कला

मायबोलीकर युट्यूबर्स : माझं ‘फॅशन्/स्टायलिंग्/मेंदी/क्राफ्ट्स’ याबद्दल चॅनल , ‘Glory of Henna Official

Submitted by दीपांजली on 7 January, 2021 - 04:30

कालच केदार जाधव यांच्या चॅनल बद्दल थ्रेड पाहिला आणि मलाही माझ्या नुकत्याच सुरु केलेल्या युट्युब चॅनलबद्दल लिहायचं इन्स्पिरेशन मिळालं!
मायबोलीवर बर्याच जणांना ऑलरेडी माहित असेलच, व्यवसायाने मी मेंदी/बॉडी पेंटिंग अर्टिस्ट आहे आणि काहींना माझी पॅशन फॉर स्टायलिंग्/फॅशनही माहित असेल !
या सगळ्याची सफर माझ्या चॅनलवर , ‘ग्लोरी ऑफ हेना ऑफिशिअयल’ वर पहायला मिळेल !
चॅनल वर अधुन मधुन इंग्लिश व्हिडिओजही येतील पण मुख्यतः मराठी व्हिडिओज असतील .
अत्ता पर्यंत रिलिझ झालेले मराठी व्हिडिओज :

डायरी

Submitted by Ved dalvi on 31 December, 2020 - 11:19

मायबोलीकर सदस्यांच्या गझला वाचत वाचतच , गझल पहिल्यांदाच लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.यावर
सुधारणेसाठी जाणकारांच्या सूचना याव्यात,म्हणून टाकत आहे.

आयुष्याची याही वर्षी नवी डायरी आली आहे..
तुझ्यावीना जगायचीही माझी तयारी झाली आहे..

नव नव्या संकल्पांच्या शपथा घेऊन झाल्या आहेत..
मुद्दाम या ही वर्षी तुला त्यातून सूट दिली आहे !

तसं माझं भविष्य मी आधीच लिहून ठेवलंय बघ !
प्रत्येक दिवशी फक्त तुझीच आठवण लिहिली आहे!

आधी जेव्हा तू नसायचीस तेव्हा त्रास व्हायचा..
पण आता रेटत जगायची मात्र सवय झाली आहे..!

प्रांत/गाव: 

अण्णा

Submitted by divyanshi on 21 December, 2020 - 09:18

संपली माया संपली काया
संपला तो आधार माहेरचा.
संपली नाती, संपला देह
संपला तो आहेर माहेरचा.
सुख दुखाच्या वाटेवरी
साद घालिते मी तुला
कधी ना वाटे आज अवेळी सोडूनी जाशी तू मला
आजोबा -नातीचे हे नाते
जिवा पलीकडे मी जपले.
शेवटची ती भेट ही नाही
दूर देशीला मी दडले.
माहेरचे ताे दार माझे,
ओसाड पडले घर आता
बोलला का नाहीस तू
शेवटचे जाता जाता
संपला अध्याय तुझा ,संपला तुझा धडा

विषय: 

लॉकडाऊन इफेक्ट्स

Submitted by abhishruti on 18 December, 2020 - 05:00

जवळपास पस्तीस वर्षांनी पेन्सिल हातात धरली.... सुरुवात घरातील लोकांवर प्रयोग करून मग सेल्फ पोर्ट्रेटनी केली. मी याविषयातील प्रोफेशनल किंवा ट्रेनिंग घेतलेली व्यक्ती नाही. केवळ छंद होता जो परत गवसला.... ज्यामुळे माझा वेळ छान गेला आणि मनाला उभारी आली. नाहीतर घरात बसून काय करायचं हा प्रश्नच होता. मायबोलीवरील मित्रमंडळींना सुचविल्यामुळे हा धागा काढून मी काढलेली चित्र शेअर करतेय. ब-याच वर्षांनी इथे लिहितेय. चुकभूल द्यावीघ्यावी

विषय: 
शब्दखुणा: 

दिवाळी अंकासाठी बनवलेली मिनिएचर्स

Submitted by jui.k on 15 November, 2020 - 10:45

खास यावर्षीच्या दिवाळी अंकासाठी बनवलेली क्ले मिनिएचर मॅग्नेट्स..
गरमा गरम भाजलेलं मक्याचं कणीस!
PicsArt_10-27-12.41.02.jpgPicsArt_10-27-12.43.24.jpg
स्टॉल वरची मोठ्या तव्यावरची खूप सारे बटर घालून बनवलेली पाव भाजी

दिवाळीचा किल्ला- तुमचा आमचा प्रत्येकाचा

Submitted by मनिम्याऊ on 12 November, 2020 - 07:03

माबो आयडी Athavanitle kahi यांच्या या https://www.maayboli.com/node/77182
धाग्यावरून एक कल्पना सुचली.
लहानपणी आपण घरी/ आवारात/ सोसायटीमधे/ शाळेत किंवा जिथे सोयीचे असेल तिथे दिवाळीत किल्ले बनवले आहे. आता आपल्या मुलां भाचरांसाठी तितक्याच उत्साहात परत एकदा ती मजा घेतली असेल तर इथे शेअर करुया.

यंदाच्या वर्षी केलेल्या किंवा मागील वर्षांच्या दिवाळी किल्ल्याचा फोटो इथे दाखवा. तसेच किल्ले बनवतानाच्या काही खास आठवणी असतील तर त्या पण सांगा.

लेकीने घरी रंगवलेल्या पणत्या

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 November, 2020 - 16:45

गुलमोहर - ईतर कला या विभागातील माझा हा पहिलाच धागा. किंबहुना या विभागाचे सदस्यत्वही आज आत्ताच घेतले आहे. कधी घेईल असे वाटलेही नव्हते. कारण कुठल्याही कलेशी माझा दूरदूरपर्यंत काहीही संबंध नाही. पण मुलीसाठी म्हणून आज ईथे यावे लागले Happy

लेकीचा धागा म्हणून नो बकवास सिधी बात,
आज वर भिंती तिने बरेच रंगवल्या, परवा पणत्यांवर हात साफ केला.
रंगसंगती, डिजाईन वगैरे सारेच तिच्याच मनाचे. दहा दहा मिनिटांत एक पणती तयार झाली.

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - कला