सरणावरील सुमने

Submitted by हिमांशु on 16 December, 2012 - 14:22

सरणावरील सुमने

सरणावरील सुमने सुकतात ना कधीही -
अग्नीफुले तयांची होतात अर्थवाही:
ज्वाळादळी तयांच्या मकरंद जीवनाचा,
वसतो तिथेच आत्मा - राखेस रंग त्याचा!
जे जे मिळे प्रपंची, त्याचाच धूर होई...
शोधा धुरात आत्मा, राखेत सर्वकाही!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users