मर्यादा

"मर्यादा" (शतशब्दकथा)

Submitted by संशोधक on 4 November, 2019 - 13:07

आत्ता या क्षणाला मला काय वाटतंय सांगू?

तुला घट्ट मिठीत धरावं, अजिबात सोडू नये..
तुझ्या त्या रेशमी केसांमधून हात फिरवावा,

तुझे ते मऊ गाल, ते पाणीदार डोळे जे सतत साऱ्या जगाला अंधारात ठेवत आले, ते मखमली ओठ ज्यांनी कधी सत्य बाहेर नाही येऊ दिलं,

त्यांवर करावा चुंबनांचा वर्षाव अन् झोकून द्यावं स्वतःला त्या काळोख्या अंधारात तुझ्यासवे..

असं कवटळावं की फक्त तो मृत्यूच तुला माझ्यापासून वेगळा करू शकेल...

पण पाय उचलत नाहीयेत, हात धजत नाहीये..
एक गोष्ट आहे जी घट्ट रुजवली गेलीये मनामध्ये लहानपणापासून...

मर्यादा...

Subscribe to RSS - मर्यादा