Submitted by स्वानंदी१ on 28 August, 2025 - 03:13
भारतीय युद्धाचा पंधरावा दिवस.
द्रोणाचार्यांनी द्रुपद आणि विराटाला असमान्य शौर्य दाखवत यमसदनी धाडले होते
पांडवांचे धाबे दणाणले होते.
युद्धाची धुमाळी उठली. गर्दीत काही कळेना. त्यात ’अश्वत्थामा मेला’ असे द्रोणांना ऐकू आले.
त्यांनी मोठ्या विश्वासाने सत्यप्रिय युधिष्ठीराला विचारले, ’माझा पुत्र मृत झाला का?’
तेव्हा, युधिष्ठीराने , ”अश्वत्थामा मेला!” हे सांगितले.
पण, " हत्ती की मनुष्य ते मला नेमके ठाऊक नाही” हे पुढचे वाक्य उशीराने म्हटले!
द्रोणांना शोकामुळे ते ऐकू आले नाही आणि त्यांनी दु:खातिशयाने रणांगणावरच शस्त्रे टाकली.
त्यांचे अवसानच गळाले.
मात्र पांडवांच्या विजयोन्मादात जेव्हा द्रोणांना सत्यता कळली तेव्हा, देहत्याग करतांना दु:खाने ते युधिष्ठीराला म्हणाले “धर्मा, मला वाटले नव्हते, तू कधी असा वागशील!"
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आवडली.
आवडली.
छान, आवडली
छान, आवडली
युधिष्ठराने योग्य धडा घालून दिला
कोण कुठल्या सिच्युएशनला कसा वागेल ते सांगता येत नाही
बाई दवे,
हे वाक्य उशिराने म्हटले
की हळू आवाजात म्हटले
की मनातल्या मनात म्हणून फक्त अंगठा हलवला?
आवडली कथा
आवडली कथा
ऋन्मेऽऽष, मी असे वाचले आहे,
ऋन्मेऽऽष, मी असे वाचले आहे, की युधिष्ठीर ते वाक्य, थोडे पॉज घेऊन आणि तोंडातल्या तोंडात म्हणाला. शिवाय तेव्हढ्यात पांडवांनी (कृष्णाच्या सल्ल्यावरून) जोरात कल्लोळ आणि शंखनाद सुरू केला. त्यामुळे द्रोणांना पुढचे वाक्य ऐकूच आले नाही !
अश्वत्थाम्याच्या मृत्यूची बातमी द्रोणाचार्य सहन करू शकणार नाहीत हे श्रीकृष्णाला पुरते ठाऊक होते!
( आणि असा सत्याचा अपलाप केल्याने, धर्मराजाचा रथ, जो अंगुलीभर जमिनीच्या वर चालत असे, तो जमिनीवर आदळला.
स्वतः च्याच दलातील एक हत्ती मारल्याने ( पशूंना मारणे युद्धात निषिद्ध होते!), भीमाचेही पॉईंट्स कमी झाले.)
ओह! द्रोण असे म्हणाले हे
ओह! द्रोण असे म्हणाले हे माहित नव्हते कारण युदिष्ठीर हो म्हणाल्यावर लगेच देहत्याग करण्यासाठी खाली बसले व धृष्ट्द्युम्नाने त्यांच्यावर वार केला.
पशूंना मारणे युद्धात अवैध होते! >> हे पण माहित नव्हते. महाभारतात ठिकठिकाणी प्राण्यांची मृत शरिरे, डोकी यांची भयानक वर्णन आहे.
शशक आवडलीच!
शिवाय तेव्हढ्यात पांडवांनी
शिवाय तेव्हढ्यात पांडवांनी (कृष्णाच्या सल्ल्यावरून) जोरात कल्लोळ आणि शंखनाद सुरू केला.
>>>>
हा पॉइंट जास्त चांगला जातो या सगळ्यात असे वाटते. म्हणजे सत्यवादी युधि आयत्या टाईमाला गडबडला तरी कवर करायचा प्लान..
हा पॉइंट जास्त चांगला जातो या
हा पॉइंट जास्त चांगला जातो या सगळ्यात असे वाटते. म्हणजे सत्यवादी युधि आयत्या टाईमाला गडबडला तरी कवर करायचा प्लान.. >> हो तसंच होतं ते.. कारण युधि खोटं बोलणार नाही / ते त्याला १००% जमणार नाहे ही हे माहित होतं
ओहो!! फारच सुरेख.
ओहो!! फारच सुरेख.
सुरेख जुळली आहे.
सुरेख जुळली आहे.