बागकाम-अमेरीका २०१५

Submitted by स्वाती२ on 27 January, 2015 - 10:36

मंडळी,
नॉर्थ ईस्ट भागात ब्लिझार्डमुळे फुटभर स्नो असताना वसंत ऋतूची स्वप्ने पहात बागकामाचा धागा काढणे काहिसे वेडेपणाचे वाटेल. परंतू या वर्षीचे कॅटलॉग्ज यायला लागलेत. गावातल्या शेतीच्या दुकानात बीयाही आल्यात. तेव्हा उबदार घरात बसून यावर्षीचे बागकामाचे प्लॅनिंग करण्यासाठी धागा सुरु करत आहे.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy

दर वर्षीप्रमाणे ट्युलिप्सचे बल्ब्स आणून वेळेत लावायचे राहून गेले. भारतात जायचं ठरलं म्हणून बरोबर नेले. तिथे पोचेपर्यंत त्या कंदांना कोंब फुटले. सध्या एवढंच Happy

Lol खरंय मी चक्रावलोच. बागकाम कुठे आता म्हणून.
आतापासूनच घरात बिया रुजवून तापमान वाढल्यावर त्या बाहेर लावता/ लावायच्या असतात का? आता त्या बियांच्या पाकिटावर ही आठवतंय लिहिलेलं फेब/ मार्च ला लावा ते.
गेल्या fall ला ट्युलिप्स आणि daffodils खड्यात गेलेत बघुया काही वर येतं का. Happy

मला सालाबादप्रमाणे या ही वर्षी मम्स मागवायची इच्छा आहे. कुंड्या कुठे ठेवायच्या हा प्रश्न निकालात निघाल्यास विचार करेन. Wink

मी गेल्यावर्षी स्नो सोईंगचा प्रयोग केला. तो बराचसा यशस्वीही झाला. त्यामुळे यावर्षीही मी स्नो सोईंग करणार आहे. स्नोसोइंगसाठी मी गॅलनच आणि अर्ध्या गॅलनचे दुधाचे जग वापरते. काल हे जग्ज स्वच्छ धुवुन घेतले. त्यांना तळाला ड्रेनेजसाठी भोक पाडली. सुरीने जग्ज साधारण तळापासून ३ इंच उंचीवर अर्धवट कापून घेतले. यात पॉटिंग सॉईल घालून माझी छोटी ग्रीन हाऊसेस तयार केली. आज पाणी घालून घरकुलातली पॉटिंग सॉइल एकसमान ओली करुन घेणार. उद्या त्यावर सीड स्टार्टरचा एक थर देऊन पेरेनियल्सच्या बीया लावेन, अर्थवट कापलेले भाग डक्ट टेपने जोडेन आणि बाहेर डेकवर ठेवेन. स्नो/स्लीट्/रेन, फ्रीज-थॉचे सायकल आणि अधून मधून मिळणारा सूर्यप्रकाश बाकीचे काम करतील. गेल्या वर्षी अशा पद्धतीने बीया लावून कोनफ्लॉवर्स, पिंक्स, शास्ता डेझी, कोरीऑप्सिस, हिसॉप, ब्यू बेलफ्लॉवर यांची रोपे/झाडे तयार केली. सर्व झाडांना पहील्या सिझनमधेच फुले आली. गेल्यावर्षी कोलंबाईनच्या बाबतीत हा प्रयोग यशस्वी झाला नाही. यावर्षी मी पुन्हा प्रयत्न करणार आहे.

वा आला का धागा ? भारी !
आम्हांलाही झाडं लावायची आहेत यंदा. तर जरा शहाणे करून सोडा..
१. भाज्या लावण्याबद्दल आधी कोणी यादी टाकली आहे का? म्हणजे कधी, कसं, काय पेरायचं, उन्हात की सावलीत वगैरे ?
२. हेच फुलांसाठी पण.. कुठली लावावी, कधी, कशी वगैरे..
३. आम्ही कुंड्यांमध्ये लावणार झाडं अर्थातच.. त्यामुळे त्यासंबंधी काही टिपा वगैरे..
४. तो 'झोन' प्रकार मी गुगल करतोच.. पण त्या संबंधीपण काही स्पेसिफिक इन्पुट्स...

मी आधीच्या वर्षांचे बाफ चाळले.. तिथे सगळ्यांनी अपडेट्स दिलेत.. गाईडन्स द्या.. Happy कोणी कुठल्या वेबसाईट्स सुचवल्या तरी चालतील..

early blooming, late blooming ट्युलिप्स, कोलंबाईन, फुशिया, लिलीज, मागच्या वर्षीचे डेलियाचे कंद , रोज ऑफ शॅरॉन नि हिबिस्कस, फॉल बेगोनिया, मम्स असा स्प्रिंग ते फॉलचा प्लॅन आहे. बघू कितपत जमतो ते.

