उपक्रम २ - दुर्लक्ष - हरचंद पालव

Submitted by हरचंद पालव on 19 September, 2023 - 22:56

बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले...
तिचे निस्तेज डोळे अजूनही उघडेच होते. आजवर ज्यांच्यासाठी ती राबली, त्यांनी आज टिपं गाळण्यापलिकडे काहीही केलं नव्हतं. पण त्याचं तिला काहीच वाटत नव्हतं. कसली तरी अलौकिक शांतता तिच्या मुखमंडळावर पसरली होती. त्याला हे बघवेना. जाऊ दे, म्हणून त्याने पाठ फिरवली.

बर्‍याच वेळाने गाडी आली. आता सगळेच गाडीत शिरले. तोही शिरला. गाडी सुरू होणार, इतक्यात पुढल्या सिटाच्या दिशेने आरोळ्या आल्या "म्हैस!! म्हैस!! म्हैस!!". आडोशाच्या चारी खाटा उधळल्या गेल्या होत्या आणि ही सगळी मंडळी पंचनाम्यात गुंतलेली पाहून या प्रसंगाची नायिका आपल्या चारही पायांनी तिथून केव्हाच चालती झालेली होती.

Group content visibility: 
Use group defaults

एकारंभ अनंत अर्थम् - हे चुकीचं वाटतं आहे, त्यामुळे मी उपक्रमाचं नाव बदललं, ह्याबद्दल क्षमस्व. सविस्तर खुलासा २-४ दिवसांपूर्वी संयोजक यांना केलेल्या विपूत आहे.

मस्त आहे कथा.
Happy

एक सूचना. उपक्रमाचे नाव शब्दखुणात लिहीले आणि शीर्षकात फक्त उपक्रम क्र आणि धाग्याचे शीर्षक व लेखकाचे नाव एव्हढेच दिले तर एकसमान शीर्षकाचे अनेक धागे दिसणार नाहीत.

र आ >> उत्तम सूचना. फक्त हे सर्वांनी पाळल्यासच युनिफॉर्मिटी येईल. संयोजकांनाही सुचवा. मी पुढल्या वेळेस लक्षात ठेवतो.

अ‍ॅडमिन यांनी या सूचनेचे स्वागत केले आहे. तसेच उपक्रमाचे नाव शब्दखुणात देता येईल हे त्यांनीच सुचवले आहे.

एकारंभ अनंत अर्थम् - हे चुकीचं वाटतं>>>> hmm
द्वितीय एकवचन नाही प्रथम बहुवचन पाहिजे..
अर्था:
असच आहे का?

शशक मध्ये एकदम म्हैस ची एन्ट्री... धमाल आली.

द्वितीय एकवचन नाही प्रथम बहुवचन पाहिजे >> फक्त तेवढं नाही. बराच घोळ आहे. अनंत अर्थ असं मराठीत असेल तर अनंता: अर्था: - विशेषण - विशेष्य यांचं लिंग आणि वचन दोन्ही जुळलं पाहिजे. शिवाय एकारंभ हे नक्की कसलं रूप आहे? तो सामासिक शब्द वाटतो. म्हणजे एक आरंभ असलेला. पण त्याचं प्रथमा एकवचन एकारंभः (एक आरंभ असलेला - इथे संस्कृतात विसर्ग येतो) किंवा एकारंभा (एक आरंभ असलेली) असं पाहिजे. नुसतं एकारंभ हे पुल्लिंगी संबोधन झालं, ज्याला इथे काही अर्थ लागत नाही. बरं तुम्ही एकारंभ:/भा हा सामासिक शब्द वापरला, तर मग त्या व्यक्ती/गोष्टीला उद्देशून अनंतार्थः/अनंतार्था (अनंत अर्थ असलेला / असलेली) असाही सामासिक शब्द योजावा लागेल. नाहीतर एकारंभः अनंता: अर्था: - ह्याला काही अर्थ नाही. एक तर सगळं समास-विरहित लिहा - एक: आरंभ: अनंता: अर्था: किंवा सगळं सामासिक शब्दात कुणाला तरी उद्देशून विशेषणे लिहा - एकारंभः अनंतार्थः किंवा एकारंभा अनंतार्था. सगळ्यात सोपं - मराठीत लिहा - एक आरंभ अनंत अर्थ.

प्रतिक्रियेबद्दल सर्वांचेच अनेक आभार.

धन्यवाद पूर्ण उलगडून सांगितल्याबद्दल.
खर तर असा वाटतं,
एक आरंभ अनेक अंत पाहिजे किंवा शेवट ..

मला वाटलेलेच की म्हैस असणार....
कारण ईतके प्रतिसाद बघून काहीतरी राडा झालाय म्हणून मी आधी तेच वाचलेले Proud
आवडली Happy

हपा Lol

>>>>कसली तरी अलौकिक शांतता तिच्या मुखमंडळावर पसरली होती.
Lol Lol
किंबहुना आपल्याला मिळालेली १५ मिनीटांची* प्रसिद्धी ती खूप आनंदाने एन्जॉय करत असेलही.

*प्रत्येकाच्या नशीबी १५ मिनिटाचे स्टारडम असते असे म्हणतात.

है शाब्बास ! अलौकिक शांतता वाली म्हैस Happy

बादवे, म्हैस फार दुर्लक्षित प्राणी वाटतो मला. Not getting her due place under the sun. म्हणजे गाय गो’माता’ असेल तर म्हशीला किमान मावशीचा दर्जा तरी नको का ?

हर्पा Lol
अनिंद्य Lol , म्हशींइतकं चिल् कुणी नाही खरंच...

'एकारंभ' मलाही खटकत होतं पण का हे कळत नव्हतं. धन्यवाद.

सूरज एक चंदा एक तारे अनेक >> इथे फुटलो Rofl

अनिंद्य Lol पटलं.
सामो, १५ मिनिटाचे स्टारडम >> शाश्वत सत्य सांगितलेत Happy

हपा Lol

आपण दोघांनीही(/च) पुलंची आठवण काढली बघ उत्सवात! Happy

Pages