पुस्तक

विद्युत उपकरणे - समुह

Submitted by केअशु on 18 September, 2016 - 20:48

'विद्युत उपकरणे' या विषयावर व्हॉटस्अप समुह सुरु केला आहे.

एसी आणि डीसी विद्युत उपकरणांची रचना, कार्य, वापर, त्यांची देखभाल,दुरुस्ती, त्यांना लागणारी सॉफ्टवेअर्स, उपकरणांची खरेदी, वीजबचत,इ - कचरा,त्यांची योग्य ती विल्हेवाट याबद्दल माहितीची देवाणघेवाण,चर्चा, शंका,मार्गदर्शन, तसेच बाजारात आलेली नवीन विद्युत उपकरणे, त्यांची वैशिष्ट्ये,या विषयावरची पुस्तके,नियतकालिके,लेख याबद्दल येथे बोलता येईल.

देह देवाचे मंदिर.

Submitted by Suyog Shilwant on 9 September, 2016 - 17:37

लहान असल्यापासुन ते म्हातारं होई पर्यंत आपल्या धर्मामधे इतक्या छान छान गोष्टी सांगितलेल्या आहेत. मी लहान असताना माझ्या आईने एक श्लोक शिकवला होता. जेवायला बसलो कि म्हण असं ती म्हणायची तेव्हा मी कटकट करायचो. काय तो तोच तोच श्लोक म्हणायचा मला इथे भुक लागलेय समोर घोडा का शेरा दिसतोय पण आई आपली म्हणतेय अम्म्म्म पहिले म्हण आई हातावर फटका मारुन श्लोक म्हणवुन घ्यायची.

" वदनी कवलं घेता नाम घ्या श्री हरी चे,
सहज हवन होते नाम घेता फुका चे||
जिवन करी जिवित्वा अन्न हे पुर्ण ब्रह्म ,
उदर भरणं नोहे, जानियेजे यज्ञ कर्म || "

टाटायन

Submitted by माधव on 1 July, 2016 - 02:47

प्रत्येक शब्दाला एक अर्थ असतो. त्यात एक सर्वमान्य असा भाग असतोच पण त्याशिवाय त्या शब्दाच्या अनुशंगाने आलेले आपले वैयक्तीक अनुभव, एखादी विशेष घटना, एखाद्या व्यक्तीने केलेला त्या शब्दाचा खास उच्चार अशा अनेक पातळींवर तो शब्द आपल्या मेंदूत कोरला जातो. 'टाटा' याचा अर्थ एक विशेषनाम असा असला तरी माझ्याकरता त्या शब्दाचा अर्थ 'उद्योग आणि विश्वास' असा कोरला गेला आहे. टाटांचे उत्पादन खरेदी करताना कधीकधी दर्जा थोडा कमी होता असेही झाले आहे पण तरीही आपण लुबाडले गेलोय असे कधीही वाटले नाही. याचे कारण तो दर्जा सुधारत जाणार आहे याची खात्री असते.

विषय: 
शब्दखुणा: 

सच्च्या प्रेमाची अद्भुत गाथा - अमृता इमरोजची लव्ह स्टोरी ....

Submitted by समीर गायकवाड on 24 June, 2016 - 03:27

शारीरिक ओढीच्या पलीकडचे प्रेम कसे असते ? जाणून घ्यायचंय ?
मग अवश्य वाचा सच्च्या प्रेमाची मधुर गाथा ....
ती एक हळव्या मनाची किशोरी ; वयाच्या १६ व्या वर्षी असंवेदनशील, व्यसनी आणि थोराड पुरुषाबरोबर तिचं लग्न झालं तर ?
ती त्याच्याशी विवाह करते, मात्र त्याला पूर्णतः स्वीकारत नाही, ती त्याला तन देऊ शकते पण मन देऊ शकत नाही.
एकमेकाचे विचार भिन्न असूनही एकत्र राहणे योग्य की अयोग्य ?
मग 'तिला'च याची जाणीव होते अन ती स्वतःची सारी कुचंबणा त्याच्या गळी उतरवते. पुढे ते विभक्त होतात, पण तोवर तिच्या पोटी त्याचं बीज वाढतं.

सुयुध्द त्रिनेत्री आणि एक भयानक गुहा. भाग - 3

Submitted by Suyog Shilwant on 13 June, 2016 - 17:27

गुरु विश्वेश्वरां बरोबर बोलल्या नंतर त्रिनेत्री आजोबा आता घरची वाट धरतो. पण अजुनहि त्याच्या मनात विचार हे घोळतच असतात. मुख्य म्हणजे 12-13 वर्षाचा सुयुध्द अजुन लहान आहे. पण त्याला आपल्या घराण्याचा इतिहास माहीतच नाही. त्याचावर आलेली अशी पुर्ण जगाची जबाबदारी त्याला पेलता येईल का? का तो ही आपल्या सारखा ती पेलण्यात अपयशी ठरणार होता. गुरु विश्वेश्वर बोलतात त्या प्रमाणे सुयुध्द तो आहे जो कालाशिष्ट ला संपवू शकतो. त्याच्या कडेच ती योग्यता आहे. आज तो दिवस आला आहे जेव्हा त्याला ह्या सर्व गोष्टी सांगाव्या लागणार आहेत.

