आयुष्याचं पान
थोडंफार चुरगळलेलं, अन् थोडं उलगडलेलं
पण आयुष्याचं प्रत्येक पान राहु दे भरलेलं
तिथे नसावा अट्टाहास वळणदार अक्षरांंचा
सरळ स्वच्छ भावनांतून पोहचू दे लिहलेलं
कधी काही पानांवरती पाऊसही बरसावा
सुख दुःखाच्या आसवांनी ओलं चिंब भिजलेलं
थोडा त्या पानांना नाविन्याचा गंध असावा
तरी जुनं सुटू नये काळजामध्ये फुललेलं
आयुष्याच्या पानांचा सुगंध सर्वांना मिळावा
पान असावं प्राजक्ताच्या फुलांसंगे गळलेलं
आयुष्याचे पान भरावे आर्त मनस्वी कवितेने
कृतार्थाच्या कृतज्ञतेनेच्या जाणीवेने झुकलेलं
- रोहन