५०-६०-७० चे दशक हिन्दी चित्रपटसन्गिताचा सुवर्णकाळ होता. प्रतिभावान सन्गितकार, गायक, कवी या सर्वांनी मिळुन प्रेम, विरह, भक्ती, समर्पण अशा विवीध प्रकारच्या गाण्यांचा नजराणा आपल्याला पेश केला. पण सर्वात प्रसिद्ध होती ती एकमेकांचे चारचौघात वाभाडे काढणारी गाणी.
विश्वास नाही ना बसत? बघा तर मग...
हा एक टाईमपास खेळ आहे.
ह्यात हिंदी गाणी मराठीत भाषांतर करून लिहायची / गायची आहेत, जमेल तशी.
फा वे टा धाग्यावर उल्लेख केल्याप्रमाणे ही अशी गाणी (बे,) सुरात गायला मजा येते मला.
बघुया किती जमतय आपल्याला.
१. डोळ्यात तुझ्या विचित्र विचित्र अदा आहेत
हृदयाला बनवील पतंग श्वास तुझी ही हवा आहे
(आखो मे तेरी अजब सी अजब सी अदाए है - ओम शान्ती ओम)
२. माझ्या रंगात रंगणारी परी आहेस की पऱ्यांची राणी
की आहेस माझी प्रेमकहाणी
माझ्या प्रश्नांचं उत्तर दे गं बाई
दे ना
(मेरे सवालो का जवाब दो - मैने प्यार किया)
महाविद्यालयाच्या पहिल्याच वर्षी पुरुषोत्तम स्पर्धेसाठीच्या एकांकिकेत संगीतिकेचे संगीत करण्याची संधी मिळाली. त्यातल्या एका गझलच्या चालीचे विशेष कौतूक झाले.
आणि हेच आमचे बलस्थान असल्याचे लेखक दिग्दर्शकाना समजून आले .. आणि पुढील तीन वर्षे एकापेक्षा एक सुंदर एकांकिका करण्याचा उपक्रम केला आम्ही.
आणि इथेच कवीताना चाली लावण्याचा छंद , अंगात भिनला तो आजवर पंचवीस तीस वर्षे टिकून आहे.
नमस्कार!
मधे चांगले डील मिळाले म्हणून यामाहाचा कीबोर्ड आणला. खूप दिवसांची शिकायची इच्छा होती म्हणून. मी क्लासेस ची माहिती काढते आहे, पण सध्या तरी काही contract वगैरे न करता घरीच बेसिक शिकता येते का बघायचे आहे. मला ओ की ठो येत नाही 
कुणी काही सांगू शकेल का?
धन्यवाद!
माझ्या बे मध्ये बहुत जणांकडे mi चा मोबाइल आहे. सगळीकडे तेच तेच आवाज वाजत असतात. पाहिल्यांदा जेंव्हा college मध्ये असताना mobile मिळाला तेंव्हा रोज नवी रिंगटोन मी ठेवायचे. इव्हन hellotune सुद्धा.
सध्या यात काही नाविन्य उरल नाही का ? मी सुद्धा mi ची default रिंगटोन ठेवलीये.
मागे माझी मुलगी लहान होती तेंव्हा तिच्या आवाजातले गाणे ठेवले होते . फोन वाजला की असलं भारी वाटायचं.
आज मी senorita ऐकत होते वाटलं याची रिंगटोन ठेऊ.
तुम्हाला पण ह्या गोष्टी मॅटर करतात का? त्या त्या ringtone चा पण एक काळ असतो असे वाटते का?

दिवाळीची खरेदी
दिवाळी पहाट च्या कार्यक्रमाच्यावेळी पुस्तकांचा स्टॉलला भेट देताना ही पुस्तके सापडली... अचानक धनलाभ यालाच म्हणत असावेत
अर्थातच साहिरचे पुस्तक सर्वप्रथम वाचायला घेतले साहिर बद्दल वाचताना त्याच्या नज्म, गज़ल आणि चित्रपटातील गाणी आठवताना एक गोष्ट जाणवली... हा अथांग सागर आहे .. दरवेळी नवीन रत्न सापडतच ... अशाच काही रचना मांडण्याचा हा प्रयत्न
मी रविन्द्र संगितावर आधारित मराठी रचना शोधतांन्ना हे सपडले! भरिय!
अश्या काही अभिजात रचनांच्या लिंका सापडल्यास कृपया कळवा!!
धन्यवाद!