संध्याकाळी तुळशीपाशी आई पणती लावत असते
तशीच माझ्या दु:खांना माझ्या गझलांची सोबत असते
नात्याची प्रत्यंचा ताणत शब्दबाण सोडुन मी थकता
डोळ्यांमधल्या पाण्यावर ती अख्खे भांडण जिंकत असते
सूर लावणे ठेका धरणे सगळे माझ्या हाती असते
तर माझे माणुसपण कुठल्या तालावरती नाचत असते
***गंतव्याची पाटी पाहुनही मी चढलो नसतो जर का ....
....आधी माहित असते की , श्वासांची गाडी लागत असते
"गालांवरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली".... म्हणताना ;
सावरकर "शायर"ही होते .... ही गदगद हेलावत असते !!
इथे वाह तू ..मनात माझ्या.. सांगितले पण ऐकत नाही
ही कथा माझी वहिनी दिवाळी २००९ ह्या अंकात प्रसिद्ध झाली.
मेडिकल अॅस्ट्रोस्कॉलर
लेखक: श्रीराम बर्वे
रघुनंदन केतकर एम एस सी केमिस्ट्रीमधील नावाजलेला विद्यार्थी. त्याच्या आजोळी तो दरवर्षी जाई.त्यावेळी आजोबांच्या खोलीत आजोबांचं काही ना काही संशोधन सुरु असे.
“ नंदू तू मोठा हो,हुशार हो.खूप खूप शिक.म्हणजे मी काय करतो हे तुला समजेल.’’
असे त्याचे आजोबा सांगत.आज ती वेळ आली होती.आज आजोबांकडे जायचं आणि त्याचं कसलं संशोधन सुरु आहे हे कळल्याशिवाय परतायचं नाही असं त्याने ठरवलं.
वांगणी स्टेशनवर लोकल थांबल्यावर रघुनन्दनने बॅगेसकट platform वर उडी मारली.
तुला पाहिले बघत राहिलो
फार दिसांनी सुखावले मन
दोन निमिष मग हसत राहिलो
ओठांवरती शब्द न आला
देहाचीही भाषा सुंदर
अर्थबोध वेळेवर झाला
कुठली आशा तरळत होती
असे वाटले सगळे शाश्वत
स्वप्नेही कड पलटत होती
तुला पाहिले बघत राहिलो...
घे ; हे चिंतनमात्रांचे रामबाण औषध आहे
तुला म्हणे गझले तंत्राबिंत्राची लागण आहे
अजूनही माणुस पुरता माणुस का नाही झाला
माणुस होण्यामागे त्याच्या मधले माकड आहे
बरेच तत्त्वज्ञान खरडले पण ते जगला नाही
म्हणून कोरे त्याच्या आयुष्याचे पुस्तक आहे
प्रत्यक्षात नसावे पण दु:खाला बघता यावे
त्याच्या असण्यापेक्षा त्याचे दिसणे सुंदर आहे
असेच काहीसे आहे पण नक्की माहित नाही
आहे आणिक नाही मधले काही विठ्ठल आहे
हे मनोगत बरेच दिवसांपासून लिहायचे होते. मायबोलीमधे काय सुधारणा करता येतील या बाफवर लिहायचे निश्चित केले होते. पण गझलविषयक असल्याने विचारांती स्वतंत्र लेख म्हणून पेश करत आहे.
जाणले आहे तुला मी कोठला आहेस तू
मीच रे बाहेरचा माझ्यातला आहेस तू
वेळ असते आठची जातात साडेआठला
जा पुन्हा ये !.. येत साडेसातला आहेस तू !!
हो जरा निश्चिंत आता ऐक बापा माझिया
काळजी माझी करत का जागला आहेस तू
दे सजा ; आधी जरा आतील नजरेने पहा
आळ माझ्या पाहण्यावर घेतला आहेस तू
मी तुला प्रत्येक हलचालीत माझ्या पाहतो
एवढा अंदाज माझा भारला आहेस तू
मी स्वतःच्या जाणिवांच्या झावळ्यांची झोपडी
......आणि टोलेजंग माझा बंगला आहेस तू !!!
तू तुझी तब्येत सांभाळून कविता करत जा
की मला समजेल आता चांगला आहेस तू
वेळ घालवणार आहे मी स्वतःसोबत जरा
बेफिकिर माझ्यामधे का थांबला आहेस तू
सियाचीन ग्लेशीयर ...भाग १
.ह्या आधीचे...
.......... एखाद्या खुनी माणसा प्रमाणे किंवा कोणाला मारण्याची सुपारी घेतल्या सारखे सतत तेथे असणाऱ्या जवानांच्या मागे दबा धरून राहून घात करायला तयार असतात जणुकाही. चालताना चुकलात, थोडे वजन जास्त पडले, पाय घसरला, समजले नाही, वाट चुकलात किंवा नशिबाने पाठ फिरवली तर पटकन सावज साधायला तयार...................
http://www.maayboli.com/node/38112
http://www.maayboli.com/node/38230
ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य- एक परिचय : अध्याय तिसरा
१. ज्ञानेश्वरांच्या दृष्टिकोनातून अर्जुनाची मन:स्थिती
ज्ञानेश्वरांच्या मते दुसर्या अध्यायाच्या अखेरीसच अर्जुन मनात आनंदला आहे. स्थितप्रज्ञल़क्षणांमधून श्रीकृष्ण सर्व कर्मांचाच निषेध करत आहेत असे त्याच्या मनाने घेतले आहे.तिसर्या अध्यायाच्या सुरुवातीसच अर्जुनाने आपल्या या शंकेचा उच्चार केला आहे
तू नको समजूस की मी एकटा आहे
सोबतीला पोळणारा गारवा आहे
मी तुला कोरा कुठे पीतोय रे दु:खा
मिसळला माझ्या मनाचा गोडवा आहे
दे मला शोधून आता तूच तो पत्ता
जो तुझ्या शोधात माझा हरवला आहे
मी स्वतःशी बोलताना शब्द देशिल का
आतला आवाज माझा गोठला आहे
तो चहूबाजूस परिमळ होत दरवळला
मी कधी स्पर्शू न शकलो ही व्यथा आहे