ब्रेक - अप (शतशब्दकथा)
आज तिने हे जीवाभावाचं नातं तोडून टाकण्याचा निश्चय केला होता. मनावर दगड ठेवून आयुष्यात पुन्हा कधी त्याचं तोंड बघणार नाही असं ठरवलं होतं. खूप प्रेम केलं तिने त्याच्यावर. इतकं की त्याच्या सहवासाशिवाय तिला करमायचंच नाही. सतत त्याचाच विचार, त्याची भेट कशी होईल हा ध्यास, त्याची सुखद भेट होऊन गेल्यांनतरही आठवणींच्या सुगंधी विचारांमध्ये हरवून जाणे, हेच तिचे विश्व बनले होते. त्याच्या केवळ सोबत असण्याने सगळी tensions दूर पळत असत. विशेषतः पावसाळ्यात त्या दोघांच्या भेटीगाठींना विशेष कैफ चढत असे. पण त्याने त्या बदल्यात काय दिलं? मन आणि शरीरही जाळणारी असह्य वेदना?
“खूप झालं, आता बास!”