बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले...
तिचे निस्तेज डोळे अजूनही उघडेच होते. आजवर ज्यांच्यासाठी ती राबली, त्यांनी आज टिपं गाळण्यापलिकडे काहीही केलं नव्हतं. पण त्याचं तिला काहीच वाटत नव्हतं. कसली तरी अलौकिक शांतता तिच्या मुखमंडळावर पसरली होती. त्याला हे बघवेना. जाऊ दे, म्हणून त्याने पाठ फिरवली.
नमस्कार, मला Water Retention मुळे वाढलेले वजन कमी कसे करायचे ह्यावर उपाय हवे आहेत.
माझ्या बहिनीची मुलगी (वय ८ वर्षे - वजन ४५ किलो) हिचे वजन Water Retention मुळे वाढलेय अस आयुर्वेदिक डॉ, चे म्हणणे आहे. त्यांची औषधे चालू आहेत. पण अजून काय करता येईल आणि ह्याचे नंतर काय काय परिणाम होवू शकतील किंवा पुढे काय काळजी घ्यावी जेणे करून वजन नेहमी अटोक्यात राहिल?
दादर माटुंगा बांद्रा माहिम या परिसरातील समुपदेशकांबद्दल माहिती हवी आहे. जवळच्या नात्यातील एका व्यक्तीला डिप्रेशन सिंड्रोम्स दिसत आहेत. कृपया कोणाला एखाद्या चांगल्या समुपदेशकाबद्दल माहिती असल्यास सांगा. धन्यवाद.
आमच्या एका परिचीतांनी त्यांच्या मुलांची वरील टेस्ट करून घेतली. या टेस्ट मध्ये त्या व्यक्तीच्या बोटांचे ठसे घेऊन त्याचे विश्लेष्ण केले जाते आणि त्यावरुन त्या व्यक्ती साठी कोणते करीयरचे पर्याय योग्य असतील ते सुचवले जाते. तुमचे वेगवेगळे ईंटलिजन्स विश्लेषण करून रिपोर्ट तयार करतात म्हणजे https://en.wikipedia.org/wiki/Theory_of_multiple_intelligences इथे दिलेल्या ईंटलिजन्स चे विश्लेषण करतात. त्यांच्या मते बोटांच्या ठशावरून या ईंटलिजन्स मॅपिंग करता येते.
नमस्कार
वेगळ्या धाग्यावर पुणे शहरातील डॉक्टर्सची अत्यंत उपयुक्त माहिती मिळतेय, पण पिं.चिं. / पिंपळे सौदागर/ वाकड/निगडी/ आकुर्डी येथील डॉक्टर्सची माहिती मिळत नाहीये.
या धाग्यावर आपण पिंपरी / चिंचवड / पिंपळे सौदागर / पिंपळे निलख/ वाकड / निगडी / आकुर्डी / चिखली / मोशी मधील चांगल्या डॉक्टरांबद्दल जितके माहितीवर्धक लिहिता येईल तेवढी माहिती लिहूया. त्यांचा फोन क्रमांक, पत्ता, कशासाठी प्रसिद्ध, त्यांच्या कामाच्या वेळा, आलेला अनुभव इत्यादी.
नवी मुंबईतले चांगले डॉक्टर (व्यक्ती म्हणुन + व्यवसायाने) यांची यादी.
नाव, गाव, पत्ता, वेळ, स्पेशलायझेशन, पॅथी.
कळ कळीची विनंती - शीर्षकापासून आतला कंटेन्ट काहीही हास्यास्पद वाटला तर जरूर थट्टा मस्करी करा.
पण धागा ईतकाही भरकटवू नका की इथे कोणी दिलेला योग्य सल्ला त्यात हरवून जाईल.
कारण प्रॉब्लेम खरेच फार जेन्युईन आहे.
थेट मुद्द्यावर यायच्या आधी थोडी पार्श्वभूमी सांगतो.
आमचे संविधान
स्वातंत्र्य समता बंधुत्वाचा
चरा-चरात मिळतो मान
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा
इथे मिळतो हो बहूमान
धर्मनिरपेक्षता समाजवादी
आहे एकात्मतेचा प्राण
मानवतेच्या कल्याणासाठी
जगात भारी आमचे संविधान
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
माझ्या एक परिचितांना (वय : ६१ वर्षे) सोरायसिस चा फार त्रास सुरु आहे गेली अनेक वर्षे. इतके दिवस सहन होत होतं तोवर काही क्रीम्स वापरत होते. पण आत्ता त्रास फार वाढलाय आणि त्यावर पायाचे दुखणे पण फार वाढलं आहे. शिवाय मधुमेहाचा त्रास आहेच.
संपूर्ण उपचार घेतल्याशिवाय आत्ता पर्याय नाही आणि त्यासाठी पुण्यातील डॉक्टर/वैद्य यांचा संदर्भ मिळेल काय. 'फॅमिली डॉक्टर' मध्ये "श्री सिद्धिविनायक आयुर्वेद फाउंडेशन" ची जाहिरात येते कायम याच्या उपचारा संदर्भात. त्यांना संपर्क करणार आहोतच, पण कुणाला अधिक माहिती अथवा अनुभव असेल तर नक्की लिहा इथे.