शतशब्दकथा

तीन शतशब्दकथा

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 14 March, 2017 - 08:09

१. शुभ्रक्रांती

“शुभ्रक्रांतीच्या रूपाने कृष्णवर्णियांच्या जिवनात नवीन सूर्य उगवलाय. मला आठवतोय तो दिवस जेव्हा गोऱ्यांनी आपल्यावर वांशिक हल्ला केला होता. पण यावेळी आपण संघटीत होतो. एकूणएक गोऱ्याला चिरडून टाकलं आपण, नामोनिशान मिटवून टाकलं त्यांचं या भूमीवरून. जॉनसारखे अनुयायी मिळाले म्हणून हे शक्य झालं.”

“शुभ्रक्रांती जिंदाबाद, जॉन स्मिथ जिंदाबाद” अशा घोषणांनी आसमंत निनादून गेला.

अन्नकण (शतशब्दकथा)

Submitted by अपरिचित on 6 April, 2016 - 03:59

दुपारी मांसाहारी जेवण झाले…. म्हटले आता निवांत अंग टाकावे..... मस्तपैकी वामकुक्षी घ्यावी.... पण दाताच्या फटीत अडकलेला अन्नाचा बारीकसा कण मला स्वस्थ बसू देईना
दातकोरणी घेवून काढता आला असता पण बेडवरून उठण्याचा कंटाळा आला. जिभेनेच कण काढण्यासाठी जीभाग्रेला कामाला लावले
तीनचार मिनिटे गेली असतील पण कण मात्र ढिम्मच. निघायचा नाव घेईना. १५-२० सेकंदाचा ब्रेक घेवून परत प्रयत्न करू लागलो पण पुन्हा पदरी अपयश

विषय: 
शब्दखुणा: 

प्राजक्ताच झाड - शतशब्दकथा

Submitted by प्रकु on 18 April, 2015 - 01:54

एक प्राजक्ताच झाड....
शेजारी अजून एक प्राजक्ताच झाड....

आजूबाजूला वस्ती, बाकी ओसाड....

प्राजक्त बेदरकार, खोडकर....
प्राजक्ता बावरलेली, ‘कस हे अस वेडपट झाड, खोडकर नुस्त....’

गमतीजमतीला चढली गुलाबी किनार....
प्राजक्त प्रेमात वेडा झाला पार....

तो एकटक पाहत राही, बावरलेल्या प्राजक्ताला कळेनाच काही....
हळूहळू तिलापण, ‘तसं’ वाटू लागलं....
नजर भिडताच फुल तिचं गुलाबी होऊ लागलं....

बेदरकार झाडाचा कोण तो आनंद....
बावरलेल्या प्राजक्ताचा चोरून पाहण्याचा छंद....

प्रेम मग जगजाहीर झालं, दोघांच मन स्पर्शासाठी आसुसलं....

पत्र (शतशब्दकथा)

Submitted by आतिवास on 11 March, 2015 - 09:04

मीटिंग संपली.
बाया लगबगीने घराकडे परतल्या.
“माज्या घरी चल,” रखमामावशीने हुकूम सोडला.

मला तिच्याबद्दल अधिक जाणून घ्यायची संधी हवीच होती.
गेले .
चहा झाल्यावर ती म्हणाली, “येक पत्तुर लिवायचंय. लिवशील?”

तेवढी मदत मी नक्कीच करू शकते.

तिने एक ‘कार्ड’ आणलं.
ती सांगत गेली तसंतसं मी लिहिलं.
नव-याला होतं पत्र.

त्या वीसेक ओळींत मला तिच्या जगण्याचं चित्र दिसलं.

“पत्ता?” मी विचारलं.
“नाय ठावं”, रखमामावशी म्हणाली.
मी चमकून तिच्याकडे पाहिलं.
“कुठलं गाव?” “त्याचं एखादं पत्र?”
मी विचारलं.
मावशी गप्पच.

“मावशे, पत्र पोचणार कसं?” मी म्हटलं.
तिने डोळे पुसले.

आगंतुक! - शतशब्दकथा

Submitted by मुग्धमानसी on 11 March, 2015 - 03:10

आज गेले नाही.

एरवी रोजच जाते. भर दुपारी, उन्हात... त्याला भेटायला.
कुणीच नसतं तेंव्हा तिथं. एकांताची छान मैफल जमते...

विचारते खुशाली. कंटाळलेल्या त्याला जराशी तरतरी येते.
बदल्यात तो ऐकून घेतो... माझं सारं!
सल्ले, उत्तरं देत नाही. थट्टा करत नाही. गुपितं फोडत नाही. कळवळतही नाही.
फक्त ऐकून घेतो.
म्हणून तिथं जाते मी रोजच.

काल तिथं गर्दी दिसली. सोहळा असावा... आगंतुका सारखं कसं जावं?
डोकावले तर तोही दिसला... नटून गाभार्‍यात! मी परतले.

वळून पुन्हा बघते तर हा चक्क दाराबाहेर उभा!
"इथे काय करतोयस...?"
तो हसला...
"तुला भेटायला... रोज येत असतो ना... भर दुपारी, उन्हात..."

‘वैकुंठ’ - शतशब्दकथा

Submitted by हर्पेन on 18 February, 2015 - 02:03

'वैकुंठ’-परिसर मला आवडतो. मी तिकडे नेहेमी जातो.

‘निवारा’मध्ये व्यायामशाळा आहे.

कोपऱ्यावरच अनेकविध चांगले कार्यक्रम होत असतात.

