पुस्तक

गानसरस्वती

Submitted by kulu on 10 November, 2014 - 07:20

गानसस्वती किशोरीताईंच्या जीवनावर ज्येष्ठ संगीत समीक्षक दत्ता मारुलकर यानी "गानसरस्वती" असं पुस्तक लिहीलं आहे असं ट्वीटरवर वाचनात आलं. कुणा माबोकराकडे आहे का ते पुस्तक? बुकगंगेवर पण नाही, एक दोन वेबसाईट्स सोडल्या तर या पुस्तकाचा कुठेही उल्लेख नाही. दुर्मीळ प्रकार दिसतोय. कुणाकडे असल्यास किवा कुठे मिळेल हे माहित असल्यास नक्की कळवावे ही विनंती!

विषय: 
प्रांत/गाव: 

राजा रवी वर्मा, चित्रकला, रणजीत देसाईंची कादंबरी आणि केतन मेहेतांचा रंग रसिया...

Submitted by निमिष_सोनार on 4 November, 2014 - 22:05

सात नोव्हेंबर ला "रंग रसिया" रिलीज होत आहे.

हाफ गर्ल्फ्रेंड - चेतन भगत उवाच

Submitted by अविकुमार on 6 October, 2014 - 06:45

नुकतीच १ ऑक्टोबरला चेतन भगतची नवीन इंग्रजी कादंबरी 'हाफ गर्लफ्रेंड' प्रसिद्ध झाली. बरेच दिवसांपासून त्याबद्दल ऐकून होतो. या पूर्वी चेतनची five points someone आणि 2 states या कादंबर्‍या वाचल्या होत्या. त्यातली 2 states आवडलीही होती. म्हणूनच 'हाफ गर्ल्फ्रेंड' मोफत घरपोच ऑर्डरही करुन टाकली आणि विशेष म्हणजे २ दिवसांत घरपोच मिळालीही. कालच ५ तासांत वाचून संपलेल्या या पुस्तकाविषयीचे माझे वैयक्तिक मत. वाचून झाल्यावर मनात आलेले विचार लगोलग उतरवल्याने पुस्तकपरिक्षण म्हणने योग्य होणार नाही. समिक्षकाच्या चष्म्यातून विचार मांडणे हे शिवधनुष्य मला पेलवणारे नाही. आपण आपले 'हौशी वाचक'च बरे!

विषय: 

माझा पहिला कथासंग्रह!

Submitted by ए ए वाघमारे on 1 October, 2014 - 01:10

तमाम मायबोलीकर दोस्तमित्रांना सांगण्यास आनंद होतो आहे की माझा पहिला कथासंग्रह "टर्मिनस" लवकरच प्रकाशित होतो आहे.

cover-500x500.jpg

प्रकाशक: शब्दांजली प्रकाशन,पुणे
ऑनलाईन बुकिंग: www.pustakjatra.com

http://www.pustakjatra.com/index.php?route=product/product&product_id=1849

कथासंग्रहाबद्दल थोडेसे:

विषय: 

मी आज/इतक्यात काय वाचले

Submitted by हर्ट on 21 September, 2014 - 10:54

मायबोलिवरचे वाचक मला माहिती आहेत त्यावरुन माझ्या असे लक्षात आले की मराठी भाषेतील सकस दर्जेदार साहित्य त्यांनी आत्तापर्यंत वाचले आहे. नवीन साहित्य मिळावे असे त्यांना मनापासून वाटते. किंवा जुन्यातील एखादे राहून गेलेले, कानाडोळा झालेले, न मिळू शकलेले साहित्य वाचायचे राहून गेले आहे.

विषय: 
शब्दखुणा: 

खो... दहा पुस्तकांचा!!!!

Submitted by हर्ट on 31 August, 2014 - 02:33

तुम्हाला आवडलेली कुठल्याही भाषेतील दहा पुस्तकांची नावे इथे लिहायची आहेत. हे असे लिहिता लिहिता साधारणः

१) ते पुस्तक तुम्हाला का आवडले?
२) त्या पुस्तकाची आणि तुमची ओळख कशी झाली?
३) त्या पुस्तकाचे साहित्यिक मुल्य काय?
४) नक्की कुठल्या वयात वाचले?