तो 'झोन' प्रकार मी गुगल करतोच.. पण त्या संबंधीपण काही स्पेसिफिक इन्पुट्स... >> पग्या झोन जरी मह्त्वाचे असले तरी लोकल झोन म्हणून पण एक प्रकार असतो. थोडक्यात तू कुठे काय लावतोयस तिथले लोकल हवामान (म्हणजे अगदी कुठला कोपरा, तिथे किती सूर्यप्रकाश येतो, घराच्या किती जवळ आहे वगैरे) गोष्टींनी भरपूर फरक पडतो. तेंव्हा प्रयोग करायला अजिबात कचरू नकोस.

स्वाती२ आम्ही पुण्यात रहाणारी माणसं स्वछ् सूर्यप्रकाशाला सरावलेली. तुम्हाला झाडं लावायला सिझनची वाट पहावी लागते.तरी तुम्ही हा छंद जोपासता आहात. खुप छान.सिझनला झाडं बह्ररतील तेंव्हा फोटो नककी टाका.

पराग,
http://www.extension.org/ या ठिकाणी तुमचे झीप दिले की लोकल एक्सटेन्शन साईट मिळेल. तिथे तुमच्या इथल्या लॅन्ड ग्रॅन्ट युनिवर्सिटीतर्फे बरीच माहिती मिळेल.
http://www.gardenweb.com/ ही साईट देखील छान आहे.

मी केलेल्या स्नो सोइंग प्रोजेक्टचे फोटो देत आहे.
snow sowing1.jpg
ड्रेनेज साठी भोके करुन घेतलेला दुधाचा जग
snow sowing 2.jpg
कापण्यासाठी मार्करने केलेली खूण
snow sowing3.jpg
कापलेल्या जगमधे पॉटिंग सॉइल भरुन बीया लावल्या.
snow sowing 4.jpg
कापलेला भाग टेपने कव्हर म्हणून चिकटवला.
परमनंट मार्करने लेबल लिहून तयार केलेले जग्ज बाहेर पॅटिओ/डेक वर ठेवले.

स्वाती२ सॉलिड पेशन्स आहे. मी यंदा फॉलमध्ये गुलाब ट्रीम करायला विसरले आहे. आता कधी करायचे की स्र्पिंग आल्यावर झाडं आपलं आपलं बघून घेतील?

वेका, गुलाब अर्ली स्प्रिंगमधे प्रून करायचे. पालवी फुटायच्या आधी लीफ बड्स आल्या की प्रून कर. मग जोमाने पालवी फुटेल.

ज्यांना मम्समध्ये इंटरेस्ट असेल त्यांनी ही साईट बघा. https://www.kingsmums.com/

माझ्याकडे त्यांचा यावर्षीचा कॅटलॉग आला आहे. दरवर्षीप्रमाणे मला याही वर्षी रोपं ऑर्डर कराविशी वाटताहेत (मनातल्या मनात).

स्वाती२ ! छान प्रकार आहे! हे सगळ केल्यावर बाहेरच ठेवायच का स्नोमधे! का आतबाहेर करायच?बिया रुजल्यावर मुळ कसे बाहेर पडतिल? बिया रुजवल्यावर पुढचा प्रवास कसा ?

स्वाती२, अगदीच बेसिक प्रश्न.
कापलेला डबा परत जोडला का? उघडाच का नाही ठेवला? वारा, उडणारा स्नो इ. पासून संरक्षण म्हणून का? पण मग तुम्ही वर म्हणताय तसा सूर्य प्रकाश कसा मिळणार? तापमान वाढलं की झाकण काढणार का? म्हणजे रोप उगवेल.

