दरवळ (शतशब्दकथा) - रीलोडेड

Submitted by किल्ली on 22 June, 2018 - 05:26

ती रोजच्याप्रमाणेच आजही यांत्रिकतेने तिच्या कंपनीच्या संकुलात शिरली. शिस्तबद्ध रीतीने लावलेली झाडे, नेत्रसुखद रंगीबेरंगी उमललेली फुलं असणारी छोटेशी बाग, ह्यातून आत जाणाऱ्या रस्त्यावर ती वळली. बागेतून आलेल्या वाऱ्याच्या झुळकेसरशी ती आनंदली. सुगंध दरवळला तसा तिच्या चित्तवृत्ती उल्हसित झाल्या.
“म्हणजे तो इथेच बागेत आहे तर!” तिने अनुमान लावला.
आता तिची नजर भिरभिरत त्याला शोधू लागली. एका सुरंगी फुलांच्या ताटव्याजवळ तिला तो दिसला! त्याची ऐट, सतेज सोन्याप्रमाणे भासणारी कांती आणि तिची कळी खुलावी म्हणून सुगंधाची उधळण करणे हे सगळे पाहून ती भलतीच प्रभावित झाली. ती धडधडत्या अंतःकरणाने त्याच्या जवळ गेली.
हसतमुखाने स्वागत करणारा, तिचा दिवस आनंदाने समृद्ध करणारा तो, तोच होता!
सोनचाफा!
-------------------------------------------------------------------------------------------------------
**किल्ली**
--------------------------------------------------------------------------------------------------------

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त!
सोनचाफ्यावरुन माझ्या गावाकडील घराच्या अंगणातला हिरवा चाफा आठवला. आहा!

सोनचाफा खुप छान लिहिलाय Happy
आमच्याकड़े सोनचाफा कलमासोबत अजुन काही चाफा प्रकार आहेत. नागचाफा, हिरवाचाफा अन् कवठीचाफा (इकडचा आयडी नव्हे बर्र का Wink )

धन्स अंबज्ञ Happy
नागचाफ्याचा वास खूप गोड असतो असं श्यामची आई मध्ये वाचलंय.
हिरवा चाफ्याचं ते गाणं माहित आहे, "लपविलास तू हिरवा चाफा, सुगंध त्याचा लपेल का " आणि कवठीचाफा म्हणजे भूत आणि रहस्य कथा एवढच माहितेय !! Lol
प्रत्यक्षात सुगंध नाही अनुभवला.