कला

"शासकीय तंत्रनिकेतनातलं 'काॅपी' प्रकरण आणि अजून बरेच काही........"

Submitted by चंद्रमा on 22 May, 2021 - 05:49

.......प्रिय मायबोलीकर बहुतांश वाचकांनी आपले काॅलेज जीवन अनुभवले असेल तर आपल्या गोड आठवणींना पुन्हा उजाळा द्यायला घेऊन आलो आहे महाविद्यालयीन जीवनाची सफर! चला तर मग या सफरीचा आनंद घेऊया मनमुराद!

"सुर्य जरी मावळला,
तरी त्याचा संधिप्रकाश रेंगाळत असतो!
त्यांचा सहवास जरी संपला;
तरी आठवणींचा सुगंध दरवळत असतो!!"

!! मला अजून जगायचे आहे!!

Submitted by चंद्रमा on 17 May, 2021 - 20:53

.... घराबाहेर लोकांची गर्दी जमली होती. सायरन चा आवाज करत घराजवळ ॲम्बुलन्स थांबली. पोलिसांची जीप पण बाहेर उभी होती ॲम्बुलन्स मधले कर्मचारी स्ट्रेचर घेऊन आत मध्ये शिरले. खिडकीजवळ एक पारवा फडफड करीत होता. ‌‌‌‌ पीएसआय एका इसमास जवळ चर्चा करीत उभे होते. वातावरणामध्ये एक दर्प सुटला होता. आतमध्ये एक पंचविशीतला एक तरुण देह निपचित, निशब्द पडला होता. जवळच विषाची बाटली पडली होती. आणि त्याच्या हातात एक चुरगाळलेला कागद होता. इन्स्पेक्टर ने तो कागद उघडला त्या कागदावर लाल शाईने लिहिलेले होते.

विषय: 

"मृत्युंजय"

Submitted by चंद्रमा on 12 May, 2021 - 05:04

.............घड्याळ्याच्या गजराने मृत्युंजय खडबडून जागा झाला.रात्रीचे १२ वाजले होते.शरीर घामाने ओलेचिंबं झाले होते.त्याचा घसा कोरडा पडला होता.तो गटागट पाणी प्याला.सर्वत्र काळोख दाटलेला होता.घड्याळ्याच्या टिकटिक प्रमाणे त्याच्या हृदयाची स्पंदने आवाज करत होती.त्याचा जीव कासावीस झाला त्याला गार वाऱ्याची गरज भासली.तो तसाच बाहेर पडला.बाहेर कुत्र्याच्या भूंकण्याचा आवाज येत होता.जवळच एक उद्यान होते.रात्री सहसा तिथे पहारेकरी नसायचा.गेटवर चढून त्याने आतमध्ये उडी मारली.विराण शांतता पसरली होती जणूकाही भयाण विनोदाचे अभेद्य कवच!

विषय: 

!!ॠण जन्मदेचे न फिटे!!

Submitted by चंद्रमा on 9 May, 2021 - 05:41

आईच्या गर्भपोकळीत
प्रवास झाला सुरू!
आई हीच माझी विधाता;
आई हीच माझी गुरू!!

मला या जगात आणण्यासाठी
किती सहन केल्या तीने वेदना!
आयुष्य व्यापीले सर्वस्व तीने;
तीच माझ्या आयुष्याची प्रेरणा!!

आयुष्याची ती गुरुकिल्ली
कल्पवृक्षाची ती छाया!
आनंदी माझ्या जीवनाचा;
तीच आधारभूत पाया!!

जन्मोजन्मी न फिटणार
हे मातृत्वाचे ॠण!
आठवतो तो सर्व प्रवास;
जेव्हा होतो मी एक भ्रूण!!

विषय: 
शब्दखुणा: 

ओशिबाना - The Pressed Flower Art

Submitted by मनिम्याऊ on 21 March, 2021 - 11:17
रेसिन पेन्डण्ट- गोकर्ण

ज्याप्रमाणे आपल्याकडे ताजी फुले-पाने वापरून रांगोळीच्या विविध रचना करतात त्याचप्रकारे वाळवलेली फुले, पाने, बिया, काटक्या वापरून विविध आकर्षक कलाकृती बनविण्याच्या कलेला ओशिबाना आर्ट म्हणतात.
या प्रकारात चित्रे, निसर्गदृश्ये, देखावे चितारले जातात. ही एक जपानी कला आहे. तिचा उगम जरी १६व्या शतकातील जपानमध्ये झाला असला तरी आज संपूर्ण जगभरात ओशिबाना कलाकार आहेत.

विषय: 

काव्यसुधानंद

Submitted by Sujata Bodhankar on 14 March, 2021 - 11:17

काव्यसुधानंद

कवयित्री -- सौ. सुजाता सुभाष बोधनकर

पत्ता-
द्वारा-डॉ.सुभाष बोधनकर
"सुधाम" प्लॉट नं.70 गिरिश सोसायटी
गेट नं.3 शानू पटेल शाळेजवळ
आंबेडकर चौक,वारजे,
पुणे 411058
फोन नं-9421679043/ 02025231831

मनोगत

विषय: 

Pages

Subscribe to RSS - कला