एक तरी गज़ल अनुभवावी # ०३

Submitted by अमर विश्वास on 29 October, 2020 - 01:43

एक तरी गज़ल अनुभवावी # ०३

दिखाई दिए यूँ कि बे-ख़ुद किया....
ख़ुदा-ए-सु़ख़न ....... मीर-तक़ी-मीर
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
या आधीचे भाग
एक तरी गज़ल अनुभवावी - प्रस्तावना
एक तरी गज़ल अनुभवावी # ०१
एक तरी गज़ल अनुभवावी # ०२
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१९८२ सलातला चित्रपट ... खय्याम चे संगीत ... असे म्हटल्यावर गीतकार म्हणून डोळ्यासमोर येतात ते कैफी आझमी , मजरुह किंवा गुलज़ार (साहिर १९८० सालीचं गेला)
पण जर गीतकार म्हणून मीर-तक़ी-मीर , मख़दूम मुहिउद्दीन, मिर्ज़ा शौक़ लखनवी अशी नावे आली तर ?

बाझार या चित्रपटाने ही किमया साधली होती. या चित्रपटासाठी खय्यामने जुन्या प्रसिद्ध शायरांच्या रचना वापरल्या होत्या. अर्थात संपूर्ण रचना नाही ... त्यातला काही भाग . याच चित्रपटात मख़दूम मुहिउद्दीन साहेबांची गझल खूप लोकप्रिय झाली .. "फिर छिड़ी रात बात फूलों की .. रात है या बरात फूलों की "

तसेच मीर साहेबांची एक गझल होती ... " फ़क़ीराना आए सदा कर चले .... कि मियाँ ख़ुश रहो हम दुआ कर चले "
विचारात पडलात ना ? कारण या गझलेचा मतला (स्थायी किंवा पहिल्या दोन ओळी) गाण्यात वापरलाच नव्हता ... मुळ गझलेत एकूण बारा मिसरे (कडवी) आहेत. गाण्यात मात्र तीनच वापरली होती.
लतादीदींच्या शार्प आवाजात हे गाणं खुललं होत... "दिखाई दिए यूँ कि बे-ख़ुद किया"

फ़क़ीराना आए सदा कर चले
कि मियाँ ख़ुश रहो हम दुआ कर चले

फकीराप्रमाणे आलो होतो ... आवाज / हाक (सदा) देऊन चाललो आहोत
(माझ्या हाकेकडे दुर्लक्ष करून) साहेब तुम्ही खुश रहा हीच प्रार्थना करून (दुवा देऊन ) जातोय

जो तुझ बिन न जीने को कहते थे हम
सो इस अहद को अब वफ़ा कर चले

तुझ्याशिवाय जगण शक्य नाही असे मी म्हणत होतो (तेरे बिना भी क्या जीना )
तेंव्हा या शपथेला (अहद - शपथ / प्रतिज्ञा) आज प्रत्यक्षात आणतो (वफ़ा कर चले - निभावणे, शब्दाला जगणे )
थोडक्यात तुझ्याशिवाय जगणं शक्य नाही तेंव्हा आता (तुझ्याशिवाय जगण्यापेक्षा) मरण कवटाळतो

वो क्या चीज़ है आह जिस के लिए
हर इक चीज़ से दिल उठा कर चले

अशी कुठली गोष्ट आहे जिच्यासाठी माझ्या तोंडून निश्वास बाहेर पडेल ?
(तू सोडून) सर्वच गोष्टी मी मनातून काढून टाकल्या आहेत

यावरून नुसरत फ़तेह अली ख़ान साहेबांच्या कव्वालीमधल्या दोन ओळी आठवल्या ...
काजर डारूँ किरकिरा जो सुरमा दिया न जाये
जिन नैनन में पी बसे तो दूजा कौन समाये...
ज्या डोळ्यांमध्ये प्रियकर आहे तिथे दुसऱ्या कशालाच जागा नाही ... अगदी काजळ / सुरम्यासाठीही नाही

शिफ़ा अपनी तक़दीर ही में न थी
कि मक़्दूर तक तो दवा कर चले

शिफ़ा - बरे होणे / जखम भरून येणे
मक़्दूर - ताकद

(प्रेमात झालेल्या) जखमा भरून न येणे हेच माझ्या नशीबात आहे.
नाहीतर सर्व उपाय करून बघितले पण काहीच गुण आला नाही (शब्दश: अर्थ ताकद वाढवण्यासाठी औषध घेऊन पहिले पण .... )

