Submitted by मंदार गद्रे on 23 October, 2024 - 09:45
अपमान शांततेने साहतो कृष्ण आहे
अपराध शेकड्यांनी मोजतो कृष्ण आहे
मार्गात बांध घाला, टाका कितीक धोंडे
त्यातून पारदर्शी वाहतो कृष्ण आहे
टीका, प्रलोभने वा, शंका, खुशामतीही
गोंगाट ऐकुनी हा हासतो कृष्ण आहे
ईर्ष्या, अहं, असूया, मद, मोह, मत्सरादी
वैर्यांस आज सार्या मारतो कृष्ण आहे
हरवेल वाट आता, संपेल सर्व वाटे
हाकेस तोच माझ्या धावतो कृष्ण आहे
अपुल्याच माणसांनी विश्वासघात केला
हाती धनुष्य घ्याया सांगतो कृष्ण आहे
घनगर्द संकटांचे आभाळ दाटलेले
त्यांना कडा रुप्याच्या लावतो कृष्ण आहे
मुरलीत स्तब्धतेला, किरणांत वादळाला,
गीतेत संभ्रमाला बांधतो कृष्ण आहे
-- मंदार.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर! हे वाचून "माना मानव वा
सुंदर! हे वाचून "माना मानव वा परमेश्वर मी स्वामी पतितांचा , भोगी म्हणुनी उपहासा मी योगी कर्माचा" या गीताची आठवण झाली.
सुंदर.. आवडली..
सुंदर..
आवडली..
सुंदर कविता आहे. आवडली.
सुंदर कविता आहे. आवडली.
शेवटची २ कडवी आवडली.
शेवटची २ कडवी आवडली.
हपा, अनिरुद्ध, अस्मिता, सामो
हपा, अनिरुद्ध, अस्मिता, सामो -- धन्यवाद!