संगीत

'तीसरी कसम' आणि 'बद्री की दुल्हनिया' : एक '3G' कनेक्शन

Submitted by rar on 26 June, 2017 - 13:59

रात्री दहाची वेळ. जत्रेचे तंबू पडले आहेत. गावोगावहून माणसं जमली आहेत. गाडीतळावर पोचल्यावर 'तो' गाडीला जोडलेली आपली बैलं मोकळी करतो. 'ती' केवळ त्याच्या गाडीची एक सवारी. जवळच्या चहाच्या टपरीतून तिच्यासाठी ४ आण्याचा लोटाभर 'चाह' विकत घेतो. 'कुवारे चाय नही पिते' या आपल्या समजूतीला बाजूला ठेवून तिच्या आग्रहाखातर तो देखील घोटभर चहा पितो. ती त्याला दोन दिवस जत्रेमधे रहायचा आग्रह करते. आणि तितक्यात त्याच्या (आणि आपल्याही) कानावर जवळून येणार्‍या हार्मोनियमचे सूर पडतात. त्याच्यासारखेच आपणही त्या ढोलकीच्या रीदमकडे आकर्षित होतो.

तेलुगू चित्रपट!

Submitted by अज्ञातवासी on 26 June, 2017 - 08:24

बाहुबलीनंतर तेलगू चित्रपट बघण्यास सुरुवात केली. तेलुगू चित्रपट, अभिनेते, संगीत विषयी चर्चा करण्यासाठी हा धागा!

मन माझे सैराट... भाग ४

Submitted by दिपक ०५ on 8 June, 2017 - 14:50

भाग ३ पासून पुढे....

सागर ते पेकेट उघडूतो, त्यात तिकिट व राधाचा नंबर होता.. सागरने लगेच तो नंबर डायल केला...
रिंग होऊ लागते.. २-३ रिंग होताच एक कोमल आवाज त्याच्या कानी पडला...

हँलो... तो नाजुक आवाज ऐकून सागरच्या तोंडून शब्दच निघेनासे झाले..

हँलो.. कोण बोलतयं?.. राधा..

सागर अडखळत्या शब्दात उत्तर देतो...
मी मी सागर...

कोण सागर.. राधा..

मी गँलेक्सी सॉफ्टवेअर कडून सागर बोलतोय.. दिक्षित सर नि तुम्हाला माझ्याबद्दल सांगितले असेल... सागर..

गाण्याच्या रेकॉर्डिंग संदर्भात मार्गदर्शन हवे आहे

Submitted by चैतन्य दीक्षित on 5 June, 2017 - 06:16

नमस्कार मंडळी,

मी एका बोरकरांच्या कवितेला चाल लावली आहे.
त्याचं रेकॉर्डिंग मला करायचं आहे. इथल्या तज्ञ मंडळींकडून मार्गदर्शन हवे आहे.

मी स्वतः बासरी स्टुडिओमध्ये रेकॉर्ड केली आहे (स्टुडिओ रेकॉर्डिंगचा अनुभव आहे, वेळखाऊ काम आहे, इत्यादी कल्पना आहे)
तरी पूर्णपणे एखादे गाणे फ्रॉम स्क्रॅच रेकॉर्ड करण्याचा अनुभव शून्य आहे.
कवितेच्या शब्दांना चाल लावली आहे आणि गाण्याच्या हिशेबात महत्वाचे असलेले
प्रील्यूड, इंटरल्यूड वगैरेही बसवले आहेत. कोणती वाद्ये वापरावीत याबाबतही थोडी कल्पना आहे.

विषय: 

रहे ना रहे हम - डॉ. मृदुला दाढे-जोशी

Submitted by जिज्ञासा on 4 June, 2017 - 13:50

सुप्रसिद्ध गायिका डॉ. मृदुला दाढे-जोशी ही माझी सख्खी आत्तेबहीण! तिच्या 'रहे ना रहे हम' ह्या कार्यक्रमाला जाण्याचा काल योग आला. हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळातील प्रयोगशील संगीतकारांच्या योगदानावर आधारीत असा हा कार्यक्रम आहे जो काल अतिशय रंगला. त्याची ओळख मायबोलीच्या सर्व रसिक वाचकांना व्हावी म्हणून तिला लिहिलेलं एक पत्र मी इथे प्रसिद्ध करत आहे. कारण हा कार्यक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. माझ्या बहिणीचा आहे म्हणून नव्हे तर ह्या कार्यक्रमातून ती जे सांगू पाहते आहे ते फार अभिरुचीपूर्ण आहे असं मला वाटतं म्हणून!

