जो जे वांछील

जो जे वांछील (शतशब्दकथा)

Submitted by स्वप्ना_राज on 30 June, 2018 - 09:49

निळ्या शर्टवाल्याचे वडिल भ्रमिष्ट झालेत. शालवाल्या बाईच्या नवर्याला ल्युकेमिया झालाय. ब्लॅक सूटवाल्याचा मुलगा ड्रग्ज घेतो.....

त्या मुलीने माझ्याकडे पाहिलंही नव्हतं तरी तिचे डोळे बघून मला वाटलं - एका माणसाला एव्हढं दु:ख असू शकतं? आधी माझा तिच्या बोलण्यावर विश्वास नव्हता. पण तिने माझ्या डोळ्यात बघून जे सांगितलं ते फक्त मलाच माहित होतं.

मी म्हणालो 'हे मला जमलं तर किती लोकांना मदत करता येईल'.
'आणि श्रीमंत होता येईल, हो ना डॉक्टर?’

मी ओशाळलो.

तिने माझा हात हातात घेतला ‘तुमची खरंच तशी इच्छा आहे?’
‘हो'

Subscribe to RSS - जो जे वांछील