वाचनाच्या मर्यादेत, मला आवडलेल्या आणि आठवतायत तशा क्रमाने काही अनुवादित पुस्तकांची यादी करतो आहे, आणि ही यादी परिपूर्ण आहे, असा काही दावा नाहीये..
ह्याच्यामध्ये प्रत्येकाच्या वैयक्तिक आवडीनिवडी नुसार
मोलाची भर पडू शकेल किंवा ह्यातल्या काही नावांची
निर्दयपणे काटछाटही होऊ शकेल..!
हा उद्योग करण्याचा हेतू असा की 'मायबोली'वर अनुवादित पुस्तकांच्या संदर्भातला काही वेगळा धागा मला सापडला नाही, हा एक..
पुस्तक योग -१
१. पुस्तकं हाताशी असलेली बरं असतं..
नुकतीच श्री ठाणेदारांची घेतलेली मुलाखत म्हणजे आनंदाचा ठेवा! कितीतरी गोष्टींना वेळेअभावी फक्त स्पर्श करता आला. २००५ साली ही ’श्री’ ची इच्छा हे पुस्तक हातात पडलं तेव्हा विलक्षण भारावून जायला झालं होतं. त्यांच्यासारखाच आपणही काहीतरी भलाथोरला उद्योगधंदा उभारावा असंही वाटून गेलं होतं. वेळेअभावी तो विचार लवकरच बाजूला पडला
पण पुस्तक मात्र कायमचं मनातला एक कोपरा अडवून राहिलं.
'काय मिळतं रे वाचून?'
किंवा 'कसं काय वाचत बसतो रे एवढा वेळ?'
ह्या अर्थाचे प्रश्न विचारले जातात मला कधीकधी.. म्हणून म्हटलं, जरा शोधून बघू की काय कारणं असतील की
ज्यामुळे मला पुस्तकांशिवाय राहणं जमतच नाही...
म्हणजे 'मी का वाचतो ?' वगैरे
तर..
वाचन ही एकच गोष्ट अशी आहे की मी ज्यात इंटरेस्टेड आहे, म्हणून वाचतो.
पुस्तकांशिवाय मला फार पोरकं पोरकं वाटतं, म्हणून वाचतो.
मला सतत नवनवीन लेखक / लेखिकांच्या जबरदस्त प्रेमात पडायची खोड आहे म्हणून वाचतो.
एखाद्या गोष्टीबद्दल मला फारच थोडं माहिती आहे, असं मला स्वत:लाच आतून वाटावं म्हणून वाचतो.
मीना प्रभुंचं "ग्रीकांजली" हे प्रवासवर्णन पुस्तक आजच (६ डिसेंबर) वाचून संपलं. बरेच दिवस झाले वेळ मिळेल तसे वाचत होतो. त्यांच्या इतर पुस्तकांसारखंच हे पुस्तक सुद्धा छान आहे! साऊथ अमेरिकेतील बहुतेक देशांप्रमाणे ग्रीस मध्येही मीना प्रभु एकट्याने फिरल्या. तिथे त्यांना अनेक मित्र मैत्रिणी भेटल्या.
Wonder ही गोष्ट आहे एका दहा वर्षाच्या लहानग्या मुलाची. ऑगस्ट पुलमनची. जो इतर मुलांसारखाच curious आहे.मस्तीखोर आहे. आणि स्टार वॉर्सचा खूप मोठा फॅन आहे. त्याच त्याच्या आई-वडिलांसोबत, मोठ्या बहिणीसोबत आणि पाळलेल्या पेट- डेजीसोबत गोड- प्रेमाचं नातं आहे.. पण या कादंबरीची tragedy म्हणजे त्याचा चेहरा. ऑगस्टचा चेहरा हा जन्मतःच Treacher Collins Syndrome नावाच्या रेअर जेनेटिक कंडिशनमुळे deformed आहे.
कादंबरीत या ऑगस्टची वाचकांना ओळख करून देताना लेखिकेने म्हटले आहे की,
My name is August, by the way. I won’t describe what I look like. Whatever you’re thinking, it’s probably worse.
जेम्स ब्लडवर्थ या ब्रिटिश पत्रकाराने ठरवून, प्लॅन करून सहा महिने ब्रिटिश कामगार वर्गाप्रमाणे तुटपुंज्या पगाराच्या नोकर्यांसाठी अर्ज करून चार प्रकारच्या नोकर्या केल्या. त्या त्या नोकरीच्या ठिकाणी त्याचे सहकारी, स्थानिक ज्या प्रकारे राहायचे तसंच तो देखील राहिला. (गलिच्छ वस्त्या, एका घरात दाटीवाटीने राहणारे कामगार) त्यांच्यासारखंच जेवण, ट्रान्स्पोर्ट, त्यांच्याप्रमाणेच महिन्याच्या कमाईत(च) कशीबशी गुजराण करून, त्याच लोकांच्यात मिसळून, त्यांच्याशी गप्पा मारून त्या सर्व अनुभवांवर त्याने हे पुस्तक लिहिलं आहे.
यंदा बर्याच कमी संख्येने दिवाळी अंक प्रकाशित झाले आहेत.
पुस्तकांच्या नेहमीच्या दुकानात किंवा स्टेशनजवळच्या पदपथ विक्रेत्याकडे जाता न आल्याने यंदा एकही दिवाळी अंक विकत घेतलेला नाही.
मुं म ग्रं सं लाही २० नोव्हेंबरलाच जाता आलं आणि पहिल्याच दिवशी मौजेचा अंक मिळाला. त्याबद्दल अधिक प्रतिसादांत.
आपण वाचलेल्या दिवाळी अंकांबद्दल इथे लिहूया. ऑनलाइन तसंच ऑडियो दिवाळी अंकांचीही नोंद घेऊ.
अनेक दिवाळी अंकांत मायबोलीकरांचे लेखन असते. त्याबद्दलही लिहा.