मायबोलीने मनाची एक ख्नन्त दुर केली

Submitted by आकाश नील on 19 December, 2012 - 13:59

अनेक वर्षे संगणक क्षेत्रात काम केले तरी मराठी पाने आंतर्जालावर (अजून सगळे मराठी प्रतीशब्द माहित नाहीत). वाचली नव्हती. सध्या ती वाचायचा योग आला, आणि नंतर गेले २ महिने फार खन्त वाटत होती. (शुध्द-अशुद्ध नव्हे, पण विचित्र मराठी वाचून). नुसते साधे मराठी वाचण्याची तळमळ लागली होती.

आज सुदैवाने मायबोलीची ओळख झाली. अजून सगळे वाचले नाही, पण खूप वाचले. कल्पना नव्हती की नवीन पिढी इतक्या दमाचे मराठी लिहू शकते. कविता, विनोद, कथा, अनुवाद (शेरलॉक होम्स) आणि इतर सदरे (Comments ना काय म्हणतात? शेरा? प्रतिसाद?).

मायबोलीला अनेक धन्यवाद. माझ्या सर्व परिचितांना आणि संगणक विद्यार्थ्यांना मायबोलीची ओळख लवकरच करून देईन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आकाश नील, ३ वर्षांपूर्वी माझी सुद्धा अशीच स्थिती होती. इथे अमेरिकेत मराठी गप्पा अगदी दुर्मिळ नसल्या तरी चांगलं, स्वच्छ मराठी बोलणे, लिहिणे दिसतच नाही. आमच्या मराठी मंडळाचे कार्यक्रम सुद्धा बर्‍यापैकी इंग्रजीमधेच होतात. खंत आहे ही. पण मित्रमंडळींमधे शुद्ध मराठी बोललं, एखादा थोडा जुना शब्द वापरला तर कोणत्या ग्रहावरून आली ही असा आविर्भाव असतो. Sad
मग इथे माबोवर येऊन नवे, चांगले साहित्य वाचायला मिळते. Happy

धन्यवाद परदेसाई. Happy आमंत्रण फार आकर्षक आहे हो. पण माबोबाराकरांचा एवढा निकटचा सहवास!!! अंमळ जास्तच विचार करावा का?? Light 1

>>बाराकर (फार) चावत नाहीत..

महिनोंन महिने बोचरी थंडी चावते, त्याचं काय? Happy Light 1

नुसते साधे मराठी वाचण्याची तळमळ लागली होती. >>> वा! क्या बात है! माबोवरच्या मराठीचं अतिशय उत्तम वर्णन Happy

नमस्कार, आकाश नील - तुमच्या सदस्यत्वात पाहिले तर विचारपूस (वि पू) सोय बंद व संपर्क सोयही बंद - तुम्हाला भेटायचा, लिहून कळवायचा मार्ग तरी काय आहे मग - कृपया मार्गदर्शन करावे.
धन्यवाद....