साहित्य

सियाचीन ग्लेशीयर ....भाग १

Submitted by रणजित चितळे on 20 December, 2012 - 04:46

Map_Siachen_Kashmir_Standoff_2003_HR.png

(सियाचीन ग्लेशीयर (टाईम मॅगझीन कडून साभार))

द सिंपसन्स : वेगळेपणातले वेगळेपण

Submitted by बावरा मन on 20 December, 2012 - 03:20

सास-बहू मधली भांडण, कटकारस्थान आणि एकूण च पुरूष जमातीची गळचेपी या तीन गोष्टीभोवती फिरणार्‍या हिंदी-मराठी सिरीयल्स पाहण्यापेक्षा मला स्टार वर्ल्ड वरील भन्नाट कॉन्सेप्ट्स असणार्‍या मालिका बघायला आवडतात. फ्रेंड्स, हाउ आय मेट युवर मदर आणि टू अँड हाफ मेन आणि सगळ्यात भन्नाट आवडत म्हणजे द सिंपसन्स. सिंपसन्स ही सेटिरिकल पॅरोडी या वर्गात मोडणारी animated serial. २० वर्षापूर्वी सुरू झालेला हा शो अजूनही चाहत्यांमध्ये तितकाच लोकप्रिय आहे. द सिंपसन्स ही स्प्रिंगफील्ड या अमेरिकन शहरात राहणार्‍या एका परिवाराभोवती फिरते.

मायबोलीने मनाची एक ख्नन्त दुर केली

Submitted by आकाश नील on 19 December, 2012 - 13:59

अनेक वर्षे संगणक क्षेत्रात काम केले तरी मराठी पाने आंतर्जालावर (अजून सगळे मराठी प्रतीशब्द माहित नाहीत). वाचली नव्हती. सध्या ती वाचायचा योग आला, आणि नंतर गेले २ महिने फार खन्त वाटत होती. (शुध्द-अशुद्ध नव्हे, पण विचित्र मराठी वाचून). नुसते साधे मराठी वाचण्याची तळमळ लागली होती.

आज सुदैवाने मायबोलीची ओळख झाली. अजून सगळे वाचले नाही, पण खूप वाचले. कल्पना नव्हती की नवीन पिढी इतक्या दमाचे मराठी लिहू शकते. कविता, विनोद, कथा, अनुवाद (शेरलॉक होम्स) आणि इतर सदरे (Comments ना काय म्हणतात? शेरा? प्रतिसाद?).

गुडबाय फॉरेव्हर!

Submitted by साजिरा on 18 December, 2012 - 03:34

बिछान्याची आग जणू
तळपायांपर्यंत,
मेंदूत चारेक लाख भुंग्यांची भुणभूण,
तळमळ ठाण मांडते
डबल बोनस देऊनही
विक्राळ तोंडाने
संपाच्या घोषणा देणार्‍या
कामगारांगत.
*

डबल बोनस
म्हणजे काय माठभरून दारू नव्हे रेऽ.
वाईन प्लस व्हिस्की प्लस बियर प्लस रम प्लस व्होडका
असं कॉकटेल तुझ्या
काकाने केलं होतं का कधी च्यायला?!
*

आता झालं असंय
की सुमारे दोनेक हजार घनफूट अंधार
या खोलीत दाटीवाटीने
भरून राहिलाय.
साधासुधा अंधार नव्हे,
ताकदवान अंधार.
गडद. भयंकर. अभद्र ओल्या वासाचा.
*

डोळे मणभर ओझ्याच्या पापण्या
दूर ढकलून त्या घनफूटांच्या घनतेचा
अंदाज घेताहेत,
तोच ते लखो भुंगे

ओढणी.. साजणी..

Submitted by पुरंदरे शशांक on 17 December, 2012 - 23:56

ओढणी.. साजणी..

माथा गळ्यास झाकते
एक ओढणी सजून
काय कवतिक तिचे
घे गं जरा समजून

उन्हा तान्हात साजणी
येते सावली बनून
कोणी नवखा दिसता
घेते अंगही झाकून

सार्‍या अंगा-खांद्यावर
कशी दिसते शोभून
एकटीने जाता येता
धीर देई उमजून

भंवताल दिसे नवा
जेव्हा ओढणी आडून
निरख तू वास्तवाला
नको जाऊस भुलून

किती जणी सख्या तुझ्या
देती ओढणी फेकून
क्षणिकाच्या सुखाला त्या
गेल्या भुलून फसून

ओढ लागते जीवाला
निसर्गाचे सारे देणे
घेई पारखून नीट
दान पदरात घेणे

शब्दखुणा: 

आक्रमण

Submitted by अरुण मनोहर on 17 December, 2012 - 16:50

सतत भेटीला येणा-यांची वर्दळ
काही नजरा झुकलेल्या, काही चोरुन न्याहाळणा-या
काल ते पोलिस देखील असेच काय काय विचारीत होते.
तिला काहीच उमजत नव्हते,
हे कोण आहेत, कशाला चवकशा करीत आहेत?
नवरा तिला सारखा समजावित होता.
अग तू धीराने घे.
तुझी काहीच चुकी नाही.
तू कशाला स्वत:ला बोल लावतेस?
तू व्यवस्थित माहिती दे,
पोलिस त्या बदमाषाला नक्की पकडतील...
नव-याचे समजावणे, पोलिसांची चवकशी
शब्दांचे मोहोळ तिच्या कानांना दंश करीत सुटले होते
त्या वणव्यातही नवरा इतका शांत कसा राहिला?
चवताळून त्याने सगळे जग पेटवून का दिले नाही?
का नुसता माझ्या जखमांवर सांत्वनाचे शब्द चोळीत बसला होता?

विषय: 
शब्दखुणा: 

सरणावरील सुमने

Submitted by हिमांशु on 16 December, 2012 - 14:22

सरणावरील सुमने

सरणावरील सुमने सुकतात ना कधीही -
अग्नीफुले तयांची होतात अर्थवाही:
ज्वाळादळी तयांच्या मकरंद जीवनाचा,
वसतो तिथेच आत्मा - राखेस रंग त्याचा!
जे जे मिळे प्रपंची, त्याचाच धूर होई...
शोधा धुरात आत्मा, राखेत सर्वकाही!

शब्दखुणा: 

कॉपर बीचेसचे रहस्य - भाग ५ (अंतिम) (शेरलॉक होम्स साहसकथा स्वैर अनुवाद)

Submitted by निंबुडा on 12 December, 2012 - 06:09

कॉपर बीचेसचे रहस्य - भाग ४ (शेरलॉक होम्स साहसकथा स्वैर अनुवाद)

Submitted by निंबुडा on 12 December, 2012 - 00:45

Pages

Subscribe to RSS - साहित्य