सबला (शतशब्दकथा)

Submitted by सुमुक्ता on 27 June, 2018 - 04:42

शशकची लाट आलीच आहे. तेव्हा एक शशक माझीसुद्धा!!
==========================================================================================

खूप आनंदाने आणि आत्मविश्वासाने तिने तो पुरस्कार स्वीकारला - महिला सशक्तीकरण पुरस्कार. उपेक्षित आणि वंचित महिला, मुलींसाठी तिने केलेल्या कार्याचा हा गौरव होता.

पुरस्कार स्वीकारल्यानंतरच्या भाषणात तिने आपल्या कामाबद्दल सविस्तर माहिती दिली. भाषणाच्या शेवटी ती म्हणाली "महिलांना सशक्तीकरणाची गरजच नाही. स्त्री हीच एक शक्ती आहे. पण तिने ते ओळखायला हवे. महिलांनी स्वतंत्र विचार करायला, त्याप्रमाणे वागायला शिकले पाहिजे. तेच खरे तिचे सबलीकरण असेल " उपस्थित लोक भारावून गेले.

पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर ती घरी आली. लगेच पदर खोचून स्वयंपाकघरात गेली. बाहेरून सासूबाईंचा आवाज आला "साबुदाणा भिजत घातला आहेस ना? उद्या वटपौर्णिमा आहे. उपास करायचा आहे ना!!". तिने मुकाट्याने साबुदाणा भिजत घातला.

Group content visibility: 
Use group defaults

सबला असली म्हणुन साबुदाणा भिजवु नये की काय तिने?
आणि उपास करायला तिला स्वतःला आवडत असेल. आजही कितीतरी बयकांनी स्वतःच्या मनाने उपास केला आहे.
आवडत असेल त्याना. आणि नटल्यातही मस्तच.
थोडक्यात ही सबला स्वतःचे निर्णय घेतेय किंवा तिच्यावर उपास करायचाच हे लादलं जातंय हे स्पष्ट झालएलं नाहीये.
स्वयंपाक केला, उपास केला ह्यावर सबला की अबला हे ठरत नाही असं माझं मत.

प्रतिसादांकरिता धन्यवाद विनिता, पवनपरी आणि सस्मित.

सबला असली म्हणुन साबुदाणा भिजवु नये की काय तिने? >>>> नक्की भिजवावा. उपाससुद्धा करावा. पण मुकाट्याने करू नये. स्वतःची इच्छा असेल तरच हे सगळे करावे.

थोडक्यात ही सबला स्वतःचे निर्णय घेतेय किंवा तिच्यावर उपास करायचाच हे लादलं जातंय हे स्पष्ट झालएलं नाहीये. >>> मग तो माझ्या लिहिण्याचा दोष असेल. तो तिचा स्वतःचा निर्णय नाहीये. कोणीतरी तिला तसं करायला सांगते आहे. तिची इच्छा काय आहे ते विचारात न घेता.

पण मुकाट्याने करू नये. स्वतःची इच्छा असेल तरच हे सगळे करावे.>>>> हेच कथेत आलेलं नाहीये. Happy

शेवट अपेक्षित होता. Happy
पण छान मांडलीयस.

मग तो माझ्या लिहिण्याचा दोष असेल. तो तिचा स्वतःचा निर्णय नाहीये. कोणीतरी तिला तसं करायला सांगते आहे. तिची इच्छा काय आहे ते विचारात न घेता.>> "मुकाट्याने" या एकाच शब्दात सगळंच स्पष्ट झालंय की.

धन्यवाद निधी, विनिता!!

"मुकाट्याने" या एकाच शब्दात सगळंच स्पष्ट झालंय की. >>> "मुकाट्याने" ह्या शब्दातच मला वाटले होते की स्पष्ट होईल.

अपेक्षित शेवट असलेली शशक! छान लिहिलियेस सुमुक्ता!

"घरी गेल्यावर लेकाने गरम गरम कॉफीचा मग आणुन दिला. सासुबाईम्हणाल्या, उद्याच्या वटपौर्णिमेसाठी साबुदाणे भिजत घातलेत आणि आताचा स्वयंपाक करून घेतलाय. तिने हसून मान डोलावली आणि उद्यासाठी काय कपडे आणि दागिने घालायचे ह्या तयारीला लागली."

असा हवाय का शेवट, सस्मित?

सुमुक्ताने तिच्या दृष्टीकोनातून शशक लिहिल्ये, तिची नायिका मुकाट्याने करतेय सगळी कामं, ब्र न उच्चारता.

सुमुक्ताने तिच्या दृष्टीकोनातून शशक लिहिल्ये>>>>अर्थातच.
पण मला तो विरोधाभास तितका कथेत उतरलेला नाहीये असं वाटलं. असो.

धन्यवाद जाईजुई

सुमुक्ता, येवू दे पुढची >>> बघु काही जमतं आहे का Happy

छान प्रयत्न

मलाही शेवटचा विरोधाभास तितकासा परिणाम्कारक नाही वाटला