वैकुंठात असलेली झाडे, अनेकविध पक्ष्यांचे रात्रीचे वसतीस्थान असल्याकारणाने पक्षी-मोजणीसाठी म्हणूनही तिकडे जाणे होतेच.

एका भित्र्या मैत्रिणीच्या मागे लागलेल्या माणसाला हुकवताना ती इकडे शिरली होती आणि तिचा पाठलाग करणारा माणूस लक्षात आल्यावर घाबरून उलटा पळून गेलेला त्याची आठवण हसूच आणते.

पोचवायला येणाऱ्या माणसांचे आक्रोश मी ऐकलेत; मूठभर खरेखुरे दु:खी सोडता उरलेल्यांचे रडणेच काय आपापसातले संभाषणदेखील मोठेच मनोरंजक असते.

विषय: 

वाट (शतशब्दकथा)

Submitted by आतिवास on 25 December, 2014 - 16:33

त्याची वाट पाहायची तिला सवय झाली होती. नेहमी.

येणं नक्की झालंय म्हणताम्हणता किती वेळा रद्दही व्हायचं.

आणि मग तो आला की भरपूर गर्दी.

ओळखीचे आणि अनोळखीही त्याला भेटायला यायचे.

येणा-या गर्दीच्या डोळ्यांत अभिमान असायचा; चेह-यावर हसू असायचं; वातावरणात आनंद भरून जायचा.

ते पाहताना ‘तो फक्त आपला नाही’ याचं दु:ख ती विसरून जायची.

एक दिवस तार आली.

तो गेला होता. युद्धभूमीवर.

मग तर प्रचंड गर्दी.

अधिकारी, पत्रकार, छायाचित्रकार, राजकीय नेते, सामान्य माणसं.

रीघ नुसती.

त्याच्या शौर्याबद्दल, देशभक्तीबद्दल, त्याने निर्माण केलेल्या आदर्शाबद्दल खूप बोलले ते.

शब्दखुणा: 

क्षमा

Submitted by आतिवास on 28 August, 2014 - 04:37

“तू माझी क्षमा मागितली पाहिजेस”, ती म्हणाली.
डोळ्यातले अश्रू लपवत तो “आय अ‍ॅम सॉरी” म्हणाला.
“सॉरी नाही, क्षमा माग”, ती तिच्या शब्दावर ठाम होती.
“मला क्षमा कर,” तो थरथरत्या आवाजात म्हणाला.

“तूही क्षमा मागितली पाहिजेस”, शेजारच्या उदास स्त्रीकडे वळून ती त्याच स्वरांत उद्गारली.
“मी तुझी क्षमा मागते,” म्हणताना त्या स्त्रीला हुंदका आवरता आला नाही.

तिथे आता सुन्न शांतता होती.
एकदाही मागे वळून न पाहता, अगदी सावकाश ती छोटी मुलगी खोलीच्या बाहेर गेली.

“हं! तर आता तुमच्या पाच वर्षांच्या मुलीचा ताबा कोणाकडे असावा याबाबत आपण बोलू ....” वकील म्हणाली.

अ‍ॅन्ड दे लिव्हड हॅपिली एव्हर आफ्टर (शतशब्दकथा)

Submitted by कविन on 9 December, 2013 - 03:14

ऍन्ड दे लिव्ह्ड हॅपिली एव्हर आफ्टर..
ह्या वाक्यापाशी संपते "त्यांची" कहाणी.

सुरुवातीला होता दोघांच्याही घरुन विरोध.
घरात लग्नाची बहिण आहे, समाज काय म्हणेल? पासून
"हाच तुझा निर्णय असेल तर आ‌ईबाप मेले समज"
इतपर्यंत विरोध करुन पाहिला दोघांच्याही घरच्यांनी

पण ही दोघे ठाम होती स्वत:च्या निर्णयावर.

तडजोडीशिवाय आयुष्य नाही हे त्यांनाही माहित होतं पण,
आयुष्यभर् मुखवटा चढवून नात्याला फसवत जगण्यासारखं दुसरं दु:खं नाही हे ही पटलं होतं.

इन्डीविज्युअल म्हणून चांगले असलो तरी एकमेकांना कॉम्पॅटिबल नाही हे लक्षात आलं,
तेव्हा निभावून् नेण्याचं नाटक करायचं नाकारत ते वेळीच वेगळे झाले

शब्दखुणा: 

भ्रम : शतशब्दकथा

Submitted by अमेय२८०८०७ on 3 October, 2013 - 12:55

तिसर्‍या बाळाच्या जन्मानंतर तो डायरेक्ट विमानतळावरुन, बायकोला घेऊन जाण्यासाठी दवाखान्यात आलेला.
"पासष्टाव्या वर्षी नॉट बॅड", स्वतःशीच फुशारलेला. साठीत लग्न केलं म्हणून कुत्सित हसले, त्यांचे मिठाई खाताना पडणारे चेहरे आठवून सुखावलेला.

आधीच्या दोन्हीवेळी बापाचे वय, गोंडस बाळे पाहून डॉक्टरसुद्धा आशर्यचकित !
"शरीरात दम आहे डॉक्", त्यानं अभिमानानं सांगितलेलं," अजून आपण एवढे फिट, बायको तरुण आणि सुंदर, पोरं होणारच गोरी-गुटगुटीत!!"

तिसरं बाळ नाssही म्हंटलं तरी सावळंच.
गाडीत बसताना ड्रायव्हरचे पांढरेशुभ्र दात काळ्या रंगावर मात करून हास्य सांडणारे.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - शतशब्दकथा