्सवांचे नाते. किती सुंदर उपमा आहेत यात! वसंत ऋतूत गाण्यात येणार्या वसंत या उत्तुंग वृक्षावर लडिवाळपणे विहरणार्या बहार वेलीचे फुलणे आणि मग उभयतांनी सर्व माहौल निर्माण करणे... अत्यंत लोभसवाणी तुलना.
असा सूर लागे जसा श्वास घेतो
असा सूर लागे जसा श्वास घेतो कळेना तरी दैवी की लाभला
सदा अंतरींच्या जशा सप्त तारा विशेषे तिन्ही सप्तका लागल्या
मना मोहवी, दुःखही मोह घाली असे सूर स्वर्गीय कोंदाटले
लडी रेशमाच्या वरी कर्णद्वारी ह्रदी येत ते सौख्य सामावले
अभिसारिका ती कधी विद्ध होई सखा पाहुनी लाली गालावरी
कधी साद घाली जरी ईश्वराला तरी दाह भावे इथे अंतरी
असे भाव सारे सुरा गुंफुनिया रसिका मनी सौख्यदा जाहले
पियूषा परी ते सदा निर्मळाचे शशी सूर्य तारे तसे नांदले
मी चंचल चिकारी
तू धीरगंभीर खर्ज
तू शांत सुंदर यमन
तुझ्यात काहीच नाही वर्ज्य !
मी नवशिक्याचे 'अलंकार'
तू अप्रतिम 'रागदारी'
मी शांत सरळ 'भूप'
तू करुणेचा 'आसावरी'
तुझ्या प्रसन्न मुखावर
'बागेश्री'चा थाट
संथ वाहणाऱ्या नदीचा
मी गजबजलेला घाट
स्वरांच्या अथांग सागरात
तुझा स्वच्छंद आहे विहार
माझ्या कोवळ्या रचनेचा
अजून फुलतो आहे 'बहार'
-मृणालिनी-
लहानपणीच्या काही आठवणी व तसेच मायबोलीवरील काही धागे वाचून एक गाणे दुसर्या गाण्याच्या चालीवर म्हणता येईल त्याची यादी करावी असे वाटले. एखाद्या गाण्याचे शब्द न बदलता त्या गाण्याची चाल जर दुसर्या गाण्याच्या चालीवर चपखल बसत असेल तर सांगावे..
जर दोन गाणी एकाच चालीवर बेतली असतील तर मात्र वगळावीत. उदाहरण म्हणजे "होली आयी होली आयी" हे मशाल मधले गाणे आणि "जांभूळ पिकल्या झाडाखाली" ही दोन्ही गाणी एकाच चालीवर आहेत. (संगीतकार ही एकच - पं. ह्रदयनाथ मंगेशकर)
मला माहित असलेली उदाहरणे... (दोन्ही गाणी एकमेकांच्या चालीवर म्हणता येतात)
चिकवाच्या धाग्यावर अवांतर नको म्हणून हा वेगळा धागा.
पूर्वीचे नायक गाण्यातून एण्ट्री घ्यायचे. या गाण्यात ते कुठूनतरी कुठेतरी जात असायचे. जाता जाता जमेल तेव्हढी मदत रंजल्या गाजल्यांना करत असत. एकाच गाण्यात विविध समाजघटकांना मदत करण्यात एक वेळ सरकार, सामाजिक संस्था कमी पडतील पण नायक कधीच कमी पडायचा नाही. जेव्हां तो मदत करत नसायचा तेव्हां सकारात्मक संदेश / जीवनाचे तत्त्वज्ञान सांगायचा. क्वचित नायिका किंवा क्लब डान्सर सुद्धा सांगायची. अशा गाण्यांची सूची या धाग्यावर करूयात.
अमिताभ बच्चनच्या चित्रपटात अशी गाणी ठासून आहेत.