ह्याबद्दल लिहू शकता.

इथे तुम्हाला "खो" मिळालाच पाहिजे असे नाही. कधी कधी आपण मित्रांच्या यादीत नसतो म्हणून आपल्याला खो मिळत नाही :(. पण म्हणून इथे लिहायचे नाही असे नाही. तुम्हाला आवडलेली दहा पुस्तके ह्याबद्दल इथे कुणीही लिहू शकतो.

विषय: 

भारताबाहेर मराठी वाचनाच्या सोयी/वाचनालये.

Submitted by बोबो on 13 August, 2014 - 12:07

न्यूयॉर्कच्या पब्लिक लायब्ररीमध्ये मराठी पुस्तकं पाहून आनंदाचं भरतं आलं.
विशेष म्हणजे ही सोय विनामुल्य आहे Wink
न्यूयॉर्कमध्ये राहणारे किंवा काम करणारे भारतीय या लायब्ररीचे सदस्य बनू शकतात.
इतर माबोकरांनी ते सध्या वास करत असलेल्या देशातल्या/शहरातील अशा वाचन सोयींची माहिती द्यावी.

विषय: 
शब्दखुणा: 

चर्निंग ऑफ द सिटी (पुस्तक परिचय)

Submitted by आतिवास on 6 July, 2014 - 07:09

तो लेखक आहे. आणि चित्रकारही. त्याचं नाव भारत. (की भरत? इंग्रजी अनुवाद वाचताना नावांची ही अशी पंचाईत होते! पण बहुधा ‘भारत’ असावं!)

ब-याच दिवसांनी तो घराबाहेर पडतो तर त्याला शहर बदललेलं दिसतं. काय आहे भवताली?

आता शहराच्या हद्दीत हसायला बंदी आहे.

‘कुणालाही मदत करू नका, कारण एकदा मदत केली की लोक तुमच्या मदतीवर अवलंबून राहतात’ असं सांगणा-या मुलांसारख्या दिसणा-या मुली आहेत; मुलीच्या वेशात नोकरीचा शोध घेणारा मुलगा आहे. खरं सांगायचं तर स्त्रिया आणि पुरुष यांच्या दिसण्यातला फरक नाहीसा झाला आहे आता.

विषय: 
शब्दखुणा: 

सुख थोडं दु:ख भारी दुनिया ही भलीबुरी - "द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज"

Submitted by आशूडी on 24 June, 2014 - 15:09

अरुंधती रॉय यांच्या 'द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज' या बुकर अ‍ॅवॉर्ड विजेत्या पुस्तकाचा अपर्णा वेलणकर यांनी केलेला अनुवाद (हो, मी अनुवादच वाचते. चंपकइतक्या जाडीची पुस्तकं अजून इंग्रजीतून वाचली नाहीत त्यामुळे उत्तम साहित्य वाचायचं तर सध्या भिस्त उत्तम अनुवादकावर आहे खरी.) वाचला आणि अक्षरशः झपाटून गेले. पुस्तक संपलं तेव्हा आता करण्यासारखं उरलंच काय! अशी चुटपूट मनाला लागून राहिली. एवढ्या नितळ पारदर्शी पुस्तकाबद्दल लिहायला हवंच पण तेवढी आपली पोच नाही याची प्रामाणिक जाणीव मनात होती, आहे. सकाळचा विचार रात्रीपर्यंत टिकला तर लिहायचं असं ठरवलं होतं.

विषय: 

प्रतिमा-प्रचीती

Submitted by शर्मिला फडके on 14 June, 2014 - 14:06

प्रतिमा-प्रचीती
नितीन दादरावाला
लोकवाङ्मय गृह

छायाचित्रकारांवर लिहिले गेलेले पुस्तक वाचताना तुमच्या मनात काय अपेक्षा असतात? असाव्यात?

Pages

Subscribe to RSS - पुस्तक