सोबत... (शतशब्दकथा)

Submitted by नानाकळा on 10 November, 2017 - 13:34

जेवण झाल्यावर त्याने त्या कळकट्ट, घाणेरड्या लॉजच्या, भयंकर वास मारणार्‍या खोलीतल्या पलंगावर ताणून दिली.

जेवणाचे पैसे घ्यायला आलेला नोकर अंमळ रेंगाळला...

त्याने विचारले, "काय पाहिजे अजून...टीप?"

"मला काही नको साहेब... तुम्हाला काही लागेल काय आणखी...?"

"नाही. जेवण झाले. आता झोपतो. बास."

"झोपण्यासाठीच... सोबत पाहिजे का? तुमच्या आवडीची मिळेल, एकापेक्षा एक."

तो काय बोलतो हे लक्षात येताच त्याच्या अंगावरून सर्र्कन काटा आला... त्याने त्यास हाकलून लावले.

रात्रभर तो तळमळत कुशीवर कुशी बदलत होता. एका फोनची वाट बघत.

सकाळी तो फोन वाजला...

"सगळे गेलेत. आता चार दिवस आपण दोघेच. तू लवकर ये."

ह्याने ताबडतोब आवरले. आज सहा महिन्यांनी उपवास सुटणार होता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्हाला माणसे आवडतात? हे जरा जास्त पर्सनल नाही झाले का इथे सांगायला..
>>>>

मला कोंबडी आवडते, मला बकरा आवडतो, मला मासेही आवडतात.. हे अनेक जणांनी मायबोलीवर कैक वेळा सांगून झाले आहे. तेव्हा नाही कोणाला ते पर्सनल वाटले.

किती दिवस झालेत त्याने शेवटचा धागा काढून
>>>>>

हे मात्र खरेय. बरेच दिवस झाले धागा काढून. हे मलाही लक्षात आले.
लोकांना वाटते उठसूठ दर दुसरया दिवशी धागा काढलाच पाहिजे असा माझा हट्ट असतो. पण मुळात मी तसा नाहीये. ज्यावर धागा निघावा असे खरेच वाटते तेव्हाच तो विचारपूर्वक काढतो. भले मग महिनाभर नाही आला तरी चालेन. पण धागा पाहिजेच या हट्टापायी तत्त्वांशी फारकत नाही _/\_

अरे काय राव? सोडा त्या ऋ ला....

कथेत ट्विस्ट आहे पुढे.... कोणता तो ओळखा. दुसर्‍या भागात लिहितो. तोवर ग्येस ग्येस ग्येस..... Happy

ट्विस्ट १- ती एक लग्न झालेली स्त्री असेल. नवरा आणि सासरचे इतर सगळे कुठेतरी जाणार असतील तर तिने ह्याला कळवल्यावर हा तिच्या गावी येउन एखाद्या कळकट लॉजवर रात्र काढण्यापुरता थांबला असेल. पहाटेच तिच्या घरचे सगळे गेल्यावर तिने फोन केला असेल.
बाबारे! काय सुचतंय मला Lol
ट्विस्ट २- भुताखेताचा काही मामला असावा.

म्हणजे आप मै और XXXX मिल बैठेंगे तीन यार का?>>> मला पण तेच वाटलं.... लोक तर तर्क लावत सीमेपार पोहोच्ले.....

आज सहा महिन्यांनी उपवास सुटणार होता.
>>>>

अरे उपवास सुटणार होता. काही खायची पार्टी असेल. लोकांना नुसते शरीराची भूकच का दिसतेय. ती काय, तो काय, बाज काय, सगळ्यांच्या डोक्यात नुसते शैय्यासुख नाहीतर सैय्यासुख. घोर कलियुग आहे बाबा.

सगळ्यांच्या डोक्यात नुसते शैय्यासुख नाहीतर सैय्यासुख. घोर कलियुग आहे बाबा.

>> Rofl

तो भक्त प्रल्हादाचा आणि हा धागा एकाच वेळी आल्याने तोच विषय डोक्यात होता म्हणून कदाचित सुतावरून स्वर्ग गाठला कदाचित.

भक्त प्रल्हाद काय, बाज काय, शैय्यासोबत काय, मुलाचा दुसराच बाप काय... कोण म्हणतेय मायबोलीचे सरासरी वय वाढतेय. ही तर पालवी फुटायची लक्षणे आहेत. की याला म्हातारचळ म्हणावे?