स्नो सोइंग साठी तयार केले की बाहेर ठेवायचे. स्नो, स्लीट जे काय पडेल त्याबाबत काळजी करायची नाही. गेल्यावर्षी काही दिवस माझी घरकुले स्नोखाली होती. नेटिव पेरेनिअल्सच्या बीया निसर्गात अशाच रुजतात. स्प्रिंगमधे हळू हळू तपमान वाढेल तसे बीया रुजून हिरवी पाने डोकावू लागतील. मग टेप काढायची. इंडियानात थोडे वार्म होऊन परत फ्रॉस्ट होणे नॉर्मल आहे. तसे असेल तर सुरवातीला हवे तर दिवसभर कव्हर काढायचे आणि रात्री घालायचे. त्यासाठीच वरचा भाग अर्धवट कापला आहे. खरी पाने(म्हणजे कॉटलिडॉन नंतरची) आली की कव्हर घालायची गरज नाही. काही वेळा स्प्रींग मधल्या पावसात ही रोपे मोडून जात आहेत असे वाटेल पण हाताळायचा मोह टाळावा. दुसर्‍या दिवशी ऊन पडले की रोपे आपोआप तरातील. या काळात रोपे पाण्या अभावी सुकत नाहीतना एवढेच बघावे. ५-६ तासाचा सूर्यप्रकाश पुरतो. रोपे बागेत लावण्यासाठी सोपे जावे म्हणून लावतानाच छोट्या कपात लावून ते कप मिल्क जग मधे असेही करता येइल. मी गेल्यावर्षी टीपी रोलचे सीड स्टार्टिंग पॉट्स केले होते. ते वापरले. अजून काही प्रश्न असतील तर जरुर विचारा.

अमितव, लीलीला दांड्याच्या टोकावर फुलं येतात. सगळी फुलं येऊन गेली की दांडे शक्य तितके जमिनीलगत कापून टाकायचे. लीलीची पाने फॉलमधे मेली की हाताने नुसती ओढली तरी निघून येतात. बाकी फार काही करावे लागत नाही.

सिंडरेला, मला जाणवलेला सगळ्यात मोठा फायदा म्हणजे फारसे बेबी सिटिंग करावे लागले नाही. जी रोपे तयार झाली ती दणकट होती. तसेच बीयांपासून रोपे करतो तेव्हा पेरेनियल्सना सहसा पहिल्यावर्षी फुले येत नाहीत. पण स्नो सोइंग मधून तयार झालेल्या रोपांना पहिल्याच वर्षी भरपूर फुले आली. बरेचदा स्प्रिंगमधे लेट्युस, पालक, केल वगैरे साठी ग्रोईंग सिझन कमी पडतो. जमिन काम करण्यालायक थॉ होऊन मग बिया लावणे यात रोपे तयार होऊन १-२ हार्वेस्ट केले नाही तर बोल्ट होणे सुरु होते. यात तसे होत नाही. त्यामुळे ग्रोइंग सिझान वाढतो. हे सगळे करताना मजा आली. इतरांना तयार रोपं मुक्त हस्ते वाटता आली. माझे पैसेही वाचले. दर तयार फुलझाडामागे $७-$९ .

मुलांसाठी हा छान प्रोजेक्ट आहे.

सिंडरेला, पंपकिन साठी नको वापरू ही पद्धत. इन फॅक्ट भोपळ्याच्या बीया कोमट पाण्यात भिजत घालून लावाव्यात असे मला गोर्ड सोसायटीच्या बाईने सांगितले.

अमित, हौस म्हणून बनवणार आहोत रोपं. रोपं उतरलीच तर कुंडीत लावून ठेवेन. पुढे बघू. मी चाफा, मधुमालती असेच सांभाळले आहेत.

बरं भोपळ्यासाठी नाही पण बाकी दोन चालतील ना?

मला यंदा कण्हेराची फांदी कोण देणार? Happy

नको. ज्या बियांना कोल्ड ट्रिटमेंटचा फायदा होतो असे काही तरी चालेल. लिंबू, संत्रे नुसतेच घरात कुंडीत बीया लावून होईल. मटार ,ब्रोकोली असे काही चालेल.

स्वाती२ छान माहिती! आता झोन शोधुन कोणत्या बिया रुजतील ते बघणार...

बर,जमिनितल्या फोफावणार्या पुदिनाचा बन्दोबस्त कसा करावा?मला तो पुर्ण काढुन टाकायचाय पण, पुदिना फार चिवट असतो आणी डिप जातो त्यामुळे कितिही काढला तरी अजुन आहेच!
(पुदिना कधिही जमिनित लावु नका!!)

सिंडरेला, धाकल्याच्या डे केअरच्या खिडकीत कालच संत्र्याचं रोप दोन इल्लु पालवी आलेली पाहिलीत. तुझ्यासाठी विचारू का त्यांना काय केलं ते? इकडे संत्र्याची झाडं बिडं लावायची अजाबाताच परिस्थिती नाही पण माहित नाही त्यांचं पोरांना अनुभव म्हणूनच एखाचं प्रोजेक्ट असू शकेल.

अगं रोपं बनवायची कशी ते माहिती आहे. स्नो सोइंग करता येइल का असा विचार होता. पण आता दुसर्‍या कुठल्या बियांचं बघते.

Pages