“यावेळचा गणेशोत्सवाचा धागा बघितलास का..?”
“बघितला ना! काय केलंय..? त्या पाककृती स्पर्धेच्या धाग्यावर शंभर अटी घातल्यात आणि वर अध्याहृत असलेल्या वेगळ्या..”
“ हो ना ते पूर्ण वाचून होईपर्यंत, वरण भात शिजून, सजावट करून insta ला #HomeFoodrRestaurantStyle वाला फोटो टाकला तर शंभर लाईक्स पण येतील. ”
“हा हा हा आणि शशक ? त्यात शंभर तर फक्त नियमव आहेत.. आहेस कुठे? “
“तर काय? हे माबो गणेशोत्सवाचे संयोजक जरा अतीच करतात, नाही?”
“हम्म.. पुढच्या वर्षीपासून शशक स्पर्धेचाचा मसुदा शंभर शब्दात लिहायची अट संयोजकांनाच लागू केली तर..? काय वाटतं तुला ? ”
सकाळची धांदल सुरू झाली होती. पातेल्यात चुरचुरलेली फोडणी, सासर्यांची पूजा,सासूच मंद्र सप्तक ते नवर्याची हे कुठे ते कुठे अशी सर्वव्यापी रेंज. जोडीला ता,वा, का, आ,बा अशी सुरावट. हे ऐकतच तिचे हात यंत्रवत काम करत होते . मनात देवाची आळवणी चालू होती. सगळे उपाय करून झाले होते आणि नवीन चालू होते . पैसापरीस पैसा जात होता पण यश नव्हतेच.
अशातच विजेसारखे ते शब्द तिच्या कानात घुसले आणि तिने विस्मयचकीत नजरेने त्याच्याकडे बघितले.
भारतीय युद्धाचा पंधरावा दिवस.
द्रोणाचार्यांनी द्रुपद आणि विराटाला असमान्य शौर्य दाखवत यमसदनी धाडले होते
पांडवांचे धाबे दणाणले होते.
युद्धाची धुमाळी उठली. गर्दीत काही कळेना. त्यात ’अश्वत्थामा मेला’ असे द्रोणांना ऐकू आले.
त्यांनी मोठ्या विश्वासाने सत्यप्रिय युधिष्ठीराला विचारले, ’माझा पुत्र मृत झाला का?’
तेव्हा, युधिष्ठीराने , ”अश्वत्थामा मेला!” हे सांगितले.
पण, " हत्ती की मनुष्य ते मला नेमके ठाऊक नाही” हे पुढचे वाक्य उशीराने म्हटले!
द्रोणांना शोकामुळे ते ऐकू आले नाही आणि त्यांनी दु:खातिशयाने रणांगणावरच शस्त्रे टाकली.
सकाळी साडेसातची वेळ, रस्त्यावर शुकशुकाट. पाठीला बॅग लटकावून, हातात कंटेनर घेऊन ती घाईघाईने बस पकडायला निघालेली. EDचं सबमिशन होतं. रात्री अडीचपर्यंत जागून सगळी ड्रॉईंग्स पूर्ण केलेली - ती सगळी त्या कंटेनरमध्ये सुरक्षित होती.
साध्याशा साडीतली, सावळीशी रजनी; उमदा, राजबिंडा राजेश. पार्टीतल्या सर्वांचं लक्ष त्यांच्या चेहऱ्यावर असणाऱ्या निखळ आनंदाकडे, आनंदी जोडप्याला बघून जळफळणाऱ्या गर्भश्रीमंत कामिनीकडे पहिल्यांदाच दुर्लक्ष होताना पाहून, तिने ठरवलं आणि..
नियतीने कौल दिल्यागत बॉल करणाऱ्या राजेशची नजर कामिनीच्या नजरेत गुंतणे ते परवा त्याला आपल्या बेडमध्ये घेऊन कामाग्नी विझवणे यात केवळ 4 दिवसांचे अंतर होते. आपल्या मादक शरीराचा सार्थ अभिमान तिला होताच. राजेश तिच्या मायावी रूपाच्या मोहात न पडता तर तो मर्दच कसला? पण..
आणखी एक ड्रिंक घेऊया,” ती म्हणाली.
“नको, मला बाईक चालवायची आहे,” तो म्हणाला.
“मी नाही चालवू शकणार,”
ती म्हणाली. “चिंता नको, मध्यरात्री आहे, ट्रॅफिक नाही.”
त्यालाही प्यायचं होतं, म्हणून त्याने प्यायलं. दोघंही टुन्न. कसंबसं त्याने बाईक सुरू केली, ती मागे बसली. तोल गेला पण तो सावरला. मुख्य रस्त्यावर घेताना स्कूटरला धडकायचा बाकी होता.
“तू डावं-उजवं बघितलंच नाहीस!” ती ओरडली.
आरशात पाहिलं—मागून पोर्शे भरधाव येत होती…
आज काहीसुद्धा मिळालं नाही... उलट नेहेमीपेक्षा जास्तच ऐकायला लागलं...
हा मोठ्ठा ! सदानकदा ध्यानस्थ पंचवटीखाली.. काहीही न करता... मला दररोज गावात जावं लागतं.. भावाबहिणीकडे बघून.. याला बोलायला गेलं तर हसून म्हणतो कसा; 'मला कुठं खायला लागतं ! हा देह श्वासांवर चालतो.. तुम्हीसुद्धा प्रयत्न करा..'
'वारेवा.. तूही बस आम्हीसुद्धा बसतो..' यावरसुद्धा हसलाच.. नेहेमीसारखा.. गूढ..
आळशी !
आज मी खूप आनंदात आहे. का सांगू ?
आज ती भेटायला आली तेच आवडणा-या हिरव्या ड्रेस मधे.
आणि कहर म्हणजे..स्वतः केलेला शिरा घेऊन आली.
शि-याचा एक घास तयार केला आणि चक्क मला भरवायला पुढे केला.
माझ्यासाठी ते इतके अचानक होते की सर्वदूर आतल्या पेशी पेशींमधे काटा उभा रहीला...
त्याच निमित्ताने... तिच्या मऊ बोटांचा ओठांना झालेला स्पर्श
कसे सांगू ... शब्दच नाहीयेत बघ
अरे वेड्या, आपणच नव्हतो भेटलो का? मलाच काय सांगतोयस?
"सर, त्रिमुर्ती क्लाएंटच्या नारायण मूर्तीकडून पुन्हा रिक्वेस्ट आली आहे. अजूनही गेम रटाळ वाटतोय. इतर दोन डायरेक्टर्सचंही तेच म्हणणं आहे. तो भैरव नंदी वैतागून प्रोजेक्टच रद्द करत होता. ब्रह्मेंनी त्याला थोपवलं म्हणे."
"अरेच्चा! अजूनही समाधान नाही मूर्तीचं? त्याच्यासारखं आम्हीही अहोरात्र काम करायचं काय! बरं आता ते खास सहा डार्क भावना-प्रोग्रॅम्स आहेत ते फिट करा गेममधल्या सर्व पात्रांत. अर्थात प्रत्येकात वेगवेगळं प्रमाण हवं. घ्या किती रंजक हवंय ते! आता बोंबलले तरीही हे प्रोग्रॅम्स काढता येणार नाहीत सांगा."
"आणि गेम हाताबाहेर गेला तर?????? "
“बाबा हे काय करता?” नेहमीच्या बालसुलभ कुतुहलाने तिने विचारले.
“अगं घाणेरडे झालेले भाग काढून टाकतोय
आपण जो माल विकतो
तो घाण असेल तर लोकं घेणार नाहीत ना”
हे ऐकून तिचे डोळे मोठे झाले तोंड वावच्या अभिनिवेषात उघडेच होते काही वेळ
काहीतरी विलक्षण शोध लागलाय असे तिच्या चेहऱ्यावरून दिसत होते.
ती तिच्या झपाटलेल्या अवस्थेत जाता जाता बोलून गेली,
“एक सॉलिड आयडिया आली यावरून बाबा
मी आजच मिनी ला सांगते शाळेत
की नेहमीप्रमाणे कुणी घरात नसताना तुझे मोठे काका आले
की तोंडात माती कोंबत जा
आणि चड्डीत सू करून टाकत जा