सुयुद्ध त्रिनेत्री आणि एक भयानक गुहा.

Submitted by Suyog Shilwant on 9 June, 2016 - 16:02

"सुयुद्घ ञिनेञी आणि एक भयानक गुहा."

१) शोध.

शब्दखुणा: 

Dermatoglyphics Multiple Intelligence Test करावी का?

Submitted by मी अमि on 30 May, 2016 - 00:40

आमच्या एका परिचीतांनी त्यांच्या मुलांची वरील टेस्ट करून घेतली. या टेस्ट मध्ये त्या व्यक्तीच्या बोटांचे ठसे घेऊन त्याचे विश्लेष्ण केले जाते आणि त्यावरुन त्या व्यक्ती साठी कोणते करीयरचे पर्याय योग्य असतील ते सुचवले जाते. तुमचे वेगवेगळे ईंटलिजन्स विश्लेषण करून रिपोर्ट तयार करतात म्हणजे https://en.wikipedia.org/wiki/Theory_of_multiple_intelligences इथे दिलेल्या ईंटलिजन्स चे विश्लेषण करतात. त्यांच्या मते बोटांच्या ठशावरून या ईंटलिजन्स मॅपिंग करता येते.

बिल्डींग रीडर्स

Submitted by विद्या भुतकर on 13 May, 2016 - 15:44

माझी एक इच्छा आहे, की मी शाळेत असेपर्यंत जसे वेड्यासारखी पुस्तके वाचलीत, दिवस रात्र वाचलीत तशी वाचनाची सवय माझ्या मुलांना लागावी. परीक्षा चालू असताना शेजारी पडलेले पुस्तक केंव्हा एकदा हातात घेईन असे व्हायचे. सुट्ट्या लागल्या की पुस्तकं एका मागे एक केवळ वाचत सुटायचे, हावऱ्यासारखे. बाकी मुलं बाहेर खेळत आहेत किंवा कधी टीव्ही बघत आहेत किंवा विडिओ गेम खेळत आहे असे चालू असले तरी मला काही फरक पडायचा नाही. गेल्या कित्येक वर्षात असं वाचन झालं नाहीये आणि ते पुन्हा सुरु करायलाही जमत नाहीये. पण आजही माझ्या विचारांवर, लिखाणावर नक्कीच माझ्या तेव्हांच्या वाचनाचा प्रभाव आहे.

विषय: 

ऐतिहासिक सैनिक समाचार

Submitted by पराग१२२६३ on 27 April, 2016 - 07:56

'सैनिक समाचार' हे संरक्षण मंत्रालयाकडून प्रकाशित होणारे पाक्षिक प्रकाशन आहे. आज शंभर वर्षे पूर्ण होऊन गेलेले हे पाक्षिक इंग्रजीबरोबरच १२ भारतीय भाषांमधून नियमित प्रकाशित होत आहे. भारतीय लष्कराच्या चारही दलांमध्ये (भूदल, नौदल, हवाईदल आणि तटरक्षक दल) होणाऱ्या विविध घडामोडींचा गोषवारा त्यातून प्रकाशित होत असतो. अर्थातच संरक्षणासारखा संवेदनशील विषय असल्याने अत्यंत गोपनीय, गोपनीय, संवेदनशील अशा विविध वर्गांमधील बाबी त्यात प्रकाशित केल्या जात नसतात. पण जी काही सामग्री प्रकाशित होत असते, तीही या विषयात रस असणाऱ्याच्या पसंतीला उतरू शकते.

सूर

Submitted by हेरंब सुखठणकर on 20 April, 2016 - 00:06

आपल्याशीच गुणगुणनारे तानपुरे, संध्याकाळची वेळ, झोपाळ्यावर बसलेल्या त्या आणि खाली चटईवर त्यांची शिष्या. मध्येच एकाधि वाऱ्याची झुळुक अंगणातल्या तुळशीजवळ लावलेल्या अगरबत्तीचा परिमळ घेऊन येत होती.
बाईंकडे अनेक वर्ष गाणं शिकणारी ती त्यांच्या घरातलीच झाली होती. पुष्कळ दिवस बेचैन करणारा प्रश्न तिने थोडासा भीतभीतच विचारला. "बाई, तुम्हाला गाण्याने सगळं काही दिलं, पैसा, ओळख, मान. तरी अजूनही कधीकधी तुम्ही बेचैन का वाटता?"
"एका प्रश्नाचं उत्तर नाही सापडलंय गं अजून, म्हणून," बाई शांतपणे म्हणाल्या.
"कोणता प्रश्न?"
"या माझ्या गाण्यातून, पुन्हा पुन्हा नेमकं व्यक्त कोण होतंय?"

विषय: 

Pages

Subscribe to RSS - पुस्तक