अजून काही..

Submitted by राजेश काळभोर on 31 May, 2017 - 01:37

दुलईत स्पंदनांचे, मधु श्वास अजून काही ..
उरलेत मोगऱ्याचे, आभास अजून काही ..!

रात्रीस चंद्र तारे सांगून काय गेले.?
देहात चांदण्यांचे मधु मास अजून काही..!

गुंतून पार गेले श्वासात श्वास आपुले..
अधीरे ओठ घेती अधमास अजून काही..!

समजून घे बहाणे लडिवाळ डोळ्यांतले..
नजरेत गोड माझ्या निश्वास अजून काही..!

ही पहाट द्वाड आहे दारात थांबलेली..
खोळंबल्यात रात्री उशास अजून काही..!

बदलली न कूस अजूनी, मिठीही घट्ट माझी..
ग मजला तुझ्या क्षणांचे हव्यास अजून काही.. !

_________________ राजेश काळभोर

रोमॅन्टीक गाणी सुचवा !

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 May, 2017 - 05:03

सर्दीss की .. रातों मे.. हम सोssये रहे एक चादर मे..
हम दोनो.. हो तनहा.. कोई दुसरा नही उस घर मे,
जरा जरा महकता है बहकता है आज तो मेरा तन ब दन मै प्यासी हू मुझे भर लेss अपनी बाहो मे .. ला. लाललाss .. लाला लला ओहोहो हो, ओ होss.. आ जा रे ...

येऊ द्या अशीच रोमांटीक गाणी. गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंड सोबत लाँग ड्राईव्हला जातोय, एका पाठोपाठ एक लावल्यास मूड बदलायला नाही पाहिजे Happy

विषय: 
शब्दखुणा: 

'कासव'ची गाणी

Submitted by चिनूक्स on 11 April, 2017 - 02:20

'कासव' या डॉ. मोहन आगाशे निर्मित आणि सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर दिग्दर्शित चित्रपटास नुकताच सर्वोत्तम चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

'कासव' या चित्रपटाचं संगीत - पार्श्वसंगीत साकेत कानेटकर यांचं आहे. 'कासव'मध्ये दोन गाणी आहेत. ती सुनील सुकथनकर यांनी लिहिली असून सायली खरे व अलोक राजवाडे यांनी गायली आहेत.

१. 'लेहर समंदर'

गीत - सुनील सुकथनकर
संगीत - साकेत कानेटकर
स्वर - सायली खरे

२. अपने ही रंग में

पं कुमार गंधर्व - येत्या जयंती निमित्त लेख

Submitted by आशयगुणे on 3 April, 2017 - 05:03

गेली अनेक शतके मनुष्याला अखंड साथ लाभत आली, ती स्वर आणि सूररूपी संगीताची! मात्र या प्रवासात अनेकदा अशी वळणे येतात, जेव्हा या कलेची मीमांसा करणे गरजेचे होऊन जाते. काही टोकदार प्रश्न विचारावे लागतात, प्रसंगी कलेच्या काही अंगांवर अभ्यासक-समीक्षकांना कठोर शब्दांत टीकादेखील करावी लागते. कारण, या संगीतकलेचा तिच्या उगमस्थानाशी असलेला संपर्क तुटलेला असतो.

विषय: 

'माहोल'

Submitted by कविता केयुर on 20 March, 2017 - 03:58

'माहोल'

परवाच 'दिवेलागण' या कविता संग्रहातील आरती प्रभूंची कविता ऐकली सलील कुलकर्णीच्या आवाजातील," कधी माझी कधी त्याची हि साउली , रेंगाळे माझिया चोरट्या पाउली".

यातीलच एक कडवं आहे,
" कधी त्याच्या पायी माझा उठे ठसा , कधी मला त्याच्या प्राणाचा आरसा,
चारी डोळ्यातून दोघेही जगतो, दारी तोही कधी पणती लावतो , कधी माझी कधी त्याची हि साउली "....

Pages

Subscribe to RSS - संगीत