दिखाई दिए यूँ कि बे-ख़ुद किया
हमें आप से भी जुदा कर चले

दिसलीस तू ... फुलले ऋतू
तुला बघितले आणि मी स्वतःलाच विसरून गेलो (बे-ख़ुद किया )
तू मला माझ्या स्वतःपासूनच (आप से भी) वेगळं केलंस ...
तुझ्या दर्शनाने (सौदर्याने) मी इतका मोहित झालो कि स्वतःलाच हरवून बसलो

बहुत आरज़ू थी गली की तेरी
सो याँ से लहू में नहा कर चले

तुझ्या पर्यंत पोचायची अनिवार इच्छा (आरजू) होती .... कि इथूनच रक्ताने नाहून (तुझ्यापर्यंत पोचण्यासाठी) निघालो
याचा अर्थ असा कि , तुझ्या पर्यंत पोचण्यासाठी आम्ही इतक्या खस्ता खाल्या (रक्तबंबाळ झालो) आणि त्याच अवस्थेत तुझ्यापर्यंत आलो

जबीं सजदा करते ही करते गई
हक़-ए-बंदगी हम अदा कर चले

जबीं - कपाळ / माथा
सजदा - कपाळ टेकवून केलेला नमस्कार ... खरतर हा मक्केच्या दिशेने करायचा असतो ... पण एकदाका "तुझमें रब दिखता है याराँ मैं क्या करू" अशी अवस्था झाली कि हा नमस्कार प्रेयसीच्या घराच्या दिशेनेच होणार

एकदा मी कपाळ टेकवून नमस्कार केल्यावर तो करतच राहिलो (तुझ्या प्रेमात पडल्यावर त्यातून बाहेरचं आलो नाही) आणि नेहमीच माझी भक्ती / एकनिष्ठपणा (हक़-ए-बंदगी ) दाखवत आलो (अदा कर चाले)

परस्तिश की याँ तक कि ऐ बुत तुझे
नज़र में सभों की ख़ुदा कर चले

परस्तिश - पूजा
बुत - मूर्ती

इक बुत बनाऊंगा तेरा और पूजा करूँगा
मर जाऊँगा यार अगर मैं दूजा करूँगा

दुसऱ्या ओळीचा अर्थ थोडा वेगळा आहे पण भावना तीच आहे

मूळ शेराचा अर्थ असा आहे
तुझी मूर्ती बनवून मी त्या मूर्तीची इतकी पूजा केली कि सगळ्यांच्या नजरेत (नज़र में सभों की) तू देवी (खुदा) झालीस .... सगळे तुला देवीच समजायला लागले

यानंतरचे दोन (शेवटचे) अशार खास आहेत. (चित्रपटातल्या गाण्यात हे नाहीत) पण मीर आणि गझल यातील नातं सांगणारे आहेत

गई उम्र दर-बंद-ए-फ़िक्र-ए-ग़ज़ल
सो इस फ़न को ऐसा बड़ा कर चले

दर-बंद-ए-फ़िक्र-ए-ग़ज़ल चा अर्थ गझल रचण्यासाठी लागणारी साधना / पडणारे कष्ट
फन - कला (शायरीची कला)

सगळा जन्म गझलेची साधना करण्यात गेला ... पण त्यामुळे आम्ही या कलेला (गझलेला) मोठे करून गेलो ... (गझलेला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले पण त्यामागे आमचे जन्मभराचे कष्ट / साधना आहे )

उगाच नाही मीर ला ख़ुदा-ए-सु़ख़न म्हणतात

आणि शेवटी मक्ता

कहें क्या जो पूछे कोई हम से 'मीर'
जहाँ में तुम आए थे क्या कर चले

मीर , तुला जर कोणी विचारले या जगात तू आलास ... पण तुझे कार्य काय ?
तर त्याचं उत्तर म्हणजे ही आणि अशा असंख्य गझल / नज्म देऊन गेलो

भाऊसाहेबांच्या (पाटणकर) शब्दात

नुसतेच ना दुनियेत तुमच्या, आलो अम्ही गेलो अम्ही
भगवन तुझ्या दुनियेस काही, देऊनी गेलो अम्ही
शायरी तुला अर्पून गेलो, माझे सर्वस्व ती
दुनिया तुला विसरेल भगवन, ना अम्हा विसरेल ती

म्हणूनच मीर ला जाऊन २०० वर्षे होऊन गेली तरीहि "मीर" ची शायरी आजही आवडीने वाचली जाते गायली जाते ...

सो इस फ़न को ऐसा बड़ा कर चले ........

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults