सकाळी साडेसातची वेळ, रस्त्यावर शुकशुकाट. पाठीला बॅग लटकावून, हातात कंटेनर घेऊन ती घाईघाईने बस पकडायला निघालेली. EDचं सबमिशन होतं. रात्री अडीचपर्यंत जागून सगळी ड्रॉईंग्स पूर्ण केलेली - ती सगळी त्या कंटेनरमध्ये सुरक्षित होती.
अचानक ठेचकाळली, हवेतल्या हवेत तिने स्वतःला सावरलं पण कॉन्टेनरच झाकण तिच्या हातात राहिलं आणि तो गेला गडगडत.
काही कळायच्या आत कंटेनरने गटारात डुबकी मारलेली.
सगळी मेहनत त्या गटाराच्या पाण्यात गेलेली बघून जो काही धक्का बसला.
तेव्हढ्यात अवचित आलेल्या एका माणसाने क्षणाचाही विलंब न करता, खाली वाकून कंटेनर काढून तिच्या हातात दिले. पाठमोरा तो तसाच पुढे निघाला..
आणि तिने विस्मयचकित नजरेने त्याच्याकडे पाहीले त्याच वेळी डोळ्यातील एक अश्रू गालांवर ओघळला.
***
तळटीप:: ही एक सत्यघटनेवर आधारित आहे. त्या माणसाने माझ्या मैत्रिणीची कित्येक तासांची मेहनत वाचवली होती.
***
शब्दार्थ
ED - Engineering Drawing
कंटेनर - एक गोलाकार डबा ज्यात चित्राचे कागद गुंडाळून ठेवतात.

दोन उपक्रम एक प्रवेशिका.
दोन उपक्रम एक प्रवेशिका.
Brilliant!!
चांगली आहे. आवडली.
चांगली आहे. आवडली.
खूप आवडली.
खूप आवडली.
मी विचारणारच होते ईडी काय?
मी विचारणारच होते ईडी काय? मग कंटेनर पाहिला तेव्हा समजलं(खरेच विसरले की का वय झालय?)
आजकाल भलतेच अर्थ आधी डोक्यात येतात.
आवडली
आवडली
चांगली आहे. आवडली. >>> +१
चांगली आहे. आवडली. >>> +१
मस्त.. आवडली.. आणि महत्त्वाचे
मस्त.. आवडली.. आणि महत्त्वाचे म्हणजे फार रिलेट झाली.
कित्येक तासांची मेहनत >>> तासाची?? दिवसांची.. रात्रीची.. महिन्यांची.. स्पेशली आमच्या सिव्हिल इंजिनिअरिंगला.. असे दोन चार किस्से झाले आहेत. काहीना परत मिळाले काहीना नाही.
मी स्वतः तर इतके वेळा विसरलो आहे अशा सगळ्याच गोष्टी की हिशोब नाही. पण मी वस्तू विसरतो हे सगळ्यांना माहीत असल्याने मित्रच चार शिव्या घालून मी विसरलेल्या वस्तू आठवणीने उचलायचे.
आता गेले ते दिवस. आता तसे मित्र नाहीत सोबत. म्हणून दोन बॅग असल्या की त्यातील एक विसरू नये यासाठी मी त्यांची एकमेकांना गाठ मारून ठेवतो
वा कल्पना भारीए! दोन्ही
वा कल्पना भारीए! दोन्ही उपक्रम साध्य केलेत!
आवडली!
चांगली आहे. आवडली. >>> +१
चांगली आहे. आवडली. >>> +१
खरच देवासारखा धावुन आला.
खरच देवासारखा धावुन आला. केवढी मेहनत असेल.
रानभुली, कुमार१, sharmilaR,
रानभुली, कुमार१, sharmilaR, झंपी, मंजूताई, जाई , ऋन्मेऽऽष, निकु धन्यवाद!
दोन उपक्रम एक प्रवेशिका. >>
हे आवडलं रानभूली
कित्येक तासांची मेहनत >>> तासाची?? दिवसांची.. रात्रीची.. >>> हम्म खरंय. ताशी - person hours मध्ये डोक चालत.
दोन बागांच्या गाठी .. चांगली कल्पना. पण विसरलात तर दोन्ही राहू शकतात.
आजकाल भलतेच अर्थ आधी डोक्यात येतात>>>
l know
म्हणून खालती दोन्ही टाकलं
आवडली.
आवडली.
छान आहे शशक. आवडली.
छान आहे शशक. आवडली.
अस्मिता आणि मामी धन्यवाद!
अस्मिता आणि मामी धन्यवाद!
छान आहे, कॉलेजला असताना हे
छान आहे, कॉलेजला असताना हे कंटेनर पाठीवर टाकून जाताना बाणांचा भाता घेऊन युद्धावर जात असल्याचा फील यायचा.
बाणांचा भाता घेऊन युद्धावर
बाणांचा भाता घेऊन युद्धावर जात असल्याचा फील यायचा >>>
ED युद्धच वाटायचं ED च्या सरांबरोबरच!
छान! पण झाकणाशिवाय कंटेनर
छान! पण झाकणाशिवाय कंटेनर गटारात पडला तर आत पाणी जाऊन ड्रॉइंग्ज खराब होतील ना?
मलाही यथातथाच कळलेली आहे.
मलाही यथातथाच कळलेली आहे. तिचे पाय मोडलेले का? त्याने नसती दिली तरी हिने जाउन उचललीच असती ना. अगदी देवत्व बहाल करण्यासारखं काही त्याने केलेले आहे असे वातले नाही. माबुदो.
झाकणाशिवाय कंटेनर गटारात पडला
झाकणाशिवाय कंटेनर गटारात पडला तर आत पाणी जाऊन ड्रॉइंग्ज खराब होतील ना? >>
दोन गोष्टी आहेत
१. प्लास्टिक कंटेनर सारखा पाण्यात पडलं तर ते हलकं असल्यामुळे पहिल्यांदा तरंगायला बघतो आणि हळूहळू हळू त्याच्यात पाणी जाऊ शकत..
२. अजय वास्तवात घडलं होतं त्यामध्ये ते गटात चिखलाच होतं तर कंटेनर पडल्यावर ते लगेच चिखलात बुडणं शक्य नव्हतं पण ते नीटपणे अलगद वरच्यावर काढल्यामुळे बरीचशी हानी टळली. तिच्या एक किंवा दोन मला वाटतं पेपर्सवर बऱ्यापैकी डाग पडले आणि ते तिला रिव्हर करायला लागलं आणि तिला सरांनी त्यावेळी थोडासा वेळ म्हणजे बहुदा एकच दिवस वाढवून दिलेला.
एक-दोन पेपर्स होते ते अगदी कोपऱ्यात किंचितसे खराब झालेले पण ते त्यांनी स्वीकारले, अर्थात त्याचे मार्क कमी केलेले पण जे पूर्ण सगळं रिवर्क करायला लागल असत तेवढं न करता आपण म्हणूया की दहा ते वीस टक्के पर्यंत तिला रिवर्क करायला लागल.
तिचे पाय मोडलेले का? >>> ही
तिचे पाय मोडलेले का? >>> ही भाषा आवडली नाही
अर्थात नव्हते.
पहिल्या वर्षाची मुल १७-१८ वर्षांची असतात.
ती अडखळून स्वतःला सावरते तोच तिच्या लक्षात आलं की आपण केलेली सगळी , कित्येक तासांची ( ओव्हर २ months) मेहनत पाण्यात गेलेली, तिची पहिली रिऍक्शन धक्का, रडू येणं, डोकं सुन्न होण असणार.
त्यात काठी वगैरे मिळून, खाली वाकून ते अलगद बाहेर काढायला तिला जो वेळ लागला असता ते वेगळंच.
तो जो माणूस होता त्याने तिला काही कळायच्या आत तिला ते काढून दिलं. तिला नीटसं thank you ही म्हणता आलं नाही. तो तसाच निघून गेला .
ही submissions सेमीस्टर फायनल न असतात. त्याचे परिणाम जबर वाटायचे त्यावेळी तरी.
एका सेमीस्टर मध्ये ( ४ महिने जेमतेम मिळायचे ) त्यात पहिल्या वर्षाला प्रत्येकी ८ पेपर्स, त्या व्यतिरिक्त वर्कशॉप्स. मुंबईत रोजचे २-३ तास commute मधे जाणार. त्या सगळ्यात अशी एक घटना अजिबात परवडण्यासारखी नसायची.
अगदी देवत्व बहाल करण्यासारखं काही त्याने केलेले आहे असे वातले नाही >> बरोबर आहे तुझ्या दृष्टीने.
त्याला देवत्व दिलेले नाही पण त्या परिस्थितीत तो तिच्यासाठी देवासारखा धावून आला, तिला तसे वाटले.
धन्यवाद . भाषा चुकली.
धन्यवाद . भाषा चुकली.
भाषा चुकली.>> It's okay. मी
भाषा चुकली.>> It's okay. मी पण लगेच रियाक्ट झाले. :|
अशावेळी ती / किंवा दुसरी व्यक्ती ही अगतिक (व्हल्नरेबल ) परिस्थितीत जाऊ शकते आणि त्याचा ब्लॉक येऊ शकतो. एव्हढच
(No subject)
इंजिनिअरिंग ड्रॉइंग मला
इंजिनिअरिंग ड्रॉइंग मला इयत्ता आठवी नववी आणि दहावी, त्यानंतर फर्स्ट ईयर असे होते.
त्यामुळे मी इयत्ता नववीतच जी टी मारायला शिकलो.
मला जी टी मारलेले शीट सुंदर वाटत. म्हणून मी माझ्या सगळ्या शीट जी टी मारून पुन्हा ड्रॉ करत असे. अशी डबल मेहनत घेत असे.
फर्स्ट ईयर ला अनेक मुलं जी ट्या मारत. नंतर माझ्या कडे येत.
मग मी सगळी कडे योग्य ठिकाणी नीट कर्कटकांची टोके शीटला घुसवून, योग्य ठिकाणी अर्धे कंस मारुन असे ड्रॉइंग करत असे की कुणीही ही शीट जीटी मारलेली आहे हे ओळखूच शकत नसे.
मग काही मंडळी माझ्याकडून त्याच शीट्स वर सह्या करून घेत!!
अकरावीपासून मी कोणाचीही सही डुप्लिकेट करण्याची कला शिकून घेतली. त्यामुळे सबमिशनच्या वेळेस माझ्याकडे रांगा लागत.
मी इंटर्नल पेपर तपासून मार्क वाढवून सह्या करून देत असे. नंतर मुलं जाऊन शिक्षकांना तुम्ही चुकून कमी मार्क लिहिले असे म्हणून करेक्शन करून घेत.
एकदंदरीत मी अनेकांसाठी देवमाणूस होतो अशा कठीण टायमाला.
सकाळी सकाळीच ! ?
सकाळी सकाळीच ! ?
छंदीफंदी
छंदीफंदी

भुतांच्या दुनियेत बोकलत यांचा
भुतांच्या दुनियेत बोकलत यांचा जो दबदबा आहे तोच अभियांत्रिकी मध्ये रॉय यांचा दिसतोय.
पेपर मध्ये छेडछाड पर्यंत ठीक
पेपर मध्ये छेडछाड पर्यंत ठीक चालली होती पोस्ट

पण ते ही खरे असू शकते. इंजीनियरिंग मध्ये काही अशक्य नाही
आधीचे सगळे रिलेटेबल. माझी तर पूर्ण इंजिनियरींग GT वर झाली. नेमप्लेट आणि टायटल बॉक्स सगळे मी GT मारायचो. त्यामुळे ती ओळखू येता कामा नये यासाठी काय करावे हे सर्व मला ठाऊक होते. माझ्या घरात मोठा सेटअपच बनवला होता त्याचा. चाळीतल्या शेजारच्या बाजारच्या लोकांना वाटायचे मी काहीतरी भारी काम करत आहे. प्रत्यक्षात कॉपी करत असायचो
ज्यांना ज्यांना यात मी मदत केली यात त्यांच्यासाठी मी देवमाणूस होतो म्हणू शकतो. तसेच माझ्यासाठीही बरेच जण देवमाणूस होते जे आपली ओरिजिनल शीट मला GT मारायला द्यायचे. कारण ज्यांना ती नीट मारता येत नाही ते ओरिजिनल शीट सुद्धा तापवून काळी आणि प्रसरण पावल्याने लूज पाडतात. माझ्याकडे अशी लाईट होती जी तापायची नाही.
शिक्षकांची नकली सही करणे हा प्रकार आमच्यात एकाला यायचा. अर्थात त्याच्याकडून ती करून घ्यायची रिस्क जबाबदारी ज्याची त्याची आपापली. फक्त इमर्जन्सीतच या कलेचा वापर व्हायचा.
अश्या प्रकारात महत्त्वाचे असते ते एकदाही पकडले न जाणे. एकदा विश्वास गमावला आणि तशी इमेज झाली तर मग पुढच्या वेळी तुमच्या खरेपणावर सुद्धा कोणी विश्वास ठेवत नाही.
GT वगैरे ऐकून होतो. पण फक्त
GT वगैरे ऐकून होतो. पण फक्त ऐकूनच.
फक्त ऐकून..
फक्त ऐकून..
मी तर डिप्लोमा पहिल्या सेमीस्टरपासूनच सुरू झालेलो. ड्रॉइंग माझा फारच नावडीचा विषय. इतके कंटाळत स्लो करायचो की असे वाटायचे इंजीनियरिंगचे आयुष्य यातच खर्च होणार. पण पहिल्या सेमिस्टरला उडाणटप्पू मुलांचा ग्रुप जमला ज्यात काही सिनियर सुद्धा होते. त्यामुळे लवकरच हे ज्ञान मिळाले. आणि आयुष्य बदलले. आयुष्यातील कितीतरी वेळ वाचला.
मी तर लॅब जर्नल मध्ये जे स्केच असायचे ते सुद्धा GT मारायचो. आणि वर्गात सुद्धा मारायचो. त्याचा पेपर पातळ असल्याने काचेच्या खिडकीवर कागद ठेवला की सूर्यप्रकाशाचा वापर करून काम व्हायचे
Pages