फोडणीचे पोहे - भाज्या घालून

Submitted by योकु on 29 December, 2016 - 10:18
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

- दोन ते अडीच वाट्या जाड पोहे
- वाटीभर ताजे मटार दाणे
- पाऊण वाटी फ्लॉवरचे बारीक तुरे
- एक मध्यम बटाटा काचर्‍या करून
- एक मध्यम मोठा कांदा पातळ उभा चिरून
- पौष्टिकपणा हवाच असेल तर बोगातु बारीक चिरून
- थोडे शेंगदाणे
- चार, पाच तिखट हिरव्या मिरच्या बारीक चिरून
- २०/२५ कढिलिंबाची पानं
- मीठ
- साखर
- लाल तिखट
- तेल
- मोहोरी
- जिरं
- कोथिंबीर
- लिंबू
- ओलं खोबरं/ सुकं खोबरं किसून
- भुजिया शेव

क्रमवार पाककृती: 

- पोहे स्वच्छ निवडून, धूवून मग पाण्यात मिनिटभर भिजत घालावेत. नंतर चाळणीत निथळत ठेवावे.
- सगळ्या भाज्या बारीक चिरून तयार ठेवाव्यात
- जरा जास्त तेलाची फोडणी करावी. तेल चांगलं तापलं की मोहोरी घालावी, ती तडतडली की मग जिरं; त्यावर मिरच्या मग शेंगदाणे घालावेत. दाणे जरा खरपूस झाले की मटारदाणे घालावेत.
- त्यावर कांदा घालून परतावं. कांद्याचा जरा रंग बदलला की बटाट्याच्या काचर्‍या, फ्लॉवरचे तुरे आणि कढीलिंबाची पानं घालावीत (जरा नंतर कढीपत्ता घातल्यानी त्याचा हिरवा रंग टिकतो). हे सगळं नीट परतायचं आहे. यात आता संपूर्ण पोह्यांना पुरेल एवढं मीठ घालून परतावं आणि झाकण घालून एक दणदणीत वाफ आणावी. बटाटा, मटार, फ्लॉवर शिजला की मग हळद, तिखट घालायचं.
- पुन्हा एकदा २ ते ३ मिनिटं परतायचं म्हणजे तिखटाचा, हळदीचा कचवटपणा जाईल.
- यात आता भिजवलेले पोहे घालायचे, चवीला थोडी साखर घालायची मोठं अर्ध लिंबू पिळायचं. सगळं व्यवस्थित हलवून झाकण घालून पुन्हा एक दणदणीत वाफ येऊ द्यायची.
- भरपूर भाज्या घातलेले एकदम चविष्ट पोहे तयार आहेत.
- मस्तपैकी आपल्याकरता प्लेट भरून घ्यायची. त्यावर भरपूर हिरवीगार कोथिंबीर घालायची, ओलं खोबरं किसून घालायचं, बाजूला थोडी भुजिया शेव घ्यायची; लिंबाची एक फोड ठेवायची. आवडतं पुस्तक, नाटक, टिव्ही, गाणी काय हवं ते लावायचं, सोबत घ्यायचं; अंगावर शाल घ्यायची आणि मग हे पोहे गरमागरम चापायचे. अगदी पोटभर. Happy

वाढणी/प्रमाण: 
२/३ लोकांकरता पोटभर
अधिक टिपा: 

- सगळे जिन्नस आपआपल्या आवडीनुसार, चवीनुसार कमी जास्त करता येतील. एखाद दुसरी वस्तू बदलली/ वगळली तरी चालेल. आपल्याकरताच तर करायचेत! Wink
- हळद घालतांना जरा जपून
- लिंबू, कोथिंबीर, ओलं खोबरं यात कंजूषी नको
- तेलही जरा जास्त लागेलच कारण सगळ्या भाज्या तेलावरच शिजवायच्या आहेत. तसंही तेल फार कमी झालं तर पोहे कोरडे वाटतील. तेल, या वापरलेल्या भाज्या, कोथिंबीर वगैरे जिनसांमुळे मस्त मॉईस्ट, वाफभरले पोहे होतात.

माहितीचा स्रोत: 
थोडा फ्लॉवर होता, तो कुठे ढकलायचा या विचारात हे पोहे झालेत.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे मस्त वाटतय. करून बघायला पाहिजे. या भाज्यां बरोबर रंगीत भोपळी मिरच्या घातल्या तर अजून चांगले लागतील पोहे.

