सांबार - अजून एक पद्धत

Submitted by योकु on 23 September, 2013 - 03:28
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

- १ लहान वाटी तूरडाळ
- ८/१० शॅलट्स (अगदी छोटे कांदे). नसतील तर एका कांद्याच्या उभ्या फोडी
- ५/७ लाल भोपळ्याच्या / दुधीच्या फोडी
- थोड्या शेंगांचे तुकडे, कुठल्याही शेंगा चालतील
- अजून हव्या त्या भाज्या, अगदी भेंडीचे तुकडेसुद्धा चालतील
- सांबार मसाला (मी एवरेस्ट चा वापरतो)
- हळद
- तिखट
- मीठ
- २ लाल सुक्या मिरचीचे तुकडे.
- हिमी, कडिपत्ता, कोथिंबीर
- थोडी चिंच किंवा १ मध्यम टोमॅटोच्या बारीक फोडी (मला स्वतः ला टोमॅटो जास्त चांगला वाटतो). आमसुल वापरू नये.

क्रमवार पाककृती: 

- सगळ्या भाज्या धूवून बेताच्या आकाराचे तुकडे करून ठेवावेत.
- डाळ कुकरात शिजवून घ्यावी
- आता कुकरमध्येच जवळजवळ तिप्पट पाणी घालून डाळ + पाणी मंद गॅसवर ठेवाव.
- टोमॅटो चे तुकडे ही आताच (वापरत असाल तर) डाळीत फेकावे.
- एका पॅनमध्ये थोडं तेल घालावं, तापलं की सगळ्या भाज्या वेगवेगळ्या परतून घ्याव्यात. एक भाजी झाली की ती कुकरमधल्या डाळीत फेकत जावी. लागलं तर अजून तेल वापरावं.
- सगळ्या भाज्या कुकरमध्ये गेल्यावर डाळ + भाज्या + पाणी पहावं, खूप घट्टसर असेल तर अजून पाणी घालावं. पाणी भाज्या यांना कसलही रंग रूप दिसत नाही या स्टेजला. सगळं अक्षरशः चोथापाणी दिसतं. नो वरीज.
- आता डाळीत सांबार मसाला २/३ टीस्पून शीग लावून घालावा, मीठ घालावं. ताबडतोब सगळं मिळून येतं.
- आता पुन्हा पॅन्मध्ये जवळ२ २/२.५ टेस्पू तेल गरम करावं. त्यात मोहोरी, हिंग, लाल मिरच्या, हिरव्या मिरच्या, हळद, तिखट, कडिपत्ता घालून चरचरीत फोडणी करावी> सांबारावर ओतावी.
- सांबार दणदणीत उकळावं, मग कोथिबीरीने सजवावं.
- गरम भाताबरोबर ओरपावं.

वाढणी/प्रमाण: 
लागेल तसं. पण खरम्हण्जे इतक्या भाज्या असल्यानंतर दुसरं काही लागत नाही,.
अधिक टिपा: 

- चिंच वापरणार असाल तर कोळ डाळीबरोबर घातला तर चालेल.
- हे सांबार जसं जस थंड होईल, तसं तसं अजून दाट होत जातं.
- जवळ जवळ हॉटेलच्या चवीजवळ्ची चव साधते.
- मी हे आज केलेलं नाहीत्यामुळे फोटो नाही. ऑफिसातून बडवलंय
- अजून ऑथेंटिंक चवीकरता खोबरेल वापरता येईल. पण मला तो वासही सहन नाही होत Sad
- भाज्या वेगवेगळ्या परतून घेतल्याने गचका नाही होत.
- येवढी सगळी उस्तवार आपल्याकडून नसेल होत तर सरळ फोन उचलून कोपर्यावरच्या शेट्टी कडून सांबार अन सोबत वडा, ईडली, दोसा जे हवं ते मागवावं.

माहितीचा स्रोत: 
ऑफिसची कलिग...
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लै भारी योकु.
एक शंका . "टोमॅटो चे तुकडे ही आताच (वापरत असाल तर) डाळीत फेकावे.
- एका पॅनमध्ये थोडं तेल घालावं, तापलं की सगळ्या भाज्या वेगवेगळ्या परतून घ्याव्यात. एक भाजी झाली की ती कुकरमधल्या डाळीत फेकत जावी"<<<< ही सगळी फेकाफेकी किती अंतरावरुन करायची म्हणे? Uhoh

इतकं का करायचं? मी तर यापेक्षाही सोप्पं करते.
डाळ कुकरात शिजवून घेऊन, दुसरीकडे फोडणीत सगळ्या भाज्या परतून घेते, डाळ घालते, पाणी मसाला चिंचेचा कोळ, गुळ, आणि एव्हरेस्टचा सांबार मसाला घालून खळाखळा उकळायचं झालं.
सांबार युनिक असते कुणाच्या आसपास टेस्ट जाईल याची कशाला चिंता आणि अपेक्षा?
आपलंच सांबार बेस्ट असा अ‍ॅटिट्यूड ठेवून ओरपावे. Happy

दक्षे +१ मी सुद्धा असच करते सांबार..
योकुची ही रेसिपी मला जरा किचकटच वाटली..
त्यापेक्षा कुकरात भाज्या (चिरलेल्या मिळतात त्याच आणायच्या) व डाळ परतून त्यात चिंचेचा कोळ आणि सांबार मसाला घालून त्यात पाणी घालायच नि कुकरच्या ४-५ शिट्या झाल्या की जो लगदा होईल त्यात गरजेप्रमाणे पाणी नि गुळ घालायचा.. झाल विनाकट्कटीच सांबार.. सोप्पय Happy

Lol

जास्ती जोरात फेकल्याने सांबार विनाकटकटीचं राहणार नाही. भिंतीवर उडलेले सांबाराचे शिंतोडे साफ करावे लागतील ती कटकट होईल.

यातच थोडं तांदळाचं पीठ आणि थोडं उडदाचं पीठ घातलं तर इडली/डोसा करण्याची कटकट वाचेल. तांदुळ घातल्यास भात करण्याची कटकट वाचेल.

यातच थोडं तांदळाचं पीठ आणि थोडं उडदाचं पीठ घातलं तर इडली/डोसा करण्याची कटकट वाचेल. तांदुळ घातल्यास भात करण्याची कटकट वाचेल.>> मामे, 'घालणं'ला 'फेकणं'ने रिप्लेस करता येईल का? Wink

यात आल -लसुण पेस्ट नाहिये. सांबारात असते का हि पेस्ट>>> udupi-managalore aani madrasi sambaaraat nakkee nasatech.

Yogesh, aamhee bhaajyaa telaat paratoon n ghetaa tashaash ghaalato. saambaar masaalaa ghareech banavato.

तांदुळ घातल्यास भात करण्याची कटकट वाचेल.><><>>> mag tamili lok tyaalaa bisi bele bhaat mhanateel aani kaanadee lok chidoon bsateel. Happy

मामी....:हहगलो:.............बाकी फेकाफेकी आवडली (फक्त ती लिहिण्यापुरतीच हं) ................:स्मित: