Submitted by shrinand kamble on 5 July, 2021 - 02:02
मामाची पोर तू लई भारी
तुझ्या मागं मागं फिरतिया पोरं
तुझ्या रूपात समावल सारं
तू पिरतीच खोल ग दारं
गावभर घालतिया चकरा
अन् अंगात तुझ्या गं नखरा
चल मांडूया पिरतीचा डाव
तुझ्या मनात काय ते दाव
अन् तूझ्या रुपात समावलं सारं
तू पिरतीच खोल ग दारं
रातीला सपनात येना
अन् मिठीत मला तु घेना
माझ्या काळजात होतया धडधड
चल करु गं थोडीशी गडबड
अन् तुझ्या रूपात समावल सारं
तू पिरतीच खोल ग दारं
@ श्रीनंद कांबळे
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Chan ahe
Chan ahe
छान !
छान !