सूर नवा ध्यास नवा - आशा उद्याची (सीझन ४)

Submitted by भास्कराचार्य on 6 April, 2021 - 12:13
 सूर नवा ध्यास नवा

'सूर नवा ध्यास नवा' ह्या आपल्या आवडत्या मालिकेचं २०२१मधलं नवीन पर्व कालच सुरू झालं. 'आशा उद्याची' ही संकल्पना घेऊन. हे पर्व 'लेडीज स्पेशल' असणार आहे. सध्या ऑडिशन्ससाठी अजित परब, स्वप्नील बांदोडकर, महेश काळे परीक्षक आहेत. ह्याशिवाय नेहमीचा ठसका घेऊन स्पृहा जोशी, मिथिलेश पाटणकर, आणि वादक मंडळी आहेतच! ह्याचबरोबर आपले मायबोलीकर पूनम छत्रे आणि वैभव जोशी ही सिद्धहस्त लेखक मंडळीही आहेत. ह्या पर्वाच्या चर्चेसाठी हा धागा! होऊन जाऊ दे संगीत मैफिल! सोमवार, मंगळवार, आणि बुधवार रात्री ९:३० वाजता कलर्स मराठीवर!

सर्वांनी काळजी घ्या, सुरक्षित रहा, हे ओघाने आलंच. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजचा भाग छान झाला. अलबेला साजन आणि सरणार कधी रण विशेष आवडले. ते एमएच्या परीक्षेचं वगैरे जरा जास्त झाल्यासारखं वाटलं, पण ठीक आहे. टेन्स्ड म्युझिक वगैरे नेहमी आणतात, तेही कधीकधी अती वाटतं. पण गाणी छान होतायत हे मस्तच.

ऑडीशन्स सुरू झाल्या की मुख्य पर्व पण सुरू झालय ? आपली मराठी किंवा आयपीटीव्हीवर दिसलं नाही अजून.

धागे काढतोच आहेस तर सारेगमप लिटील चॅम्प्सच्या पुढच्या पर्वाचा पण काढून टाक. Proud
त्यात जुने लिटील चॅम्प्स आता जज म्हणून येणार आहेत.

सध्या ऑडिशन्स. त्याही छान होतायत. ह्यावेळेस प्रत्येक वयोगटातला एक स्पर्धक टाईप बंधनं नसल्याने गाण्याची बाजू जास्त वरची‌ वाटते आहे मला तरी.

झी मराठी पोस्ट-लॉकडाऊन सोडून दिलं बघणं. Proud माझ्या ओळखीतल्या अनेक आज्यांनीही सोडलं. त्यांच्या सिरीअल आता सहन नाही होत. कलर्स आणि प्रवाहकडे आपसूक मोर्चा गेला.

काही स्पर्धक आवडल्या आहेत, कालची सुफी गाणारी यवतमाळची मुलगी, एक राधा एक मीरा गाणारी फरीन, आजच्या एपिसोडची पोवाडा गाणारी सांगलीची मुलगी, सरणार कधी रण गाणारी मुलगी आणि युनिक आवाज असलेली गझल गायिका लक्षात राहिल्या !

माझ्या ओळखीतल्या अनेक आज्यांनीही सोडलं. त्यांच्या सिरीअल आता सहन नाही होत. >>>> Lol अरे, सिरीयल्स नकोच बघू. हे परवा फेसबूकवर दिसलं तेव्हा समजलं. जुनं लिटिल चॅम्प्स चांगलं होतं. त्यामुळे हे पर्व पण बघेन.

अजून सुनध्यानचे व्हिडीयो कुठे सापडले नाहीत. मिळाले की बघेनच.

ऐ मोहब्बत तेरे अंजाम पे रोना आया
ही गझल गायलेली एक गोमंतकीय होती. भलतीच तयारीची वाटली मला. खूपच सुंदर गायली आहे. मी मग रात्री हीच गझल राहुल देशपांडे च्या युट्यूब चॅनल वर सलग पाच वेळा पाहिली.

सरणार कधी रण, आणि लता बाईंची तत्सम गाणी गाणाऱ्या सुद्धा मनमोहक गात आहेत.
@च्रप्स शाल्मली असो वा नसो... Nobody cares
असे वातावरण आहे एकदम Lol

अवधूत गुप्ते ला miss करतो आहे!!! पण... अजून दिसलाच नाहीये.
काय माहित या season मध्ये तो जज असणार आहे की नाही.
त्याची बायको निर्माती आहे पण या सिजन ची

धागा काढल्या बद्दल आभार Happy

रच्याक, आज मायबोली बराच वेळ बंद होती. मी सकाळी ११ पासून लॉगिन करायला असमर्थ होतो. 504 Eroor येत होता. Server down maybe... But why ??

