स्वरलिपीतल्या बंदिशींचं टायपिंग करण्याबाबत माहिती हवी आहे

Submitted by मेधावि on 9 October, 2021 - 11:28

भातखंडे स्वरलिपीतल्या काही बंदीशी टाईप करायच्या आहेत. त्याची जी चिन्हे असतात ती कशी टाईप करायची?
हे काम बाहेरून करून घ्यायचे तरी कुठे करून मिळेल?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

गांधर्व महाविद्यालय पुणे इथे चौकशी करा. गांधर्व महाविद्यालय मिरज इथे पण् मदत मिळेल. माझ्या वडिलांनी हे नोटे शन लिहून घेता येइल अशी शॉर्ट हँड लिपी बनविण्याव र रिसर्च केला होता. त्यासाठी इंग्रजी शॉर्ट हँडची पुस्तके घरी होती.

@अमा, आभारी आहे. विचारून पाहीन.

@भरत - हे कठीण वाटतंय. तसंच बीटा व्हर्जन आहे+ त्यात तालासकट लिहायची सोय नाही

@भरत - हे फिरंगी नोटेशनसाठी आहे.

https://abgmvm.org/e-sangeet-kala-vihar/

ही साइट बघा. इथे संपर्क करता येइल संगीत कला विहार हे त्यांचे मासीक आहे. माझ्या लहान पणी ही मासिके/ त्रै मासिके आता आठ्वत नाही.
नियमित पणे घरी येत पोस्टाने. बाबांचा त्यावर अभ्यास असे व लेखकांची संपर्क असे सुट् टीत दुपारी मी ही मासिके वाचून त्यातले काही कळ ते का ते व हे लिपीत लिहिलेल्या चीजा वगिअरे डिसायफर करायचा प्रयत्न करत असे. चिजामधले शब्द चमत्कारिक वाटत. येरी आलि पियाबिन म्हणजे नक्की काय हो?! असे प्रश्न पडत.

सौ भद्र मानाप मान संशय कल्लोळची पुस्तके पण होती. त्यात पदांच्या आधी बेस्ड ऑन धिस चीज असे असून त्यात चिजेचा मुखडा लिहिलेला असे. तो ह्या मासिकांत पुस्तकांत सापडला की पार कोडे सुटल्याचा आनंद व्हायचा. एका शब्द अ‍ॅरेंजमेंट वर दुसरी फिट करून चाल सेम असू शकते व ती दुसरी शब्द अ‍ॅरेंज मेंट हिट होउ शकते हे ज्ञान मिळाले. ( पुढे ताल सिनेमात अनिल कपूर ने हेच द ज्ञान दिले आहे. )

@ मेधावि,
भातखंडे स्वरलिपी बाबत काहीच माहिती नव्हते. पण नेटवर पाहिले.... आपले आपण टाईप करू शकू असे वाटते.
MS Word मध्ये Insert Symbol वापरून.
थोडे नेटाने + लक्षपूर्वक टाईप व प्रूफरीड करावे लागेल --- अचूकतेसाठी

भातखंडे स्वरलिपी मधील सगळी चिन्हे आणि तुम्हाला लिहीलेली बंदिश कशी दिसणे अपेक्षित आहे त्याचे एखादे उदाहरण चित्रस्वरूपात वर दिलेत तर अजून कोणी काही सुचवू शकेल.

जितके मला कळले त्याप्रमाणे ---

भा॒ त॑ .खं डे स्व_रलि᳘पीतंल्यां काॱहीॱ बंंदीशी

भा॒ = भा नंतर ०९५२ Altx टाईप करायचे. मग दृश्य परिणाम असा दिसतो.

त॑ = त नंतर ०९५१ Altx टाईप करायचे. मग दृश्य परिणाम असा दिसतो.

.खं = खं पूर्वी नेहेमीचा पूर्णविराम

स्व_ = स्व नंतर 005F AltX टाईप करायचे (किंवा नेहेमीचा underscore). मग दृश्य परिणाम असा दिसतो. ( F X capital हवेत >> capslock ON).

तं ल्यां = प्रत्येक अक्षरानंतर ०९०२ Altx टाईप करायचे. मग दृश्य परिणाम असा दिसतो.
पण ज्या अक्षरावर मुळात अनुस्वार आहे तिथे हेच टाईपिंग असे दिसते बंंं

काॱहीॱ = प्रत्येक अक्षरानंतर ०९७१ AltX टाईप करायचे. मग दृश्य परिणाम असा दिसतो.

२-३ अक्षरांच्या खाली मोठे आडवे कंस साठी चिन्ह नाही मिळाले. अजून बघावे लागेल.
लि᳘ = लि नंतर 1CD8 AltX टाईप करायचे. मग दृश्य परिणाम असा दिसतो.
हेच ओळीने २-३ अक्षरांसाठी करता येईल. लि᳘लि᳘लि᳘

एकदा shortcut लक्षात आले की वेळ नाही लागणार.
किंवा प्रत्येक चिन्हासाठी एक ठराविक (unique) आकडा टाईप करता येईल मग पूर्ण फाईलसाठी सगळे एकत्र फाईंड-रिप्लेस करायचे. उदा --
टाईप केलेले = का१ही१बं१दी१
फाईंड-रिप्लेस १ with ०९५२ Altx. यातच हव्या तिथे स्पेस देता येतील.
दृश्य परिणाम = का॒ही॒ बं॒दी॒

लक्षपूर्वक टाईप व प्रूफरीड मात्र करावे लागेल.

