शांती (शतशब्दकथा)

Submitted by स्वप्ना_राज on 29 July, 2018 - 01:27

अवकाशातून पृथ्वी निळ्याऐवजी शुभ्रधवल भासत होती.

आता जेरुसलेम शांत होतं. आफ्रिकासुध्दा. येमेन, अफगाणीस्तान, व्हेनेझुएला, इराक, सिरीया धुमसायचे बंद झाले होते. सौदीअरेबिया-इराण, अमेरिका-रशिया, म्यानमार-बांगलादेश, भारत-चीन-पाकिस्तान – सगळीकडे तलवारी म्यान झाल्या होत्या. इस्लामिक स्टेट, तालिबान, बोको हराम, हमास, हिझबुल्ला, जैश, मुस्लीम ब्रदरहूड अश्या अनेक अभद्र संघटनांचं नामोनिशाण उरलं नव्हतं. धर्म, जात, पोटजात, वंश, भाषा, वर्ण - कुठलेच भेद राहिले नव्हते. कुठे बॉम्बस्फोट नाहीत. ड्रोन्सचे हल्ले नाहीत. उध्वस्त शहरं, प्रेतांचे ढीग, तुटलेले हातपाय, रक्तपात, अनाथ मुलं, किंकाळ्या काही काही नाही.

देवाने डोळे उघडले. आणि ते पहाटे पडलेलं स्वप्न असूनही तो खिन्नतेने हसला. आता फक्त एव्हढंच त्याच्या हातात उरलं होतं.
------

डिस्क्लेमरः देव पुरुष आहे किंवा देव आहेच असं काहीही सुचवायचा हेतू नाहिये. एक कथा म्हणून वाचावी ही विनंती. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Wah

विठ्ठल, म्हंणूनच 'अश्या अनेक' हे शब्द टाकलेत. नाहीतर त्या नावांचेच १०० शब्द झाले असते. किंवा 'कथेतले जास्त शब्द ह्या नावांचेच आहेत' अशी कोणाचीतरी कुजकट कॉमेंट आली असती. तसंच फक्त मुस्लिम संघटनाच धार्मिक हिंसाचार करतात असंही सुचवायचं नव्हतं. पण जगात सध्या प्रामुख्याने त्याच दिसताहेत म्हणून ही नावं घेतली.

वावे, अ‍ॅमी Happy तसं नाहिये....माणसं आहेत पण आता आपापसात भांडत नाहियेत. कथेचा असाही अर्थ निघेल हे माझ्या लक्षात आलं नव्हतं.
अदिति, शांतीचा रंग पांढरा ना म्हणून पृथ्वी धवल दिसतेय. Happy

डिस्क्लेमर मध्ये 'एकच देव आहे, हिंदू धर्माप्रमाणे अनेक नाहीत असं सुचवायचा हेतू नाही' हेही वाक्य टाकावं का असा विचार केला होता. पण मूळ कथेच्या लांबीपेक्षा डिस्क्लेमरचीच लांबी जास्त होईल असं वाटल्याने टाकलं नाही. आशा होती की ह्यावर कोणी वाद उकरून काढणार नाही. पण आजकाल मायबोलीवर अशी आशा करण्यात काही अर्थ नाही हे आ.रा.रा. ह्यांच्या प्रतिसादावरून दिसतंय. प्रत्येक बाबतीत धर्म मध्ये आणलाच पाहिजे का? Uhoh असले वाद घालायचे असले तर जिथे ह्यासाठी खास धागे काढलेत तिथे जाऊन घाला की. ज्यांना ह्यात रस नाही त्यांना का वात आणताय? देवाला खरंच असं स्वप्न पडलं तरी ते खरं होण्याची किती सुतराम शक्यता नाही हे ह्या प्रतिसादावरून कळतंय कारण दुसर्या धर्माबद्दल आकस बाळगणारे प्रत्येक धर्मात आहेत. देव झाला म्हणून काय झालं, तो तरी किती जणांना सद्बुध्दी देणार ना......

निखळ मनाने प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे आभार!

मला वाटलं पृथ्वी निर्मनुष्य आणि उजाड झाली की काय!>>>मलाही असंच वाटलं होतं Lol त्यात अजून हा प्रतिसाद...छान...असे दिवस बघायला मिळावे>>> Lol
आता समजली शशक छान आहे Happy

मला वाटलं अणुयुद्धातून निर्माण झालेल्या पांढर्‍या ढगांनी पृथ्वी झाकोळून गेली म्हणून शुभ्रधवल.

कथा वाचून जगजित ची एक गझल आठवली

एक ब्राह्मन ने कहा है के ये साल अच्छा है
दर्द की रात बहोत जल्द ढलेगी अब तो, आग चुल्हो में हर एक रोज जलेगी अब तो,
भूख के मारे कोई बच्चा नही रोयेगा, चैन की नींद हर एक शख्स यहा सोयेगा,
आंधी नफरत की चलेगी ना कही अब के बरस, प्यार की फसल उगायेगी जमी अब के बरस,
है यकीं अब ना कोई शोर शराबा होगा, जुर्म होगा ना कोई खून खराबा होगा...
ओस और धूप के सदमे ना सहेगा कोई, अब मेरे देस मे बेघर ना रहेगा कोई...
नये वादों का जो डाला है, वो जाल अच्छा है, रहनुमाओने कहां है के ये साल अच्छा है..

दिल के खुश रखने को गालिब ये खयाल अच्छा है! हेच खरं.