स्वप्नील आलाय अवधूतच्या जागी बदली कामगार म्हणून (असं स्वप्नील म्हणाला). ते कुणी आलं की काय खायला आणलंस विचारत होते ते नाही आवडलं. त्यातही महेश आपला आब राखून असतो. मास्कचा सगळ्यात जास्त वापर तोच करतो. पहिल्या बाकावर बसणाऱ्या स्कॉलर मुलांपैकी वाटतो तो Happy

हे ऑडिशन बघितले पुर्ण!
ठिक ठाक वाटल्या गायिका! अर्थात जेंव्हा खरी स्पर्धा सुरु होईल तेंव्हा जास्त सराव करुन गातील गाणी त्यामुळे कळेल नक्की!

लहान मुलांची आधीची जी झालेली त्यात सर्व गायक लहान असूनही बर्‍याच तयारीचे वाटलेले. बघुया पुढे कितपत रंगत जाते ही मेहफिल ते!

आजच्या बुधवारच्या एपिसोडमधे कोणीच खास नाही वाटल्या गायिका ! >>> काही काही चांगल्या असतीलही (उदा:- पंधरा वर्षाची लावणी उत्तम गायलेली पोर, 4th stage Cancer through मृत्युच्या दारावर थाप देऊन परत येणाऱ्या चाफळकर बाई)
पण अप्रूप वाटणारी एक गोष्ट म्हणजे...
संगीत नाटकांमध्ये काम करणारी आणि जिचा classical मध्ये हातखंडा आहे त्या जयश्री माने ने बापुजींचे उडत्या चालीचे गाणे म्हणून Standby वर जाणे किम्बहुना त्यासाठी स्वत:च पूर्णत: कारणीभूत ठरणे हे मला तरी वाईट वाटण्यासारखेच होते.
पहिलीच परीक्षा आहे ना मग तुम्हाला जे चांगले जमते आहे त्यातले गावे ना??!! पण नाही...
जयश्री माने ची गोंदावाले येथे दिली जाणारी गायनसेवा देखील शास्त्रीय संगीतावरचे कलाप्राबल्य सिद्ध करणारी असते असते!

कालची गाणी इतकी नाही आवडली, पण एकंदर आवडलं. आता रविवारी ग्रँड ओपनिंग एपिसोड आहे. बघूया काय होतंय.

मला तरी काही बर्या आणि काही खरच चांगल्या वाटत आहेत.
चांगल ग्रुमिंग केल तर आणखी चांगल गाऊ शकतील.
पण एक कळल नाही की काळे बुवांमध्ये महागुरु संचारले आहे त का?सगळ्यांना अहो जाओ का करत आहेत?

मास्क लावल्यावर काळेचे डोळे धिटुकल्या उंदरासारखे दिसतायत्. तो असा उगीचच फार वयस्कर असल्यासारखं का बोलायला लागलाय देव जाणे.

ग्रँड प्रिमियरमधे बर्याच गायिका बेसुर वाटल्या, नरव्हस होत्या का ?
माधवी माळी (लल्लाटी भंडार), संपदा माने (नाथ हा माझा) , स्नेहल चव्हाण (नि आज कोई जोगी आवे )आणि किशोरी (कानडा राजा पंढरीचा ) गाणी आवडली !

आमच्या समोरच्या(रस्त्या पलीकडच्या) इमारतीत राहणाऱ्या एक बाई स्वतः: गातात. तो हा कार्यक्रम मोठ्ठ्या आवाजात लावतात. वर स्वतः: गाण्याला ताल देतात . कधी सोबत टीव्हीपेक्षा मोठ्या आवाजात गातात. काल मी त्यांचं आणि त्यांच्या टीव्हीवरचं कानडा राजा पंढरीचा ऐकलं

>>> काल मी त्यांचं आणि त्यांच्या टीव्हीवरचं कानडा राजा पंढरीचा ऐकलं<<<
मार्क्स दिले का? Happy

रश्मी मोघे आणि धनश्री कोरगावकर सध्या आवडल्या आहेत.
पण संघर्ष, आजारपणं आणि रडारड इत्यादी सिमपथी टूर सुरू झाली की वैताग येतो.

>>काल मी त्यांचं आणि त्यांच्या टीव्हीवरचं कानडा राजा पंढरीचा ऐकलं<<
समोरच्या (रस्त्या पलिकडच्या) बिल्डिंगमधलं गाणं, कान लावुन ऐकलं; ह्म्म, विकुंना बोलवा... Proud Light 1

प्रिमियर पाहिला. कोणिहि उल्लेखनीय वाटलं नाहि; बँड सोडुन. त्यतल्या त्यात श्रीनिधी(?) "केतकिच्या बनी..." चांगलं गायली...

पहिला भाग थोडा पाहिला. 'केव्हा तरी पहाटे' ह्या गाण्याची त्या गायिकेने भिषण वाट लावली असं मला वाटलं. पण जजेसनी भरभरून कौतूक केलं ! मला प्रयोग म्हणूनही त्यातलं काही फार कळलं नाही.

महेश काळे एकदम अकाली वृद्धत्त्व आल्यासारखा बोलतो आहे. शिवाय तो एका गायिकेला म्हणाला, "मी तुम्हांला एक निवेदन करू इच्छितो" आणि पुढे काही सुचना केल्या. मराठीत 'निवेदन करणे' हे अशा अर्थाने वापरतात का?

Pages