थिक वेजिटेबल सूप विथ नूडल्स

Submitted by saakshi on 27 November, 2014 - 12:20
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१.भाज्या -
कांदा - १ मोठा बारीक चिरून
ब्रोकोली
फ्लॉवरचे तुरे बारीक चिरून
कोबी - पातळ उभा चिरून
बटाटा - १ लहान बारीक चिरून
आणखी ज्या आवडतील त्या आणि उपलब्ध असतील त्या भाज्या.

२.नूडल्स - या मात्र अंदाजे, म्हणजे सूप व्हायला हवेय, घट्ट नूडल्स नाही.

३.मिरपूड - १ चमचा

४. चवीनुसार मीठ

५. पाणी - ४ पेले

६.आले आणि लसूण - १ मोठा चमचा अगदी बारीक किसून

क्रमवार पाककृती: 

१.एका मोठ्या भांड्यात सगळ्या भाज्या नाममात्र तेलावर परतून घ्याव्यात. आच मंद ठेवावी. मीठ,मिरपूड आणि आले लसूण टाकून २ -३ वाफा काढाव्यात.
२.नूडल्स टाकून परतून घ्यावे.
३.पाणी टाकून शिजू द्यावे. नूडल्स शिजल्या की पाणी आटू लागते, लक्ष ठेवावे नाहीतर घट्ट गोळा झाला की सूप हातचे जाईल.
४. गरमागरम सूप वाडग्यात काढावे आणि भुरका मारत गट्टम करावे Happy

वाढणी/प्रमाण: 
सूप किती आवडते त्यावर अवलंबून
अधिक टिपा: 

सूप गरमच प्यावे. गरम सूप घशातून खाली उतरताना जे काही वाटतं ते निव्वळ अनुभवण्याची गोष्ट आहे.
आवडत असेल तर वरून थोडेसे घट्ट क्रीम घालावे. मी घालत नाही कारण त्याने सूपची मूळ चव अफेक्ट होते असं मला वाटतं.

माहितीचा स्रोत: 
स्वप्रयोग
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तं लागतंय.
मी करून प्यायले (खाल्लं म्हणावं का?)
नूडल्सचा गोळा नको होता म्हणून पास्ता अर्धवट उकडून मग या सूपाला उकळी आल्यावर त्यात घातला.
मुलांनाही चव आवडली.

रेसिपीबद्दल धन्यवाद.

फरक-
१. आयते मसाला क्यूब वापरलेले नाहीत. मॅगी मसालाक्यूब थोडं केमिकलसारखं लागतं (मलातरी) आणि त्यात एम एस जी असेल अशी शंका आहे. एकदा पाकिट आणून पाहिलं पाहिजे.
२. यात सूपाला आलेला दाटपणा बटाटा आणि नूडल्स सुटताना आलेला स्टार्च यांचाच आहे , कॉर्नफ्लॉवर वापरलेले नाही.
३. यात नूडल्स भाज्यांमध्ये परतून मग पाणी टाकून उकळायच्यात त्यात आधी बोलमध्ये शिजवलेल्या नूडल्स घालून मग वर तय्यार सूप ओतायचंय.
या आणि त्या सूपाच्या चवीत आणि कन्सिस्टन्सीमध्ये खूप फरक आहे.

धन्यवाद सर्वांना Happy
साक्षी, मॉनिटरमधून वाफा निघत आहेत>>>> चिन्नु Happy
साती सगळ्याच फरकांसाठी धन्यवाद आणि फरकांना +१

क्लास आहे सूप, ह्यातल्या भाज्या, नूडल्स, मिरपूड अन आले लसूण पेस्ट वजा केल्यास आमचे अतिशय आवडते सूप तयार होईल, त्याला आम्ही लाडाने, अरुणाचल फॉरवर्ड सूप म्हणतो, साला सहीत गर चिरून घ्यायचा बटाट्याचा त्यात चवीनुसार मीठ अन फुकट उपलब्ध चिल्ड वॉटर घालायचे अन ते गरगाट 2 तास उकळून मग एका दमात एक मग्गा ह्या हिशेबाने पिऊन टाकायचे??

कॉर्नफ्लोर न घालताही छान चव आणि टेक्स्चर आले होते सूपचे. नेहमीच्या यशस्वी सूप भाज्याच घातल्या होत्या आणि राईस नूडल्स वापरले. त्याने सूप थंड झाल्यावरही टेक्स्चर बदलले नाही. तसही थोडेसेच उरले होते आणि लक्षही फार द्यावे लागले नाही.