कारवी तुम्ही बराच महत्वपूर्ण काम केले आहे.
आता अक्षराचा पाय मोडणे , दंड , तीन- आर अक्षराना सामावेल असा अखंड चंद्राकृती अधोरेघ , हे लिहिण्याच्या ASCII character छपाई चे key सिक्वेंस सापडले की पुरेसे काम होईल.

उभा दंड आपल्या कीबोर्डवरच बॅकस्लॅश कीवर असतो की?
शिफ्ट बॅकस्लॅश ने येईल. की तो नाही चालणार.

पाय मोडायला अक्षराचे विनाकारण जोडाक्षर करून मग बॅकस्पेस दिला तर?
ग >>> ग्म >>> ग्

किंवा Insert Symbol मध्ये दोन्हीसाठी काहीतरी असेलच. मला या भातखंडे लिपीतील चिन्हेच माहिती नाहीत.
अनेक अक्षरांसाठी अखंड चंद्राकृती अधोरेघ मात्र बघावे लागेल. त्याचा काही अंदाज नाही आला मला.

खरं तर हे सारे अँड्रॉइड फोनवर input keyboard मधे आहेच. ते एका फाईलमधे तयार करून ठेवायचे आणि ती फाईल मग कोठूनही अँक्सेस करून ही चिन्हे वापरायची.
।। , ग्

नवीन Submitted by पशुपत on 10 October, 2021 - 17:35 >>>>
अँड्रॉइड फोनवर input keyboard वापरून २-३ अक्षरांच्या समूहाला चंद्राकृती अधोरेघ / उर्ध्वरेखा कशी आणायची सापडले का?

अँड्रॉइड फोनवर input keyboard वापरून २-३ अक्षरांच्या समूहाला चंद्राकृती अधोरेघ / उर्ध्वरेखा कशी आणायची सापडले का? <<< मला वाटते हे कोणत्याही कळफलकावर करणे अवघडच असेल. देवनागरीच काय पण रोमनमध्येही असे करता येते का हा प्रश्न आहे.
जेंव्हा बंदिशीतल्या एकाच अक्षरावर अनेक स्वर येतात (तान) दर्शनण्यासाठी वापरतात तेच म्हणताय ना?

माझा अडाण्याचा कारभार आहे गजानन.
ताल आणि मींड चिन्हे म्हटलेय त्यांना. २/३/४ स्वर एका चंद्रकोरीच्या पोटात भरलेले दिसतात.
चंद्रकोर वर = मींड
चंद्रकोर खाली = स्वर मान ( अर्धी, एक, दीड मात्रा वगैरे)
म्हणजे काय मला नाही कळत.....
ती चंद्रकोर सोप्या रीतीने / आयती मिळेल का अँड्रॉइड फोन keyboard वापरून असे विचारत होते मी पशुपतना.

नाही कारवी . एकतर अधोरेखनासाठी चंद्रकोर चिन्ह मी पाहिलेले नाही कोणत्याही टेक्स्ट एडिटरमधे. त्यातून हे डायनँमिक (२-३-४ अक्षराना पाहिजे तशी सामावून घेणारी ) फन्क्शन आहे.
त्यासाठी मशीन लँग्वेज लेवलवर कोड लिहायला लागेल असे वाटते.
खरं तर मी या क्षेत्रातील जुजबी माहिती असलेला सामान्य माणूस आहे. हे त्यातल्या एक्स्पर्ट चे काम आहे.

कोमल स्वरांचा पाय मोडणे - हे भातखंडे स्वरलिपी पद्धतीत नाही, पलुस्कर पद्धतीत आहे. त्यात बाकी स्वर ठीक आहेत, पण कोमल नी दाखवताना नी चा पाय मोडतात, तो कसा टाइप करणार?

अधोरेखनासाठी चंद्रकोर असते

ती मात्राशी संबमधीत असते

उदा. सा खाली चंद्र ..... एका मात्रेत एकच स्वर

सारे खाली चंद्र ..... सा , रे दोन्ही प्रत्येकी अर्धी मात्रा

सा,रेग तीनही खाली एक चंद्र .... सा अर्धी मात्रा , रेग मिळून अर्धी मात्रा , म्हणजे रे ग प्रत्येकी 1/4 मात्रा

मी गुगल इंडिक आणि सॅमसंगचा स्वतःचा मराठी - दोन्ही कळफलक वापरून पाहिले. पण स्वर पूर्ण केले असता ते पाय मोडू देत नाहीत.

हरचंदजी पायथॉनमधे सोपे आहे. प्रत्येक अक्षराला आणि स्वराला एक नाव द्यायचे. मग ते हवे तसे जोडायचे.
amar = 'न'
akbar = '्'
anthony = 'ि'
trump = 'ी'
print (amar + anthony + akbar)

हे पहा इथे ट्राय करा...

https://onecompiler.com/python/3xe67mr9q

कारवी यांनी भा नंतर ०९५२ हा युनिकोड क्रमांक टाईप करण्याची सूचना केली आहे. तोच विचार थोडा पुढे घेऊन "भ" चा युनिकोड ०९२D आणि "आ" चा ०९३E असा जर टाईप केला तर भातखंडे लिपीतील पूर्ण राग युनिकोडमध्येच लिहिता येईल. या पायथॉन स्क्रिप्टमध्ये दाखविल्याप्रमाणेः

https://tinyurl.com/bhatkande

युनिकोडने वैदिक एक्स्टिंशन या नावाने ४३ सिंबॉल स्वीकारले आहेतच. तेव्हा भातखंडे लिपीच्या सर्व गरजा पूर्ण होत असाव्यात असा माझा अंदाज आहे.

Pages