‘वैकुंठ’ - शतशब्दकथा

Submitted by हर्पेन on 18 February, 2015 - 02:03

'वैकुंठ’-परिसर मला आवडतो. मी तिकडे नेहेमी जातो.

‘निवारा’मध्ये व्यायामशाळा आहे.

कोपऱ्यावरच अनेकविध चांगले कार्यक्रम होत असतात.

वैकुंठात असलेली झाडे, अनेकविध पक्ष्यांचे रात्रीचे वसतीस्थान असल्याकारणाने पक्षी-मोजणीसाठी म्हणूनही तिकडे जाणे होतेच.

एका भित्र्या मैत्रिणीच्या मागे लागलेल्या माणसाला हुकवताना ती इकडे शिरली होती आणि तिचा पाठलाग करणारा माणूस लक्षात आल्यावर घाबरून उलटा पळून गेलेला त्याची आठवण हसूच आणते.

पोचवायला येणाऱ्या माणसांचे आक्रोश मी ऐकलेत; मूठभर खरेखुरे दु:खी सोडता उरलेल्यांचे रडणेच काय आपापसातले संभाषणदेखील मोठेच मनोरंजक असते.

पण हल्लीच दिसले, ठोसरपागेतून रिकाम्या हाती भकास नजरेने परत येणारे जोडपे...

दोघेच दोघे होते

आणि एकदम गप्पही

‘वैकुंठ’-परिसर आता मला आवडत नाही.

आताशा मी तिकडे फिरकतही नाही.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हर्पेन...................
आवडली असे तरी कसे म्हणु....
पण छान शब्द बद्ध केली आहे तुम्ही कथा....

पण हल्लीच दिसले, ठोसरपागेतून रिकाम्या हाती भकास नजरेने परत येणारे जोडपे...

दोघेच दोघे होते

आणि एकदम गप्पही >> बापरे .. Sad

:-|

आजुबाजुला गोंधळ गडबड सुरु असताना अचानक काही क्षण सगळे कसे शांत, निशब्द्ध होते (फक्त स्वतःसाठी) हे आताच अनुभवलयं तुमच्या या कथेचा शेवट वाचुन.

धन्यवाद मंडळी

शंका होती की समजत्ये का नाही. पुण्याबाहेरच्या / माहीत नसलेल्या लोकांना ठोसर पागेचा संदर्भ लागला(च) नाही तर...

ही शतशब्दकथा त्या एकप्रकारे प्रादेशिकच म्हणावी

ठोसर पागेचा संदर्भ लागला(च) नाही तर...>>> पुण्याचा असूनही ठोसर पागेचा संदर्भ नाही लागला मला. आता ठोसर पागा गुगलून पाहिलं त्यासाठी. 'दोघेच दोघे होते' यावरुन अर्थबोध व्यवस्थित झाला.

मित - 'दोघेच दोघे होते' यावरुन अर्थबोध व्यवस्थित झाला.
अरे पण ठोसर पागेच्या संदर्भामुळे अजूनच वेगळे परिमाण प्राप्त होते रे

ते बहुतेक मिसताहेत सगळे, तळटीप द्यायला हवी होती का?

धन्यवाद दिनेश Happy

हर्पेन, ठोसर पागा गुगलून बघितलं. पण त्या आधीच 'रिकाम्या हाताने' वाचल्यावर लगेच लक्षात येतंय.

हम्मं ! लहाणपणी शेजारच्या अगदी लहान मुलाचा मृत्यू झाला, तेंव्हा त्याला पांढर्‍याकपड्यात गुंडाळून नेत होते. ते दृष्य परत आठवलं.

हर्पेन,

>> ते बहुतेक मिसताहेत सगळे,

मलाही तोच संदर्भ वाटलेला होता पहिल्यांदा. पण शेवटची दोन वाक्यं वाचल्यावर वेगळाच उलगडा झाला. Sad

आ.न.,
-गा.पै.

मला ठोसर पागाचा संदर्भ लागला नाही, पण तरीही दोघेच दोघे, रिकाम्या हाताने याने अर्थ बरोबर समजला. वर इतकं म्हणतोयस म्हणून मी काही मिस केला का हे बघायला गुगलून पाहिलं.
तळटीप अजिबात देऊ नको, त्याने जास्त विरस होईल/ गम्मत (हा शब्द बरोबर नाही, पण जो झटका बसला पाहिजे तो) सौम्य होईल. तो शब्द माहित नसेल तरी काही फरक पडत नाहीये असं माझं मत.
कथा म्हणून आवडली. असं खरंच घडलं असेल तर Sad

हर्पेन....

सारी वाक्येच मन बधीर करून टाकण्याच्या क्षमतेची असल्याने त्यावर प्रतिक्रिया देताना देखील मी जणू काही धुक्यातच आहे असेच वाटू लागले आहे. शतशब्दांचे बंधन असले तरी तुमचा हा धागा केवळ त्यासाठी नसून चर्रदिशी अंगावर येणारा अनुभव असल्याने त्याला बाकीची व्यवधाने लागत नाही. तळटीपेचा आग्रह धरण्यात अर्थ नाही. वाचकाने नावावरून बोध घ्यावा इतपत अपेक्षा लेखकाने बाळगावी. खुद्द मलाही ठोसर पागा माहीत नाही; पण वर अमितव म्हणतात त्यानुसार बसायचा तो झटका बसतोच...बसलाही आहेच.

फार अस्वस्थ करणारे ते शेवटचे वाक्य आहे तुमचे. तरीही शरीर फिरकले नाही तर मन तिकडे घुटमळत राहाणारच, इतकी महती वैकुंठाची आहे.

Pages