>>>सिमला मिरची कुठे ढकलावी >> असा विचार करावा लागतो----

भाजी खाउन कंटाळा आला. कच्ची कापुन सँड्विचमध्ये खाउन पण कंटाळा आला. पोहे आवडतात पण त्यात कधी ही मिरची कधी घातली नव्हती. तर करुन पाहेन असे म्हणाले.तुम्हाला एवढे आश्चर्य का वाटले? कुणी काय विचार करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न. ईथे कडमडायला एवढ्यासाठीच आलात का? बाकी रेसिपीच्या अनुषंगानेच बोला. काय वैताग आहे!

मला कोबी हवाच असतो फोडणीच्या पोह्यांत. बाकी मटार असून नसून चालतात. कांदा जास्त घातला फोडणीत की पोहे मऊ होतात. तसंच टोमॅटोही चांगला लागतो.

कोबी ट्राय करायला हवा. तो ही उरतोच भाजी करुन झाल्यावर. ईथे मोठ्ठा गड्डाच घ्यावा लागतो. कधीतरीच अर्धा कापलेला मिळतो. भाजी करुन उरलेला, पराठे करुन, वडया करुन सम्पवते. आता पोह्यात घालुन पाहीन.

राया काय झालं तुम्हाला एकदम Uhoh

धनिला कदाचित सिमला मिरची आवडत असेल म्हणून ती कशात घालून संपवू असा प्रश्न कोणाला पडला तर त्याला Uhoh असं झालं असेल...श्मला पण कोणी पनीर किंवा कलिंगड कसं संपवू विचारलं की Uhoh असं होतं Proud

रच्याकने शिमला मिरची पावभाजीत, सॅण्डविच, नुसती भाजी, फ्राईड राईस, न्युडल्स (इति पाकसिमा Proud ) कशातही खपते

थंड घ्या ओ Happy

रच्याकने मी इतके पौष्टिक पोहे खाऊ शकेन की नाही माहीत नाही.... पोहे माझे जीव की प्राण आहेत Proud
करून बघते, दुसर्‍यांना खाऊ घालते, त्यांना आवडले तर खाते Proud

खाल्ले एकदाचे पोहे. हिरवी मिरची स्कीप केली आणी सिमला मिरची संपवली. छान लागली पोह्यात. धन्यवाद ह्या रेसिपीबद्दल.

अर्र्र्र्र्रे,

नाकं माझं,
कीबोर्ड माझा,
धागा योकुचा...

मी काहीही करेन... तुम्ही जरा थंड घ्याच घ्या ३१ डिसेंबरच्या निमित्ताने

तुम्ही डिलीट केलीत माझी विपु म्हणुन ईथे लिहिते आहे. (सॉरी योकु)---

तुम्ही नेहमी नाक खुपसुन भांडणे लावता, वाढवता (हे माझे वै. मत). त्यामुळे तुम्हीच शांत रहा व मला विपु करु नका. धन्यवाद.

हे भगवान...!

बरं बरं... तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटतं त्याने मला काडीचाही फरक पडत नाही..
तुम्ही किमान मी भांडणे लावते हे नोटीस तरी केलंत मी तर आजपर्यंत तुमचा आयडी नोटीसही केला नव्हता..

आज इअरएण्ड मुळे माझ्याकडे फार मोकळा वेळ असल्याने मी सगळीकडे टाईमपास करतेय तसा इथेही करत होते.... बाकी हा धागा योकुचा आणि पोह्यांचा आहे.. तुमच्या पुढच्या तक्रारी दुसरीकडे टाका

तुमचा सगळीकडचा टाईमपास चांगलाच ठाउक आहे मला. तक्रारी टाकायला नाहिच आहे हा धागा. विपु प्रकरण ईथे सुरु केलेत म्हणुन मी ते ईथेच निकालात काढले एवढेच. आणी मी तरी पोह्यांबद्दलच लिहीत होते सुरुवातीपासुन.

वा! वा! तोंपासु. नोव्हें-डिसें.मधे (मटारचा सीझन) आमच्याकडे हा प्रकार हिट्ट असतो. मटार-सीझन संपल्यावर काही दिवस नुसते कांदा-टोमॅटो घातलेले पोहे खावेसे वाटत नाहीत! Lol

हो ना. पण विपुच डिलीट केली माझी. नेहमीची स्ट्रॅटेजी आहे, आधी धाग्यावर नाक खुपसुन फालतु कमेण्ट्स करायच्या आणी विपुत जाउन मखलाशी करायची. अंगाशी आलं की विपुच डिलिट करायची.

जाउदे. आज नवीन पद्दतीचे पोहे खाल्ले या रेसिपीमुळे Happy

Pages