अन्नकण (शतशब्दकथा)

Submitted by अपरिचित on 6 April, 2016 - 03:59

दुपारी मांसाहारी जेवण झाले…. म्हटले आता निवांत अंग टाकावे..... मस्तपैकी वामकुक्षी घ्यावी.... पण दाताच्या फटीत अडकलेला अन्नाचा बारीकसा कण मला स्वस्थ बसू देईना
दातकोरणी घेवून काढता आला असता पण बेडवरून उठण्याचा कंटाळा आला. जिभेनेच कण काढण्यासाठी जीभाग्रेला कामाला लावले
तीनचार मिनिटे गेली असतील पण कण मात्र ढिम्मच. निघायचा नाव घेईना. १५-२० सेकंदाचा ब्रेक घेवून परत प्रयत्न करू लागलो पण पुन्हा पदरी अपयश

पण न कंटाळता, अगदी जिद्दीने उठून चिकाटीने जिभेनेच कण काढण्याचा प्रयत्न करतच होतो… सरतेशेवटी तब्बल ३ मिनिटे आणी ४० सेकंदाच्या अथक प्रयत्नानंतर कण जागेवरून हलला तेव्हा…हो हो …. तेव्हाच अगदी तेव्हाच मला कळाले "स्साल्ला सुख म्हणजे काय !"

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो ना...
बहुतेक सर्वांचाच अनुभव असा असेल.

भलेही जेवण शाकाहार असो की मांसाहारी असो.. दुपारचे वेळ असो की रात्रौची....जीभाग्रेला कामाला लावणे म्हणजे मोठा पराक्रम आहे

छान Happy

नवीन प्रतिसाद लिहा