स्मूदी फॅन क्लब
Submitted by मेधा on 9 January, 2018 - 11:20
वेग वेगळ्या भाज्या, फळे यांचा आहारात समावेश असावा म्हणून, सोपे , सहज जमणारे प्रकार म्हणून, व्यायामशाळेत जाताना हातात स्मूदीचा प्याला दिसला तर जास्त भाव मिळतो म्हणून, अशा अनेकविध कारणांनी अनेक जण स्मूदीचे फॅन आहेत. आंतरजालावर वजन वाढवणे, वजन कमी करणे, इथपासून प्रत्येक प्रकारच्या व्याधी साठी स्मूदी च्या कृती सापडतात. तरिही, मायबोलीकरांच्या ट्राईड अॅण्ड टेस्टेड स्मूदी पाककृतींकरता हा धागा.