मी गेली काही वर्षे विविध धातूंच्या तारांपासून दागिने बनवते. नी नावाचा माझा छोटासा ब्रॅण्ड आहे. हल्लीच या ब्रॅण्डला सात वर्षे पूर्ण झाली. दरवर्षी वर्षपूर्तीनिमित्त एक नवीन कलेक्शन मी करत असते.
सात वर्ष पूर्ण हे स्पेशल असते म्हणतात. तर त्या निमित्त मी थोडी नवी दिशा, नवी वाट धुंडाळते आहे.
या कलेक्शनमधे दागिने नाहीत. दागिन्यांच्या पलिकडे हे तारांचे माध्यम शोधायचा हा छोटासा प्रयत्न
अल्ट बालाजी वरील लॉक अप कार्यक्रमाबद्धल चर्चा करण्यासाठी धागा...
बिग बॉस च्या एक लेव्हल वर आहे... मजा येतेय... कन्टेस्टंट्स पण खतरू आहेत...
गेल्या वर्षी बनवलेल्या काही स्टोलची प्रकाशचित्रे मी इथे शेअर केली होती. हे सर्व नमुने त्यानंतर बनवलेले आहेत. काही स्टोल/स्कार्फ आणि बटवे

या वर्षी दसऱ्याच्या मुहूर्ताला ऑफिस चालू झालं. मग दिवाळीत रांगोळी काढायची संधी सोडते कि काय.
एक एक फोटो अपलोड होईना, मग कोलाज करून अपलोड केले.
सगळ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा!!

उत्साह अमृततुल्य आज नेहमीप्रमाणेच गजबजलेले होते. चहाचे कप इथून तिथे नाचत होते, पोहे आणि उप्पित चा वास परिसरात घमघमट होता.
अनिरुद्ध आपल्या चहाचा आस्वाद घेत असताना त्याचे लक्ष एका चिमुरडी कडे गेले. ती सर्वांकडे आशाळभूत नजरेने पाहात होती; कोणीतरी आपल्याला काही मदत करेल असा आर्विभाव तिच्या डोळ्यांत स्पष्ट दिसत होता. कर्दमलेले केस, मळकट चेहरा, व फाटलेले कपडे पाहून अनिरुद्धला तिची दया आली. शेवटी अनिरुद्ध ने तिला जवळ बोलावले.
"तुला भूक लागली आहे का? काही खायला हवे का?" अनिरुद्ध ने त्या चिमुरडीला विचारले. त्यावर तिने नुसतीच होकारार्थी मान हलवली.
माझ्या आजोळी माझी मावशी रोज नियमितपणे सकाळी सडा घालून रांगोळ्या घालत असे, अजूनही घालते. निमिषार्धात ती उकिडवं बसून अगदी सहज सोप्पं काहीतरी रेखाटून जाते. कधी पानं फुलं, कधी अशीच कुठं बघितलेली नक्षी आणि त्यालाच साजेशी उंबरठ्यावर रांगोळी. त्या रांगोळीत मग रंग भरायचं काम माझ्याकडे असायचं. ती चटकन रेखाटून जायची आणि मी पुढं तासनतास रंगकाम करत बसायचे. तिची रांगोळी आणि माझे रंग हा आमच्यातला एक अनोखा दुवा. आज अनेक वर्षांनंतरही माझ्या साखरझोपेत हे स्वप्नं असतं.
नवरात्रीनिमित्त घरच्या बागेतल्या फुला-पानांपासून रचलेल्या देवीच्या रचना
कलाकार : माझी आई
मातर्नमामि कमले कमलायताक्षि
श्रीविष्णुहृत्कमल वासिनि विश्वमातः ।
क्षीरोदजे कमलकोमल गर्भ गौरि
लक्ष्मी ! प्रसीद सततं नमतां शरण्ये ।।१।।
स्पर्धेची मुदत वाढवल्याबद्दल संयोजकांचे आभार..!!
मायबोली परिवारास रौप्य महोत्सवी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
१)

२)

३)


माहिराने दादाला ग्लू,कात्री अशा लागेल त्या वस्तू द्यायला मदत केली आहे.

शिक्षण झाल्यानंतर मी जी नोकरीत चिकटले ती अक्षरशः चिकटूनच राहीले. लहानपणी व्हॉलीबॉल आणि मल्लखांबाचा सराव आणि स्पर्धा, गिर्यारोहण शिबीरे यांमधून कसाबसा अभ्यास सांभाळणारी मी, घाण्याच्या बैलासारखी नुसतं काम नी काम करत होते. सकाळी लवकर ऑफिसला जाऊन रात्री उशीरा परत यायचं, आठवड्याची राहिलेली झोप शनिवारी पूर्ण करायची आणि रविवारी घरातली कामं आवरायची, बस इतकच चाललं होतं. आणि मग एक दिवस चण्डिगढच्या ऑफिसला नेमणूक झाली. दुपारी २ ते रात्री ११ च फक्त काम असल्याने रोज झोप पूर्ण होत होती आणि शनिवार जागेपणात जात होता. ऑफीसने दिलेल्या गेस्टहाऊस मधे राहत असल्याने घरची कामं करायचा राविवारही मोकळाच.