आगंतुक! - शतशब्दकथा

Submitted by मुग्धमानसी on 11 March, 2015 - 03:10

आज गेले नाही.

एरवी रोजच जाते. भर दुपारी, उन्हात... त्याला भेटायला.
कुणीच नसतं तेंव्हा तिथं. एकांताची छान मैफल जमते...

विचारते खुशाली. कंटाळलेल्या त्याला जराशी तरतरी येते.
बदल्यात तो ऐकून घेतो... माझं सारं!
सल्ले, उत्तरं देत नाही. थट्टा करत नाही. गुपितं फोडत नाही. कळवळतही नाही.
फक्त ऐकून घेतो.
म्हणून तिथं जाते मी रोजच.

काल तिथं गर्दी दिसली. सोहळा असावा... आगंतुका सारखं कसं जावं?
डोकावले तर तोही दिसला... नटून गाभार्‍यात! मी परतले.

वळून पुन्हा बघते तर हा चक्क दाराबाहेर उभा!
"इथे काय करतोयस...?"
तो हसला...
"तुला भेटायला... रोज येत असतो ना... भर दुपारी, उन्हात..."

अरेच्च्या....
’हे घर नाही त्याचं! तोही माझ्यासारखाच.... आगंतुक!’

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडलीच प्रश्नच नाही...
बर्याच वेळेला वाचली.. नेमके डोळ्या समोर काय आले तर. त्यासाठी जरा वेळ लागला..खुप ओळखीचे असे काहि मग लक्षात आले.. अरे हि तर राधा कृष्णा कडे जाणारी...

Pages